सुभाष घईंचा मराठी सिनेमा 'विजेता' या दिवशी झळकणार बॉक्सऑफिसवर

सुभाष घईंचा मराठी सिनेमा 'विजेता' या दिवशी झळकणार बॉक्सऑफिसवर

'सनई चौघडे', 'वळू' आणि 'संहिता' अशा दर्जेदार चित्रपटांनंतर शो मॅन सुभाष घई आणि मुक्ता आर्ट्स घेऊन येत आहेत आगामी चित्रपट 'विजेता'.  येत्या  12मार्च  रोजी हा रिलीज होणार आहे. या चित्रपटात नामांकित कलावंत काम करत आहेत. ज्यामध्ये सुबोध भावे, पुजा सावंत, प्रीतम कागणे, सुशांत शेलार, माधव देवचके, मानसी कुलकर्णी, तन्वी किशोर, देवेन्द्र चौगुले, दिप्ती धोत्रे, कृतिका तुळसकर आणि गौरीश शिपूरकर ही कलाकार मंडळी सिनेमामध्ये दिसणार आहे. खेळाची पार्श्वभूमी असलेला हा चित्रपट प्रेक्षकांची उत्सुकता वाढवणारा आहे हे लक्षात येते. या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक अमोल शेटगे आहेत. राहुल पुरी सिनेमाचे निर्माते आहेत.  

(वाचा : लग्न ठरवण्यापूर्वी रणबीर-आलिया शोधताहेत हनिमूनसाठी जागा)

माधव देवचकेला मिळाला सुभाष घईंचा सिनेमा

माधव देवचके बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच त्याला शोमॅन सुभाष घईंचा चित्रपट मिळाला आहे. सुभाष घईंच्या मुक्ता आर्ट्स या चित्रपट निर्मिती संस्थेच्या 'विजेता' या सिनेमात माधव देवचके मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अमोल शेडगे करणार आहेत. नुकतंच माधवच्या 'विजेता' सिनेमाचा मुहूर्त झाला. सिनेमाच्या मुहूर्ताला सुभाष घईंसह सुबोध भावे, पूजा सावंत, सुशांत शेलार हे सिनेमातले अन्य कलाकारही उपस्थित होते. विजेता चित्रपटाच्या चित्रिकरणालाही आता सुरूवात झाली आहे. याविषयी माधव देवचके म्हणाला, 'बिग बॉस केल्यानंतर लगेचच सुभाष घईंसारख्या मोठ्या फिल्ममेकरचा सिनेमा मिळाला, हे माझं भाग्यच म्हणायला हवं. सुभाष घईंसारख्या दिग्गज फिल्ममेकरच्या सिनेमात काम करायला मिळणं ही निश्चितच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आजवर त्यांचे अनेक सुपरडुपर हिट सिनेमे पाहतच मी लहानाचा मोठा झालोय आणि आता त्यांच्या मुक्ता आर्ट्सच्या बॅनरच्या चित्रपटात काम करायला मिळणं, हे जणू स्वप्नवतच.'

(वाचा : ‘थ्री इडियट्स’मधला मिलीमीटर ‘या’ मराठी सिनेमात झळकणार प्रमुख भूमिकेत)

फॉरेनची फॅन ! माधव देवचकेला कुवेतवरून भेटायला आली चाहती

अभिनेता माधव देवचकेने नुकतीच आपल्या चाहत्यांची भेट घेतली. माधव देवचकेला भेटायला त्याचे फक्त महाराष्ट्रातलेच नाही तर देशभरातून फॅन आले होते. एक फॅन तर चक्क देशाबाहेरून आली होती. माधवने आपल्या वेगवेगळ्या भूमिकांनी रसिकांच्या मनावर गेली काही वर्ष कसं अधिराज्य केलं त्याचीच ही प्रचिती होती. सूत्रांनुसार, माधव आणि त्याच्या टीमने जेव्हा सोशल मीडियावरून माधवला भेटण्याची संधी त्याच्या फॅन्सना मिळत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर अनेक फॅन्सकडून माधवला भेटण्याची उत्सुकता व्यक्त केली. बिग बॉस संपल्याच्या पाच महिन्याने झालेल्या ह्या फॅन-मीटिंगवरून स्पष्ट दिसून येत होते की, बिग बॉसमध्ये माधवने आपल्या फॅन्सवर कशी छाप सोडली आहे.

(वाचा : सायलीच्या लग्नाचा रंगतदार 'बस्ता', सिनेमाचं पोस्टर लाँच)

अभिनेता माधव देवचके याविषयी म्हणाला, “मी गेली 15 वर्ष सिनेमा, नाट्य, मालिका अशा विविध माध्यमांमध्ये काम करतोय. मराठी-हिंदी दोन्ही भाषांमध्ये काम केले. अनेकदा चाहत्यांनी भेटून मला शुभेच्छा दिल्या. पण पहिल्यांदाच अशा पद्ध्दधतीनं फॅनमीटमध्ये चाहत्यांना भेटलो. हे माझे कट्टर चाहते असल्याचा प्रत्यय आला. माझा सिनेसृष्टीतला प्रवास ते बारकाईने फॉलो करत असल्याचे उमगले. त्यांचे प्रेम. जिव्हाळा याने मी भारावून गेलो. ते मला प्रेमाने ‘आपला माधव’ कसं का संबोधतात ते समजलं.” कुवेतच्या चाहतीबद्दल विचारल्यावर माधव म्हणाला, “कुवेतला राहणारी प्रियंका जोशी माझी खूप वर्षांपासूनची चाहती आहे. 'हमारी देवरानी' या हिंदी मालिकेपासून तिने माझा अभिनय प्रवास पाहिला आहे. तिने फॅनमीटला येणं हे खरं तर माझ्यासाठी प्लेझंट सरप्राइज होतं. हा जिव्हाळा भारावून टाकणारा आहे. तसेच आता आणखीन जबाबदारीने काम केले पाहिजे, याची जाणीव करून देणारा आहे.”

हे देखील वाचा :
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.