Viral : श्रीदेवीने मुलाखतीदरम्यान दिला होता खूशी कपूरला ओरडा

Viral : श्रीदेवीने मुलाखतीदरम्यान दिला होता खूशी कपूरला ओरडा

सोशल मीडियावर कधी आणि काय व्हायरल होईल याचा नेम नाही. मग तो एखादा नवा ट्रेंड असू शकतो किंवा जुना व्हिडिओही असू शकतो. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीचा जुना व्हिडिओ. का हा व्हिडिओ होत आहे व्हायरल वाचा.

श्रीदेवीचा व्हायरल व्हिडिओ

या व्हिडिओमध्ये श्रीदेवी आपल्या छोट्या मुलीला खुशीला ओरडताना दिसत आहे. श्रीदेवीचं आपल्या दोन्ही मुलींवर खूप प्रेम होतं. पण काही क्षण असे असतात जेव्हा प्रत्येक आईप्रमाणे श्रीदेवीलाही मुलीवर ओरडावं लागलं.

काय आहे नेमकं या व्हिडिओत?

या जुन्या व्हिडिओमध्ये श्रीदेवीची मुलाखत सुरू असताना छोटी खूशी नेमकी मधूनच फिरताना दिसते. यामुळे श्रीदेवी तिला ओरडताना दिसत आहे. ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा खूशी खूपच लहान होती. मुलं या वयात मुलाखतीत काय सुरू हे पाहण्यासाठी कुतूहलाने इकडे तिकडे फिरणं साहजिक आहे. तेव्हा श्रीदेवी तिला एका ठिकाणी बसण्यासाठी सांगत आहे. श्रीदेवी तिला म्हणते की, खूशी प्लीज, जा आणि तिकडे बस. आता त्यावेळी मुलाखत सुरू असल्याने हे सर्व कॅमेरात कैद झालं. पण एक आई म्हणून तिचं खुशीला असं म्हणणं साहजिक आहे.

श्रीदेवीचं मुलींवरील प्रेम

श्रीदेवीचं इन्स्टा अकाउंट आजही पाहिल्यास आपल्याला कळेल की, तिचं तिच्या मुलींवर आणि कुटुंबावर किती प्रेम होतं. तिच्या अपघाती मृत्यूमुळे तिला जान्हवीचा डेब्यू सिनेमा पाहता आला नाही. पण ती असेपर्यंत या चित्रपटासाठी लागणारी सर्व मेहनत तिने जान्हवीकडून नक्कीच करून घेतली असेल. आज श्रीदेवी असती तर जान्हवीच्या करिअरला तिने अजून चांगली दिशा नक्कीच मिळवून दिली असती. यात शंका नाही.

असो श्रीदेवी जिथे असेल तिथून आपल्या मुलींवर प्रेमाचा वर्षाव नक्कीच करत असेल.