ADVERTISEMENT
home / बॉलीवूड
स्टार किड्ससाठी तारणहार ठरतोय करण जोहर

स्टार किड्ससाठी तारणहार ठरतोय करण जोहर

आतापर्यंत दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर याच्यावर स्टार किड्सना सतत पुढे आणण्याचे आरोप लागत होते. नेपोटिझम आणि इतर प्रतिभावंत कलाकारांना करण जोहर संधी देत नाही असा ठपका करण जोहरवर इंडस्ट्रीमधील काही कलाकारांनी ठेवला आहे. पण या सगळ्याकडे दुर्लक्ष करत आता करण जोहर पुन्हा एकदा अभिनेता संजय कपूर आणि महीप कपूर यांची मुलगी शनाया कपूरला इंडस्ट्रीमध्ये लाँच करत आहे. त्यामुळे स्टार किड्ससाठी करण जोहर तारणहार ठरतोय असंच म्हणावं लागेल. करणने आतापर्यंत किती स्टार किड्सना इंडस्ट्रीमध्ये लाँच केलं आणि त्यांचं करिअर घडवलं आहे ते आपण पाहूया. 

आलिया भट – स्टुडंट ऑफ द ईयर (2012)

आलिया भट एक कमाल अभिनेत्री आहे हे तिने आपल्या अभिनयाने सिद्ध केलेच आहे. पण आलिया ही महेश भटची मुलगी आहे आणि तिला करणने ब्रेक दिला हे विसरूनही चालणार नाही. आपल्या पहिल्याच चित्रपटात आलियाने खरं तर प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले होते. आलिया अत्यंत जाडी होती पण करणने तिला बारीक होण्याचा सल्ला दिला आणि आपल्या चित्रपटातून जगासमोर आणले असं आलियाने स्वतः सांगितलं होतं. तसंच ती करणला आपले दुसरे वडील मानते. आलियाने गेल्या काही वर्षात आपली प्रतिभा सिद्ध केली असली तरीही तिच्यावरही नेपोटिझमचा टॅग आहे. 

‘अप्सरा आली’, साडीमधील सोनालीच्या मनमोहक अदा

वरूण धवन – स्टुडंट ऑफ द ईयर (2012)

डेव्हिड धवन या प्रसिद्ध दिग्दर्शकाचा मुलगा असूनही वरूणला करण जोहरने इंडस्ट्रीमध्ये लाँच केले. वरूण धवन चित्रपटात काम करण्यापूर्वी करण जोहरचा सहायक दिग्दर्शक म्हणून काम करत होता. त्यानंतर त्याने स्टुडंट ऑफ द ईयर या चित्रपटातून इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले. वरूणनेही आपल्या अभिनयाने एक प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे. मात्र तरीही करण जोहरने त्याला लाँच केल्यामुळे त्याच्याकडेही नेपोटिझमचा एक भाग म्हणूनच पाहिले जाते. 

ADVERTISEMENT

जान्हवी कपूर – धडक (2018)

श्रीदेवीची मुलगी ही एकच ओळख अजूनही जान्हवी कपूरची आहे. जान्हवीनेदेखील करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनमध्ये बनलेल्या धडक मधून इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले. मराठीतील प्रसिद्ध ‘सैराट’ या चित्रपटावरून बनविण्यात आलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी जास्त प्रतिसाद दिला नाही. कारण मुळात सैराटमधील जोडी आणि या चित्रपटातील जोडी यांची तुलना करण्यात आली आणि त्याशिवाय जान्हवी कपूर आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकू शकली नाही. मात्र नुकताच प्रदर्शित झालेला ‘रूही’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. 

पतीला घटस्फोटीत आणि जाड म्हणणाऱ्यांना अभिनेत्रीने सुनावले खडेबोल

ईशान खट्टर – धडक (2018)

शाहीद कपूरचा सावत्र भाऊ. घरात सगळेच कलाकार ही ईशानची खरं तर जमेची बाजू. पण ईशानही नेपोटिझचा टॅग लावूनच या इंडस्ट्रीमध्ये आला आहे. करण जोहरच्या धडक मधून ईशानच्या आपल्या अभिनयाची चमक दाखवली. इतकंच नाही तर सुरूवातीलाच ‘बियाँड द क्लाऊड’ सारखा चित्रपट करत आपण इथे अभिनय करायला आलो आहोत हे ईशानने दाखवून दिले आहे. मात्र करण जोहरच्या कँपमधून प्रवेश केल्याने ईशानला नक्कीच त्याचा तोटा झाला आहे असं त्याच्या चाहत्यांना वाटतं. 

अनन्या पांडे – स्टुडंट ऑफ द ईयर 2 (2019)

अभिनेता चंकी पांडे आणि भावना पांडे यांची मुलगी अनन्या पांडेलादेखील करण जोहरने ब्रेक दिला. अनन्याकडे अजिबात अभिनय नाही आणि ती केवळ चंकी पांडे आणि भावना पांडे यांची मुलगी असल्यानेच तिला ब्रेक मिळाला असल्याचं प्रेक्षकांचं ठाम मत आहे. आपल्या पहिल्या चित्रपटातही अनन्या कोणतीही कमाल दाखवू शकली नाही. तरीही तिला काही पुरस्कार मिळाले. त्यामुळे प्रतिभावंत कलाकार मागे राहतात आणि स्टार किड्सना पुढे आणले जाते असा अनेक ठिकाणी आरोप करण्यात आलेलाही दिसून आला आहे. 

ADVERTISEMENT

तारक मेहता का उल्टा चष्मा’चा नवा अंदाज, प्रोमो झाले व्हायरल

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

24 Mar 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT