स्टँडअप कॉमेडियनने केली सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूची मस्करी, झाला ट्रोल

स्टँडअप कॉमेडियनने केली सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूची मस्करी, झाला ट्रोल

काॅमेडीच्या माध्यमातून लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणणे हे एक चांगले काम असले तरी कधी कधी कॉमेडीच्या नादात या स्टँअप कॉमेडियनकडून अशा काही चुका होतात की,त्यांना समाजाचा रोष पत्करावा लागतो. कधी देवीदेवतांची विटंबना, कधी कोणत्या मोठ्या कलाकाराची विटंबना… समाजात राहून समाजाचा एक भाग असलेल्या या व्यक्ती कारण नसताना भांडण ओढावून घेतात. आता एका स्टँअप कॉमेडियनने दिवगंत अभिनेता सुशांत सिंह राजपूतवर काहीतरी असा विनोद केला आहे की तो त्याच्या फॅन्सना मुळीच पटलेला नाही. एखादी व्यक्ती या जगातच नाही आणि त्याच्या मृत्यू पश्चात असा विनोद करणे हे चांगले नाही असे म्हणत या कॉमेडियनला ट्रोल करण्यात आले आहे. हा कॉमेडियन अन्य कोणी नसून डॅनियल फर्नांडिस आहे. त्याचा हा व्हिडिओ आहे तरी काय ते जाणून घेऊया.

प्रियांका चोप्रा लवकरच होणार आई, फॅमिली प्लॅनिंगबाबत केला मोठा खुलासा

सुशांतच्या मृत्यू प्रकरणातून केला विनोद

 डॅनिअलने त्याच्या युट्युब अकाऊंटवरुन हा व्हिडिओ दोन दिवसांपूर्वी शेअर केला आहे. (11 जानेवारी)  त्याने या व्हिडिओची हेडिंगही सुशांत सिंह राजपूत असे केले आहे. संपूर्ण देशात कोव्हिडची परिस्थिती असताना लोकांना सुशांत सिंह राजपूतच्या त्या सगळ्या प्रकरणाची जास्त पडली होती अशा आशयाचा विनोद त्याने केला आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मानसिक स्थितीचाही विनोद करताना तो या व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याच्या या व्हिडिओमध्ये सुशांत सिंह राजपूतच्या या संपूर्ण प्रकरणाचा विनोद करण्यात आला आहे. ही अत्यंत संवेदनशील अशी घटना असताना त्यावर अशा पद्धतीचा विनोद करणे हे अनेकांना मुळीच रुचलेले नाही. त्यामुळे या कॉमेडिअनचा व्हिडिओ त्याने पोस्ट केल्यानंतरच त्यावर कमेंटचा पाऊस सुरु झाला आहे. अशा प्रकारे एखाद्याच्या मृत्यूचा विनोद करणे चांगले नाही. असे देखील यामध्ये म्हटले आहे. त्याचा हा व्हिडिओ संपूर्णपणे सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाशी निगडीत आहे. 

लाईक्ससाठी केला का व्हिडिओ

हल्ली सोशल मीडियावर चांगलं काही केलं की, ते  लवकर खपत नाही. उलट काहीतरी केलं की, ते लोकांना जास्त आवडतं. असं अनेकदा दिसून आलं आहे. कदाचित म्हणूनच डॅनियनलाही प्रसिद्धी मिळवण्यासाठी अशा प्रकारे नकारात्मक इमेज तयार करण्याची गर असते. असे केले की, व्हिडिओ हा जास्त पाहिला जातो. असा सोशल मीडियावरील प्रसिद्धीची नवा फंडा आहे. 11 जानेवारीला डॅनियलने त्याच्या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर आणि सुशांत सिंह राजपूत असे हेडिंग टाकल्यानंतर स्वाभाविकच अनेकांनी हा व्हिडिओ जाऊन पाहिला असणार यात काही शंका नाही. त्याच्या इतर व्हिडिओच्या तुलनेत त्याला 2 लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर त्याची निंदा करणाऱ्या किमान 10 हजार कमेंट्स त्यावर आलेल्या आहेत. त्यामुळे डॅनियलला या व्हिडिओमुळे नाहक प्रसिद्धी मिळाली हे नक्की!

जुनं ते सोनं' म्हणत भाग्यश्री मोटेने केले फोटो शेअर, सोशल मीडियावर व्हायरल

ट्विटरवर निंदा

सोशल मीडियामधील या घटनेचे पडसाद हे ट्विटरवर देखील उमटताना दिसले आहे. ट्विटरवर एक नवा ट्रेंड सुरु करण्यात आला असून डॅनियलच्या विरोधात एक वेगळीच मोहीम आखली गेली आहे. डॅनियलने हा व्हिडिओ काढून टाकावा अशी मागणी काही ट्विटमधून करण्यात आली आहे. त्याच्या व्हिडिओ खाली आलेल्या कमेंटप्रमाणेच त्याला ट्विटरवरही झोडपण्यात येत आहे. 

 

आता डॅनियल याचे काय उत्तर देणार? त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरुन काढून टाकावा लागेल का ? असे प्रश्न सध्या अनेकांना आहेत.

मुलगी झाली हो! विराटच्या भावाने शेअर केली मुलीची झलक