हा विनोदी अभिनेता सनी लिओनसोबत करणार हॉरर चित्रपटात काम

हा विनोदी अभिनेता सनी लिओनसोबत करणार हॉरर चित्रपटात काम

हॉरर चित्रपटात सनी लिओनने काम करणे काही कोणाला नवीन नाही. रागिनी MMS या चित्रपटात तिचा बोल्ड अंदाज सगळ्यांनीच पाहिला होता. पण आता सनी एका हॉरर कॉमेडी चित्रपटात काम करणार आहे. या चित्रपटाबाबत आणखीही काही माहिती समोर येत आहे ती म्हणजे एक कॉमेडी किंग म्हणजे विनोदी अभिनेता या चित्रपटात सनीसोबत दिसणार आहे. अर्थात फोटोवरुन तुम्हाला लक्षात आले असेलच की, हा विनोदी अभिनेता कोण आहे ते? पहिल्यांदाच ब्रम्हानंद आणि सनी एकाच चित्रपटात एकत्र दिसणार आहे. ते ही पहिल्या वहिल्या हिंदी चित्रपटात दिसणार म्हटल्यावर त्याचा आनंद हा नक्कीच वेगळा असणार आहे.


चित्रपटाचे नाव काय?


आता जर तुम्हाला या चित्रपटाची उत्सुकता असेल तर या चित्रपटाचे नाव कोका कोला असे आहे. सनी लिओनी आणि मंदाना करीमी या चित्रपटात काम करणार आहेच. पण या चित्रपटात जर काही खास असणार आहे तर तो म्हणजे अभिनेता ब्रम्हानंद.  परमदीप संधू आणि धर्मेंद धारीवाल या चित्रपटाचे निर्माते असून या चित्रपटाचे शुटींग लवकरच सुरु होणार असे कळत आहे. अद्याप या दोघांनी या चित्रपटाबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण लवकरच तो करेल अशी अपेक्षा आहे.


ब्रम्हानंदमुळे लागणार साऊथचा तडका


bramhanand


आता जर तुम्ही ब्रम्हानंदचे चाहते असाल तर तुम्हाला त्याच्या बद्दल अधिक काही जाणून घ्यायची गरज नाही. पण जर तुम्हाला ब्रम्हानंद कोण ते माहीत नसेल तर साऊथमधील प्रत्येक चित्रपटात ब्रम्हानंद हा असतोच. त्याच्या कॉमेडीचा कडक टाईम अनेकांना आवडते. त्याने हिरोंच्या तुलनेतही अधिक चित्रपट केले असून त्याच्या या कॉमेडीमुळेच त्याला ओळख मिळाली आहे. त्यामुळे आता या चित्रपटाच ब्रम्हानंद असणार म्हटल्यावर त्याला साऊथचा तडका लागणार… आणि त्यामुळेच हा चित्रपट एकदम खास असणार यात काही शंका नाही.


हार्ट सर्जरीनंतरचा हा चित्रपट


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अगदी काहीच महिन्यांपूर्वी ब्रम्हानंद यांची हार्ट सर्जरी झाली होती. या हार्ट सर्जरीनंतर ते आराम करत होते. पण आता ते पूर्ण बरे असून झाले असून त्यांनी त्यांनी हा चित्रपट करण्याचा निर्णय घेतला आहे. 1100 हून अधिक चित्रपटात काम करत सगळ्यांना हसवणाऱ्या ब्रम्हानंद यांचा कोणता लुक या चित्रपटात पाहायला मिळणार यासाठी चित्रपटाची वाट पहावी लागेल


सुनील वर्माही हसवणार


ब्रम्हानंद यांच्यासोबत कॉमेडीचा तडका लावायला या चित्रपटात आणखी एक व्यक्ती आहे ती म्हणजे सुनील वर्मा. याला देखील तुम्ही अनेक चित्रपटातून नक्की पाहिले असेल. या चित्रपटात ब्रम्हानंद यांच्यासोबत सुनील वर्मा यांची कॉमेडी म्हणजे आता कॉमेडीचा डबलडोसच या चित्रपटात असणरा असे म्हणायला हवे. चित्रपटाच्या निर्मात्यांना या दोन्ही कॉमेडियनवर विश्वास असून त्यांना या दोघांच्या असण्याने चित्रपट जास्त चांगला खुलून येईल असे वाटते. त्यामुळे आता या चित्रपटात नेमकी कोणत्या पद्धतीने हॉरर कॉमेडी चालेल ते पाहावे लागेल. पण ब्रम्हानंद यांच्या चाहत्यांना मात्र नक्कीच याचा आनंद होईल यात काही शंका नाही.


(फोटो सौजन्य- Instagram)