तरूणाईसाठी नवीन लव्ह साँग ‘तेरी मेरी मेरी तेरी आशिकी’

तरूणाईसाठी नवीन लव्ह साँग ‘तेरी मेरी मेरी तेरी आशिकी’

जर तुम्हीही आत्ताच प्रेमात पडला असाल किंवा कोणावर वेड्यासारखं प्रेम करत असाल तर ‘तेरी मेरी मेरी तेरी आशिकी’ हे नवीन गाणं तुमच्यासाठी परफेक्ट आहे. लव्हस्टोरी म्हंटल्यावर लव्ह साँग हे आलंच. त्यामुळे 'अशी ही आशिकी' या चित्रपटातलं हे सुंदर गाणं तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला डेडीकेट करू शकता.‘अशी ही आशिकी’ चा लव्ह फीव्हर


‘अशी ही आशिकी’ कहाणी आहे स्वयम-अमरजा आणि त्यांच्यात फुलणाऱ्या प्रेमाची. कॉलेजला जाणाऱ्या आणि नुकत्याच प्रेमात पडलेल्या स्वयम् म्हणजे अभिनय बेर्डे आणि अमरजा म्हणजे हेमल इंगळे याची ही सिंपल लव्हस्टोरी आहे.
 

 

 


View this post on Instagram


 

 

Ended up finding her 😍.. as we looked for the perfect co star.. #Throwback from the sets of @ahathefilm


A post shared by Abhinay Berde (@abhinay3) on
अभिनय आणि हेमल ही फ्रेश जोडी आपल्याला या चित्रपटात दिसणार आहे. त्यांच्या लव्हस्टोरीतल्या एका गोड क्षणी ‘तेरी मेरी मेरी तेरी आशिकी’ हे गाणं दिसणार आहे. नुकतंच हे लव्ह साँग रिलीज करण्यात आलं आहे. स्वित्झर्लंडच्या सुंदर ‘अरोसा’ या लोकेशन्सवर हे गाणं शूट करण्यात आलं आहे.


Also Read List Of Marathi Wedding Songs To Dance In Marathi

Subscribe to POPxoTV

फक्त सुंदर लोकेशन्सच नाहीतर या गाण्याला गायक सोनू निगम आणि गायिका प्रियांका बर्वे यांचा सुंदर आवाजही लाभला आहे. या चित्रपटाला हटके संगीत दिलं आहे ते सचिन पिळगांवकर यांनी. या गाण्याचे बोल अभिषेक खणकर यांनी लिहलं असून ते ऐकताच तुम्ही नक्कीच या गाण्याच्या प्रेमात पडाल.  


आधी ‘रकम्मा’चा ठेका

Subscribe to POPxoTV

‘तेरी मेरी मेरी तेरी आशिकी’ या गाण्याआधी ‘रकम्मा’ हे डान्स साँग रिलीज करण्यात आलं होतं. ज्यामध्ये अभिनयने सोनू निगमच्या आवाजात असलेल्या या गाण्यावर चांगलाच ठेका धरला होता. या गाण्यात स्वयम (अभिनय) रकम्माला शोधताना दिसला होता. 


पुन्हा एकदा सोनूची जादू

या चित्रपटाच्या निमित्ताने नवीन वर्षात पुन्हा एकदा आपल्याला सोनू निगमच्या आवाजाची जादू अनुभवता येणार आहे. सोनूने या आधी ही अनेक मराठी चित्रपटात गाणी गायली आहेत. पण विशेष गोष्ट अशी की, या चित्रपटातील सर्व गाणी सोनू निगमने गायली आहेत.


अशी ही आशिकी ची भेट होणार ‘व्हॅलेंटाईन डे’ ला


या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेते सचिन पिळगांवकर पुन्हा एकदा दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. इतकंच नव्हे त्यांनी या चित्रपटाचे कथा-पटकथा-संवाद देखील लिहिले आहेत. त्यामुळे हा चित्रपट सबकुछ सचिन पिळगावकर असा आहे, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. या आधीही  सचिन पिळगावकर यांनी बरेच मराठी चित्रपट केले आहेत. त्यामुळे आता या नव्या जोडीबरोबर चित्रपटामध्ये काय धमाल असणार आहे हे लवकरच कळेल. ‘अशी ही आशिकी’ ही युथफुल प्रेमकहाणी 14 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.