बॉलीवूड Star Kids जे सध्या करत आहेत ‘सिक्रेट डेट’

बॉलीवूड Star Kids जे सध्या करत आहेत ‘सिक्रेट डेट’

आपल्याकडे बॉलीवूड स्टार असो अथवा त्यांची मुलं सगळ्यांबद्दल गॉसिप केलं जातं. वास्तविक त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय चालू आहे हे जाणून घेण्यात प्रत्येकाला रस असतो. बॉलीवूड स्टार्सप्रमाणेच त्यांची मुलंही प्रसिद्ध आहेत. सध्या सोशल मीडियावर स्टार्स किड्सनादेखील मोठ्या प्रमाणात फॉलो करण्यात येतं. यामध्ये सुहाना खान, आर्यन खान, सारा अली खान, अनाया पांडे, नव्या नंदा, इशान खट्टर, जान्हवी कपूर, आहान शेट्टी या सर्व नावांचा समावेश आहे. नक्की हे स्टार किड्स कोणाकोणाला सिक्रेटली डेट करत आहेत हे जाणून घेण्यात नक्कीच बऱ्याच जणांना इंटरेस्ट असतो. आम्हीदेखील काही जणांची माहिती तुम्हाला देणार आहोत. बघा तुम्हाला पटतंय का? 

सारा अली खान

Instagram

‘केदारनाथ’ चित्रपटातून दमदार पदार्पण केलेल्या साराने प्रेक्षक आणि चाहत्यांच्या मनावर चांगलीच छाप सोडली आहे. साराचं बोलणं आणि वागणं प्रत्येकालाच आवडतं. अगदी मीडियाचीसुद्धा सारा लाडकी आहे. सुरुवातीला साराचं नाव सुशांत सिंह राजपूतबरोबर जोडण्यात आलं होतं. पण काहीच महिन्यात साराने सुशांतला अनफॉलो केलं. त्यानंतर साराने एका शो मध्ये आपल्याला कार्तिक आर्यनला डेट करायचं आहे असं सांगितलं. तिच्या नशीबाने तिला कार्तिकबरोबर चित्रपट मिळाला आणि आता सारा आणि कार्तिक अनेक ठिकाणी एकत्र दिसतात. इतकंच नाही कार्तिक साराला बऱ्याचदा एअरपोर्टवरदेखील घ्यायला येतो. सध्या हे दोघं एकमेकांना डेट करत असल्याचं सांगण्यात येत आहे. पण दोघांपैकी कोणीही यावर शिक्कामोर्तब केलेलं नाही. 

आर्यन खान

Instagram

आर्यन खान सध्या ‘लायन किंग’मधील सिम्बाला दिलेल्या आवाजामुळे चर्चेत आहे. आर्यननेही आता हळूहळू बॉलीवूडच्या दिशेने वाटचालीला सुरुवात केली आहे असं बऱ्याच जणांना वाटत आहे. पण सध्या मिळालेल्या माहितीनुसार आर्यन खान लंडनमधील एका ब्लॉगरला डेट करत आहे. त्या मुलीचं नाव अद्यापही कळलेलं नाही. आर्यन बऱ्याचदा इतर स्टार किड्सबरोबर पार्टी करताना दिसतो. यामध्ये त्याच्याबरोबर नव्या नंदा, इब्राहिम खान, सुहाना खान, अनन्या पांडे, शनाया कपूर हे स्टार किड्स बऱ्याचदा दिसतात. असं असलं तरीही आर्यन अथवा अन्य कोणाहीकडून याबद्दल माहिती देण्यात आलेली नाही. 

इशान खट्टर आणि जान्हवी कपूर

Instagram

‘धडक’ या ‘सैराट’च्या रिमेकमधून या जोडीने चित्रपटात पदार्पण केलं. इशान आणि जान्हवी हे आपण बेस्ट फ्रेंड असल्याचं नेहमी सांगतात. त्यांच्या पहिल्याच चित्रपटापासून दोघेही एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या आहेत. पण दोघांनीही कधीच हे मान्य केलेलं नाही. कोणत्याही मुलाखतीमध्ये आपण दोघेही खूप जवळचे मित्र असल्याचं दोघंही मान्य करतात. इशान नेहमीच जान्हवीबरोबर दिसून येतो. इतकंच नाही तर जान्हवीचा भाऊ अर्जुन कपूरनेही एका शो मध्ये तिची फिरकी घेत इशान नेहमी घराभोवती फिरताना दिसतो असं म्हटलं होतं. त्यामुळे बऱ्याच जणांना ही जोडी डेट करत असल्याचं वाटत आहे. 

नव्या नंदा आणि मिझान जाफरी

Instagram

अमिताभ बच्चन यांची नात आणि श्वेता बच्चन नंदाची मुलगी नव्या नंदाही नेहमी चर्चेत असते. नव्या तिच्या फॅशन सेन्समुळे ओळखली जाते. इतकंच नाही नव्याला खूपच फॅन फॉलोईंग आहे. असं असूनही ती बॉलीवूडमध्ये येणार की नाही याची शाश्वती नाही. पण नव्याचं नाव याआधी आर्यन खानबरोबर जोडण्यात आलं. तर त्यानंतर आता तिचं नाव जावेद जाफरीचा मुलगा मिझान जाफरी याच्याबरोबर जोडण्यात येत आहे. पण मिझानने नव्या ही आपल्या बहिणीची खूप जवळची मैत्रीण असून आमच्याकडे तिचं नेहमी येणंजाणं असतं एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. असं असलं तरीही मिझानच्या बऱ्याच फोटोंवर नव्याची आई श्वेताच्या कमेंट्स असतात. तर मिझान आणि नव्याने आपण डेट करत असल्याचं मान्य केलेलं नाही. 

आहान शेट्टी

Instagram

सुनील शेट्टीचा मुलगा आहान शेट्टी लवकरच चित्रपटातून पदार्पण करत आहे. पण आहानचं नाव हे एका उद्योगपतीची मुलगी असलेल्या तान्या श्रॉफशी जोडलं गेलं आहे. असं म्हटलं जातं की, आहान आणि तान्या गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. बऱ्याच कार्यक्रमांमध्ये त्यांना एकत्र पाहिलं जातं. नुकताच कियारा अडवाणीचा वाढदिवस झाला तिथेही या दोघांना एकत्र पाहिलं गेलं. पण तान्या कधीही आहानबरोबर फोटो पोझ द्यायला उभी राहात नाही. दरम्यान या दोघांनीही आपण डेट करत असल्याचं कधीही मान्य केलेलं नाही.