‘स्त्री’च्या रहस्यावरुन आता उठणार पडदा, दुसरा भाग लवकरच

‘स्त्री’च्या रहस्यावरुन आता उठणार पडदा, दुसरा भाग लवकरच

राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरचा ‘स्त्री’ चित्रपट तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला या चित्रपटातील स्त्री माहितच असेल. या स्त्री चेटकिणीला घालवण्यासाठी संपूर्ण गावभर ‘ओ स्त्री कल आना’ असे लिहिण्यात आले होते. या चेटकिणीला मारण्यासाठी श्रद्धा कपूर येते. तिला मारण्यासाठी जे काही प्रयत्न केले जातात ते या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. पण शेवटी काही प्रश्न अनुत्तरीतच राहिले. त्यामुळे अनेकांचा चित्रपट संपल्यानंतर मूड ऑफ झाला. पण आता या चित्रपटातील अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळणार आहेत. कारण आता सिनेमाचा पुढील भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


दबंगमध्ये पाहायला मिळणार पुन्हा करिनाचा जलवा


stree


कोणत्या रहस्यावरुन उठणार पडदा ?


२०१८ साली आलेला 'स्त्री' हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. या चित्रपटाच्या शेवटी चेटकिणीला संपवल्यानंतर परतणारी श्रद्धा कपूर त्या चेटकिणीची कापलेली वेणी आपल्या केसांना लावते आणि तिच्यामध्ये त्या चेटकिणीची शक्ती जाते असे दाखवण्यात आले आहे. आता याच रहस्यावरुन पडदा उठणार आहे. श्रद्धा कपूरने असे का केले ती कोण आहे? या रहस्यावरुन पडदा उठणार आहे. चित्रपटाची कथा लिहून झाली आहे. पहिला भाग जिकडे संपला होता तिथून दुसऱ्या भागाची सुरुवात होणार आहे. श्रद्धाने कापलेल्या वेणीचा हिशोब या भागात लागणार आहे. पहिल्या भागात श्रद्धा कपूर काहीतरी संशयास्पद दाखण्यात आले होते. शेवटपर्यंत ती चेटकिण तर नाही ना? असा संशय येत होता. पण शेवटी ती अशी काय वागते? की त्यामुळे सगळीच कथा बदलून जाते आणि बरेच प्रश्न मनात येतात. पण अखेर या सगळ्याचा उलगडा होणार आहे. 

तैमुर की सारा कोण आहे सर्वात जास्त लोकप्रिय?


पुढचा भाग अधिक घाबरवणारा


पहिल्या भागातील अनेक प्रश्नांची उत्तरे या भागात मिळणार आहेत, असा विश्वास चित्रपटाचे निर्माते दिनेश विजन यांनी दिली आहे. राजकुमार राव आणि श्रद्धा हीच जोडी यात दिसणार आहे.राजकुमार रावने या चित्रपटात एका टेलरची भूमिका साकारली होती.  भाग अधिक घाबरवणारा असेल. श्रद्धा कपूरच्या त्या वेणीचे रहस्य या भागात उलगडले तरी आणखी काही प्रश्न या नव्या भागात पडतील यासाठी तिसरा भागही लवकरच येईल अशी माहिती देखील निर्मात्यांनी दिली आहे. शिवाय पहिल्या भागात लोकांनी चित्रपटाचा शेवट निराशाजनक आहे असे म्हटले होते. पण या नव्या भागात लोकांची निराशा होणार नाही तर उत्सुकता वाढेलच, असा आत्मविश्वास दिला आहे. हा चित्रपट या वर्षाच्या शेवटी रिलीज होणार आहे.त्यामुळे वर्षाच्या शेवटपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे. 


सोनाली बेंद्रेने केले कमबॅक,शेअर केला फोटो


सत्य घटनेवर आधारित ‘स्त्री’ ?


कर्नाटक आणि आंध्रप्रदेशमधील घटनेवर आधारीत आहे. १९९० साली कर्नाटकमध्ये ‘नाले बा’ म्हणजेच  ‘ओ स्त्री कल आना’. असे म्हटले जाते की, एका स्त्रीचे प्रत्येकाचे दार वाजवायची. जर तुम्ही दरवाजा उघडला तर ती समोरच्या माणसाला मारुन टाकायची. ती चेटकीण येऊ नये म्हणूनच दरवाज्यावर ‘ओ स्त्री कल आना’ असे लिहिले जायचे. या घटनेची प्रेरणा घेऊनच हा चित्रपट तयार करण्यात आला आहे.