ADVERTISEMENT
home / मनोरंजन
दक्षिणेची आजही पहिली पसंती ‘थलायवा’ रजनीकांत

दक्षिणेची आजही पहिली पसंती ‘थलायवा’ रजनीकांत

अभिनेता आणि महाराष्ट्रातील जन्म असलेले रजनीकांत यांची लोकप्रियता त्यांच्या चाहत्यांमध्ये एवढी आहे की, त्यांचे चाहते त्यांना प्रेमाने ‘थलायवा’ असं म्हणतात हे सगळ्यांनाच माहीत आहे. आज इतक्या वर्षानंतरही या दक्षिणेतील थलायवाच्या लोकप्रियतेत तसूभरसुद्धा कमी आलेली नाही. याची प्रचिती नुकत्याच समोर आलेल्या स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या लोकप्रियता चार्टमध्ये आली. गेल्या सहा महिन्यांमधील रजनीकांतची लोकप्रिता पाहता, तेच ‘थलायवा’ असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.

rajanikant-1

अभिनेता रजनीकांतच्या 2018-2019 मध्ये तीन फिल्म्स रिलीज झाल्या. काला, 2.0 आणि पेटा या तीन चित्रपटांमुळे वेबसाइट, ई-पेपर आणि व्हायरल न्यूजमध्ये 5447 अंकांसह रजनीकांत बाकी दक्षिणात्य अभिनेत्यांहून अग्रेसर असल्याचं समोर आलं आहे. गेल्या सहा महिन्यांमधल्या रँकिगनुसार तर 100 पैकी 100 गुणांसह रजनीकांत लोकप्रियतेत अग्रणी असल्याचं समोर आलं आहे. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट जाहीर केली आहे.

मल्याळम इंडस्ट्रीचा सुपरस्टार पृथ्वीराज सुकुमारन या लोकप्रियतेच्या चार्टमध्ये 4223 गुणांसह दूस-या स्थानी आहेत. 100 मधून 77.53 गुण मिळवून आपल्या चाहत्या वर्गाच्या प्रेमामुळे स्कोर ट्रेंड्सच्या लोकप्रियतेच्या चार्टवर पृथ्वीराज दूस-या क्रमांकावर आहे.

ADVERTISEMENT

3829 गुणांसह बाहुबली फेम प्रभास लोकप्रियतेत तिस-या क्रमांकावर आहे.  बाहुबलीनंतर प्रभासची लोकप्रियता दक्षिणमध्येच नाही तर बॉलीवूडमध्येही वाढलीय. त्यामुळेच 100 मधून 70.30 गुणांसह प्रभास तिस-या पदावर आहे.

आपल्या महर्षी चित्रपटामुळे 3489 गुणांसह महेशबाबू चौथ्या स्थानी आहे. तर 2018 मध्ये रिलीज झालेली महेश बाबूची ‘भारत अने नेनू’ टॉप ग्रॉसर फिल्म असल्यामुळेही त्याच्या लोकप्रियतेत वाढ झालेली आहे. महर्षीमुळे तर जगभरात महेशबाबूच्या फॅनफॉलोइंग चांगलीच वाढली आहे. म्हणूनच 64.05 गुणांसह महेश बाबू चौथ्या स्थानी आहे.  

सुपरस्टार मोहनलालच्या ‘लुसिफर’ आणि ‘ओडियन’ या दोन फिल्म्सनी चांगलीच लोकप्रियता मिळवली. म्हणूनच स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या चार्ट्सवर 3294 गुणांसह मोहनलाल पाचव्या स्थानी आहेत. मोहनलाल यांच्या चाहता वर्गामुळे 100 पैकी 60.47 गुण मिळवून ते लोकप्रियतेत पाचव्या पदावर आहेत.  

या लोकप्रियतेच्या चार्टबाबत स्कोर ट्रेंड्सचे सह-संस्थापक अश्वनी कौल सांगतात की, “प्रभास आणि महेश बाबू या दोघांची प्रचंड फॅनफॉलोइंग आहे. सोशल प्लॅटफॉर्म, न्यूजपेपर आणि व्हायरल न्यूज रँकिंगमध्ये ते चांगलेच लोकप्रिय आहेत. पण थलायवा रजनीकांत आणि सुपरस्टार मोहनलाल यांची अनेक वर्षांची लोकप्रियता असल्याने त्यांना लोकप्रियतेत मागे टाकणेच अनेक स्टार्सना सहज शक्य नाही. पृथ्वीराजसुध्दा मासेस आणि क्लासेसमध्ये चांगलाच लोकप्रिय आहे.“

ADVERTISEMENT

या चार्टचं रेटींग हे 14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून हा डेटा गोळा केला जातो. यामध्ये फेसबुक, ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजिटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. विविध अत्याधुनिक अल्गोरिदममुळे या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते आणि बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंग ठरवलं जातं.

हेही वाचा –

रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या पुन्हा अडकणार लग्नबेडीत

सौंदर्या रजनीकांत आणि विशगन वनंगमुदी चेन्नईमध्ये विवाहबद्ध

ADVERTISEMENT

Saaho मध्ये करणार का सलमान खान कॅमिओ

03 Jun 2019
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT