ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
‘दबंग 3’ च्या चुलबुलला टक्कर देणार साऊथचा सुपरस्टार खलनायक

‘दबंग 3’ च्या चुलबुलला टक्कर देणार साऊथचा सुपरस्टार खलनायक

कोणत्याही बॉलीवूड चित्रपटामध्ये दमदार खलनायक नसेल तर मजा येत नाही. त्यामुळेच अॅक्शनपॅक्ड चित्रपटामध्ये नायकाइतकंच महत्त्व हे खलनायकाला देण्यात येतं. याच कारणामुळे सलमान खान (Salman Khan) आपल्या आगामी ‘दबंग 3’ (Dabangg 3) मध्ये कोणतीही जोखीम घेऊ इच्छित नाही. आपल्या प्रेक्षकांना आणि चाहत्यांना अप्रतिम चित्रपटाची मेजवानी देण्यासाठी सल्लूने पूर्ण तयारी केली आहे. आता ‘दबंग 3’ मध्ये आपल्या लाडक्या चुलबुलला टक्कर देण्यासाठी साऊथचा सुपरस्टार खलनायक सलमानने आणला आहे. बॉलीवूडमध्ये सलमानचे अनेक चित्रपट हिट आहेत. मात्र सलमानच्या ‘दबंग’ सिरीजमधील चुलबुलचे अनेक चाहते आहेत. बऱ्याच कालावधीनंतर सलमानचा ‘दबंग 3’ मोठ्या पडद्यावर येत आहे. त्यामुळे हा चित्रपट पुन्हा एकदा चाहत्यांसाठी काहीतरी वेगळं घेऊन येणार का ? हा प्रश्न चाहत्यांमध्ये आहे. पहिल्या चित्रपटात प्रकाश राज, दुसऱ्या चित्रपटात सोनू सूद आणि आता तिसऱ्या चित्रपटामध्ये नक्की खलनायक कोण असणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. याचं उत्तर आता खुद्द सलमान खाननेच दिलं आहे.

chulbul dabangg

वाचा – खतरों के खिलाड़ी- 9: जिगर पे ट्रीगर घेण्यासाठी सेलिब्रिटींना किती मिळतात पैसे

किच्चा सुदीप साकारणार खलनायक

ADVERTISEMENT

‘दबंग 3’ मध्ये कोण असणार खलनायक हा प्रश्न सर्वांनाच पडला होता. तर साऊथमधील सुपरस्टार खलनायक किच्चा सुदीप ‘दबंग 3’ मध्ये खलनायक असणार आहे. सलमान खानने स्वतः ट्विट करत याची घोषणा केली. सलमानला सुदीपबरोबर बऱ्याच वर्षांपासून काम करायचं होतं आणि ‘दबंग 3’च्या निमित्ताने तो योग जुळून आला आहे. या चित्रपटामध्ये पहिल्या दोन चित्रपटांपेक्षाही अधिक दमदार अॅक्शन असणार असल्याचं याआधीही सलमान आणि अरबाज यांनी एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं होतं. दरम्यान सुदीपचा ‘पहलवान’ हादेखील चित्रपट येत असून याचा टीझर त्याने आपल्या अकाऊंटवर पोस्ट केला होता. त्यामुळे आता दोन महत्त्वाच्या प्रोजेक्टमधून सुदीप त्याच्या चाहत्यांना दिसणार आहे.

वाचा – ‘गली बॉय’ रणवीरच्या ‘मेरे गली मैं’ गाण्याचं ओरिजनल व्हर्जन तुम्हाला माहीत आहे का?

कोण आहे सुदीप?

किच्चा सुदीप हा साऊथमधील सुपरस्टार असून कन्नड चित्रपटांमध्ये त्याचं खूप मोठं नाव आहे. शिवाय बॉलीवूडमध्ये ‘मख्खी’, ‘फूंक’ सारखे सुपरहिट चित्रपट सुदीपने केले आहेत. या चित्रपटांमधून त्याने आपला दमदार अभिनय दाखवून दिला असल्यामुळे बॉलीवूडच्या चाहत्यांसाठीही सुदीपचं नाव नवं नाही. या चित्रपटाच्या चित्रीकरणाची सुरुवात यावर्षी एप्रिलमध्ये होणार असल्याची चर्चा आहे. शिवाय या चित्रपटामध्ये दोन्ही सिरीजमध्ये असणारी सोनाक्षी सिन्हाच चुलबुलची बायको म्हणून भूमिका साकारणार आहे. पुन्हा एकदा या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. 

ADVERTISEMENT

kicchasudeepa

वर्षाच्या शेवटी होणार प्रदर्शित

एप्रिलमध्ये चित्रीकरण सुरु होणार असलं तरीही यावर्षाच्या शेवटपर्यंत हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येणार असल्याचं अरबाजनं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे ‘दबंग 3’ कोणत्या तरी दुसऱ्या मोठ्या चित्रपटाबरोबर प्रदर्शित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दिवाळीदरम्यान ‘दबंग 3’ प्रदर्शित केल्यास, अक्षयकुमारच्या ‘हाऊसफुल 4’ बरोबर हा चित्रपट प्रदर्शित होईल किंवा ख्रिसमसदरम्यान प्रदर्शित केल्यास, रणबीर कपूरच्या ‘ब्रम्हास्त्र’शी टक्कर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता नक्की या चित्रपटाच्या प्रदर्शानाची तारीख काय घोषित होत आहे याकडे सर्व चाहत्यांचं लक्ष आहे. तर पुन्हा एकदा ‘दबंग 3’ मधून सलमानचा चुलबुल कमाल दाखवू शकणार का? याकडेही त्याच्या चाहत्यांचं लक्ष आहे.  

वाचा – नव्या वर्षात ५ चित्रपट उलगडणार देशाचा इतिहास
 

ADVERTISEMENT

फोटो सौजन्य – Instagram 

23 Jan 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT