अजिंक्य ननावरेचं ‘स्टाईल स्टेटमेंट’

अजिंक्य ननावरेचं ‘स्टाईल स्टेटमेंट’

मराठी 'साजणा' मालिकेतील ‘राजकुमार’ म्हणजेच अभिनेता अजिंक्य ननावरेने चाहत्यांच्या मनात एक विशेष स्थान मिळवलं आहे. काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या ‘बिग बॉस मराठी 2’ सिझनमधील फायनलिस्ट शिवानी सुर्वेशी त्याचं अफेअर असल्याचीदेखील चर्चा आहे. शिवानी आणि अजिंक्यने यापूर्वी ‘तू जीवाला गुंतवावे’ या मालिकेत एकत्र काम केलं होतं. सध्या साजणा मालिकेत अंजिक्य एक प्रभावी भूमिका साकारत आहे. 

अजिंक्यची ‘साजणा’मधील भूमिका

साजणा मालिकेतील ‘राजकुमार’ हा रमाचा भाऊ आहे. राजकारणात नाव मिळवण्याची ईच्छा तो मनात बाळगून आहे. त्यामुळेच स्थानिक राजकारणात प्रभाव असणाऱ्या व्यक्तींसोबत असण्याचा त्याचा नेहमी प्रयत्न असतो. राजकारणात टिकून राहण्यासाठी, गरज पडेल ते करण्याची त्याची तयारी आहे. म्हणूनच, मनाने चांगला असलेला राजकुमार, प्रसंगी गैरमार्गाचा अवलंब करताना सुद्धा दिसतो. असं असूनही, कुटुंबाप्रती असलेले त्याचे प्रेम, जिव्हाळा याची तुलना इतर कशाशीही होऊ शकत नाही. विशेषतः रमाविषयी त्याला अधिक आपुलकी आहे. राजकुमार म्हणजे, काहीसं दिशाहीन आयुष्य जगणारा, छोट्या गावातील एक तरुण! अंजिक्य ननावरेच्या मते त्याने त्याच्या स्वतःच्या गावात सुद्धा असे अनेकजण पाहिले आहेत. त्यामुळेच त्यांचे आयुष्य, जीवनाची पद्धत अंजिक्यला काही प्रमाणात ठाऊक आहे. ज्यामुळे जीवन पडद्यावर मांडणे हे अजिंक्यसाठी नक्कीच आव्हानात्मक काम नाही. नाशिकजवळील एका छोट्याशा खेड्यात हा राजकुमार राहतो. तेथील भाषेचा लहेजा बोलण्यात आणण्याचा  प्रयत्न अंजिक्य करत असतो. त्या भागातील विशिष्ट शब्द अजिंंक्य शिकून घेतले आहेत. 

साजणामधील इतर कलाकार आणि अजिंक्य

साजणा मालिकेत अजिंक्यसोबत अभिजित चव्हाण, सुहास परांजपे यांच्यासारखे दर्जेदार कलाकार आहेत. त्यांच्यासोबत काम करणे ही एक एक मोठी पर्वणीच आहे असं अजिंक्यच म्हणणं आहे. या सेटवरील संपूर्ण टीमसोबत काम करत असताना त्याला खूप काही शिकायला मिळत आहे.  अजिंक्य म्हणतो की, “अभिजित चव्हाण सेटवर असणं म्हणजे कामातील आनंद द्विगुणित होण्यासारखं आहे. त्यांच्याकडे वातावरण हलकंफुलकं ठेवत काम करण्याची त्याची हातोटी उत्तम आहे. मालिकेच्या मुख्य भूमिकेतील पूजा बिरारी आणि अभिजित श्वेतचंद्र अत्यंत मेहनती कलाकार आहेत. सेटवरची माझा खास मित्र, म्हणजे सुयोग गोऱ्हे. थट्टामस्करी करणं आणि मस्ती करणं यात आम्ही दोघंही म्हणजेच अगदी जोडीने नेहमी आघाडीवर असतो. एका सीनच्या वेळी घडलेली गंमत सांगताना त्याने सांगितलं की, “एकदा एक प्रसंग पावसात चित्रित करायचा होता. सगळ्यांनी मिळून, पाऊस आणि चित्रीकरण या दोन्हीचा झकासपैकी आनंद लुटला. मजा, मस्ती आणि शूटिंग अशा सर्वच गोष्टी हा सीन शूट करत असताना अनुभवता आला.”अशाच प्रकारती मौजमजा शूटिंगदरम्यान सतत सुरू असते. ज्यामुळे काम करण्याचा आनंद नक्कीच द्विगुणित होतो. 

अजिंक्यचं ‘स्टाईल स्टेटमेंट’

अजिंक्यला अगदी साधा पेहराव आवडतो. साधे आणि आकर्षक रंगाचे टीशर्ट्स व जीन्स  त्याला फार आवडतात. स्वतःला सुटसुटीत वाटतील, आरामदायक ठरतील असे कपडे घालणे, हेच त्याचे स्टाईल स्टेटमेंट आहे. शिवाय स्वतःची ओळख जपणे व सत्त्व टिकवणे हे खरं स्टाईल स्टेटमेंट आहे असं त्याचं मत आहे.

हे ही वाचा -

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

अधिक वाचा -

Ash लवकरच दिसणार डबल रोलमध्ये, एका हटके भूमिकेत

Good News: कल्की कोचलिनने दिली गोड बातमी, केला होणाऱ्या बाळाबद्दल खुलासा


'प्रेम पॉयजन पंगा'मुळे सुरू झालाय प्रेक्षकांच्या मनात दंगा