सौंदर्या रजनीकांत आणि विशगन वनंगमुदी चेन्नईमध्ये विवाहबद्ध

सौंदर्या रजनीकांत आणि विशगन वनंगमुदी चेन्नईमध्ये विवाहबद्ध

सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांची छोटी कन्या सौंदर्या (Soundarya) आणि अभिनेता-उद्योगपती विशगन वनंगमुदी यांचा शाही लग्नसोहळा चेन्नईत पार पडला. 11 फेब्रुवारीला सकाळी साधारण दीड तास पारंपारिक दाक्षिणात्य पद्धतीने हा लग्नसोहळा झाला.


51558910 938692736337096 4205237673129889306 n


या लग्नसोहळ्याला सौंदर्या आणि विशगन यांचे जवळचे नातेवाईक उपस्थित होते. या लग्नाचे फोटोज आणि व्हिडीओज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.


51292057 251091729156160 7500302639322761838 n


या आधी सौंदर्या आणि विशगन यांनी राधा-कृष्ण मंदिरातही काही लग्नविधी पार पाडले.लग्न होताच सौंदर्याने ट्वीट करून आपला आनंद जाहीर केला.लग्नाच्या सोहळ्यात सौंदर्या फारच सुंदर दिसत होती.
 

Beautiful #soundaryarajinikanth on her #muhurtham look @prakatwork


A post shared by Mayabeauty.byanu | Anu (@mayabeautyanu) on
सौंदर्याने लग्नावेळी गुलाबी रंगाची हेवी वर्क असलेली सिल्क साडी नेसली होती. तसंच तिने दाक्षिणात्य पद्धतीची डायमंड बिंदी आणि दोन हेवी डायमंड नेकलेस, डायमंडच्या बांगडया आणि कमरपट्टा घातला होता. तर विशगन लग्नात पारंपारिक वेष्टी आणि शर्ट घातला होता.तर लग्नानंतर लगेचच ठेवण्यात आलेल्या रिसेप्शनमध्ये सौंदर्याने लाल रंगाचा ब्रायडल लेहंगा घातला होता तर विशगनने ब्लॅक आणि व्हाईट फॉर्मल वेस्टर्न सूट घातला होता.
 

#soundaryarajinikanth


A post shared by Mayabeauty.byanu | Anu (@mayabeautyanu) on
या लग्नाला तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलनीस्वामी, अभिनेता कमल हसन आणि काजोल यांसारखे अनेक राजकीय आणि कॉलीवूड-बॉलीवूडमधल्या सेलिब्रिटीजनी उपस्थिती लावली.

51924976 266734227574745 2836392893781690844 n


50556377 589458401526159 7798717390787018422 n


गेल्या तीन दिवसांपासून चेन्नईमध्ये या लग्नाचे विधी सुरू होते. काही दिवसांपूर्वी या दोघांच्या लग्नाचं प्री-वेडींग रिसेप्शनही ठेवण्यात आलं होतं.प्री-वेडींग सेरेमनीजमध्ये मेहंदी आणि हळदी फंक्शनचा समावेश होता. रजनीकांत यांनी आपल्या मुलीच्या लग्नानिमित्त पोलिस सुरक्षेची मागणीही केली होती.


50553801 340208603255387 3560783959881225763 n
सौंदर्याचं हे दुसरं लग्न असून तिला पहिल्या लग्नापासून एक चार वर्षाचा मुलगा आहे. सौंदर्या आणि विशगन यांचं लव्ह मॅरेज असून त्यांनी नुकतंच एक फोटोशूटही करून घेतलं होतं.


51205383 2006346929434009 3503244948797493038 n
सौंदर्याने 2014 साली तामिळ चित्रपट Kochadaiiyaan ची निर्मिती केल्यानंतर ती चर्चेत आली होती. दिग्दर्शनातील तिचा हा डेब्यू चित्रपट होता. या चित्रपटाची खासियत म्हणजे आपले वडील रजनीकांत यांच्यासोबत तिने यात काम केलं होतं.सौंदर्याचा होणारा नवरा विशनन यानेही तामिळ चित्रपटात डेब्यू केला असून 2018 साली तामिळ थ्रीलर Vanjagar Ulagam मधून त्याने डेब्यू केला.


फोटो सौजन्य : Instagram


हेही वाचा -


प्रतीक बब्बर आणि सान्या सागर लग्नबेडीत अडकले


लग्न वर्धापनदिनाचे शुभेच्छा संदेश


अभिनेत्री अॅमी जॅक्सनला करायचंय 'या' खास ठिकाणी लग्न