ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
राष्ट्रपतीभवनात  मणिकर्णिकाचं ‘स्पेशल स्क्रिनिंग’

राष्ट्रपतीभवनात मणिकर्णिकाचं ‘स्पेशल स्क्रिनिंग’

‘मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी’ हा कंगना रणौतचा बहुचर्चित चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. 25 जानेवारीला मणिकर्णिका प्रदर्शित होत आहे. राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे प्रदर्शनाआधी या चित्रपटाचं खास स्क्रिनिंग राष्ट्रपतीभवनात आयोजित करण्यात आलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह कंगना आणि चित्रपटातील कलाकारांची संपूर्ण टीम या खास शो साठी उपस्थित राहणार आहे. 18 जानेवारीला राष्ट्रपतीभवनात हे खास स्क्रिनिंग होणार आहे. राष्ट्रपतीभवनाच्या कल्चरल सेंटरमध्ये या स्क्रिनिंगचं आयोजन करण्यात आलं आहे. चित्रपटाआधी होणाऱ्या या खास स्क्रिनिंगमुळे आता मणिकर्णिकाबाबत अधिकच उत्सुकता प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाली आहे.

‘मणिकर्णिका’ चित्रपटासाठी सारं काही भव्य आणि दिव्य…

भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात झाशीच्या रक्षणासाठी स्वतःच्या  प्राणांची आहूती देणाऱ्या रणरागिणीचा जीवनप्रवास या चित्रपटातून उलगडला जाणार आहे. झाशीच्या राणीची शौर्यगाथा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद आहे. त्यामुळे या चित्रपटाचं पोस्टर, ट्रेलर आणि गाणी असं सारं काही भव्य आणि दिव्य स्वरुपात प्रदर्शित करण्यात आलं. या चित्रपटाचे सेट्स आणि लोकेशनमधून 18 व्या शतकातील काळ उभा करण्यासाठी देखील प्रचंड मेहनत घेण्यात आली. राणी लक्ष्मीबाईंच्या पराक्रमाला मानवंदना देण्यायासाठी या चित्रपटाचं  स्पेशल स्क्रिनिंगदेखील थेट राष्ट्रपती भवनात आयोजित केलं गेलंय. मणिकर्णिका पाहताना चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या अंगावर रोमांच उभं राहील अशी निर्मिती करण्यात आली आहे.

मणिकर्णिकाच्या माध्यमातून कंगनाचं दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण

ADVERTISEMENT

कंगनाने या चित्रपटात राणी लक्ष्मीबाई यांची ऐतिहासिक भूमिका साकारली आहे.या चित्रपटातून कंगना पहिल्यांदाच दिग्दर्शन क्षेत्रात प्रवेश करत आहे. कंगनाने मणिकर्णिकाच्या प्रमोशनसाठी अक्षरशः कंबर कसली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कंगना राजेशाही भरजरी साड्या आणि पारंपरिक आभूषणांच्या वेशभूषेमध्ये जात आहे. या चित्रपटात राणी लक्ष्मीबाईंचे निरनिराळ्या वयातील विविध लुक साकारण्यासाठी फारच मेहनत घेण्यात आली. कंगनाच्या या लुक्सबाबत सगळीकडेच चर्चा सुरू आहे. राणी लक्ष्मीबाईंच्या किशोरवयीन ते योदध्या या सर्व लुक्ससाठी बारकाईने काम करण्यात आलं आहे.

kangana in manikarnika new

मणिकर्णिकामध्ये हे कलाकार साकारणार ऐतिहासिक भूमिका

मणिकर्णिकामध्ये अनेक कलाकार ऐतिहासिक भूमिका साकारत आहेत. अभिनेत्री अंकीता लोखंडे या चित्रपटात ‘झलकारी बाई’ची भूमिका साकारत आहे. मराठी कलाकार वैभव तत्ववादी ‘पूरणसिंग’ यांची भूमिका साकारत आहे. अतुल कुलकर्णी ‘तात्या टोपे’ यांची भूमिका तर सुरेश ओबेरॉय ‘बाजीराव’,डॅनी ‘नानासाहेबां’ची भूमिका तर जिशू सेनगुप्ता ‘गंगाधररावां’ची  भूमिका साकारत आहे.

ADVERTISEMENT

अधिक वाचा-

मणिकर्णिका चित्रपटाच्या ट्रेलर लाँचला खास ऐतिहासिक टच

मणिकर्णिकामध्ये कंगना साकारतेय राणी लक्ष्मीबाईंची ‘ही’ विविध रुपं

वर्ष 2019 मध्ये बॉलीवूडमध्ये धडकणार महिला बायोपिक

ADVERTISEMENT

फोटोसौजन्य- इन्स्टाग्राम

18 Jan 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT