SaReGaMaPa Little Champs 2019: नागपूरच्या सुगंधा दातेने मारली बाजी

SaReGaMaPa Little Champs 2019: नागपूरच्या सुगंधा दातेने मारली बाजी

झी टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या सिगिंग रिएलिटी टीव्ही शो 'सा रे गा मा पा' च्या फिनाले खूपच दमदार झाला. या रिएलिटी शोमध्ये भाग घेणाऱ्या कंटेस्टंट्सने पुन्हा एकदा एक से एक परफॉर्मन्स दिले.

नागपूरच्या सुंगधा दातेने मारली बाजी

या टीव्ही शोच्या टॉप 6 फायनलिस्टमध्ये ट्रॉफी जिंकण्यासाठी चढाओढ होती. या टॉप 6 मध्ये बाजी मारली ती नागपूरच्या सुगंधा दातेने. सुगंधाने या फिनालेमध्ये दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीच्या ‘मिस्टर इंडिया' चित्रपटातील 'हवा हवाई' हे गाण गाऊन सगळ्याचंच लक्ष वेधलं. सुगंधाला जिंकल्याबद्दल ट्रॉफी आणि पाच लाख रूपये एवढं रक्कम मिळाली.


सुगंधाच्या आवाजाची तुलना श्रेया घोषालशी

या रिएलिटी शोमध्ये सुगंधाच्या आवाजाची तुलना नेहमी गायिका श्रेया घोषालच्या आवाजाशी होत असे. सुगंधाने या आधीही इंडियन आयडॉल ज्युनियरमध्येही भाग घेतला होता. पण तेव्हा ती टॉप 5 मध्येही जागा मिळवू शकली नव्हती. सुगंधा वयाच्या 6 वर्षांपासून गायनाचं प्रशिक्षण घेत आहे. गायनातील करिअरसाठी सुगंधाच्या कुटुंबाने मुंबईत येऊन राहण्याचा निर्णय घेतला आणि आज त्या प्रयत्नांना यश मिळालं आहे.


या दोघांना सुगंधाने टाकलं मागे

सुगंधा दातेच्या सुंदर आवाजाने तिने 5 स्पर्धकांना मागे टाकलं आणि अखेर ही ट्रॉफी मिळवली. तर प्रीतम आचार्य सेकंड रनर अप ठरला तर मोहम्मद फैज हा पहिला रनरअप ठरला. तर आस्था दास, अनुष्का पात्रा आणि आयुषी केसी हे शोचे बाकी तीन फाईनलिस्ट होते.


जजेसनेही दिली सुंदर दाद


या टीव्ही रिएलिटी शोमध्ये जजच्या भूमिकेत सिंगर रिचा शर्मा, शान आणि अरमान मलिक होते. तब्बल तीन महिन्यापासून सुरू असलेल्या या टीव्ही शोचं होस्टींग रवी दुबे करत होता. तसंच या फिनालेमध्ये पाहायला मिळाली कविता कृष्णमूर्ती आणि कुमार सानू यांची धमाल जुगलबंदी. 


शाहिद आणि कियाराची उपस्थिती


या शोच्या फिनालेमध्ये शाहिद कपूर आणि कियारा अडवाणीने जज म्हणून भाग घेतला होता. हे दोन्ही बॉलीवूड स्टार टीव्ही रिएलिटी शोमध्ये आपल्या आगामी 'कबीर सिंग' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोचले होते.


हेही वाचा -


अर्थच्या रिमेकमध्ये स्मिता पाटील यांची भूमिका साकारणार ‘ही’ अभिनेत्री


म्हणून एकता कपूर करत नाही तिच्या मुलाचे फोटो शेअर…


नागराजच्या ‘झुंड’साठी महानायक नागपूरात