शाहरूख खानची लेक स्किन टोनमुळे झाली ट्रोल, सुहानाने दिलं बेधडक प्रत्युत्तर

शाहरूख खानची लेक स्किन टोनमुळे झाली ट्रोल, सुहानाने दिलं बेधडक प्रत्युत्तर

रंगभेदामुळे चिडवलं जाणं हा विषय अनेकांसाठी नक्कीच त्रासदायक ठरू शकतो. अनेकांना त्यांच्या ब्राऊन स्किन टोनमुळे ट्रोल केलं जातं. चित्रपटसृष्टीसारख्या ग्लॅमरस दुनियेतही याची काही उदाहरणे पाहायला मिळतात. बऱ्याच कलाकारांना आणि त्यांच्या मुलांना फक्त त्यांच्या स्किन टोनमुळे वेगळं समजलं जातं. शाहरूख खानची मुलगी 'सुहाना खान'ने  या अशा काही ट्रोलर्संना सणसणीत प्रत्यु्त्तर सोशल मीडियावरून दिलं आहे. तिने नुकतीच एक पोस्ट सोशल मीडियावरून शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने तिचा एक फोटो शेअर केला आहे आणि रंगभेदाबाबत एक लांबसडक मेसेज लिहिलेला आहे. ज्यामधून तिने स्किनटोनवरून तिला चिडवणाऱ्या लोकांना चांगलाच टोला हाणला आहे. 

सुहानाने या पोस्टमधून दिलं सडेतोड उत्तर

सुहाना खानने रंगभेदावरून चिडवणाऱ्या लोकांसाठी हा मेसेज लिहिलेला आहे. तिने तिच्या फोटोच्या कॅप्शनमध्ये असं शेअर केलं आहे की, "सध्या अशा अनेक गोष्टी सुरू आहेत. हा मुद्दा असा आहे की जो वेळीच ठीक करणं गरजेचं  आहे. कारण हे फक्त माझ्याच बाबतीत नाही तर त्या सर्व तरूण मुला-मुलींसाठी आहे ज्यांना काही कारण नसताना एका हीन भावनेतून मोठं व्हावं लागतं. माझ्याबाबतही अशा काही टीका झालेल्या आहेत. मी जेव्हा बारा वर्षांची होते तेव्हा काही मोठ्या महिला आणि पुरूषांनी मला मी माझ्या स्किन टोनमुळे मी विद्रूप दिसते असं सांगितलं होतं. वास्तविक ही मंडळी तेव्हा पौढ वयाची होती. वाईट या गोष्टीचं आहे की आपण सर्वजण भारतीय आहोत त्यामुळे आपला स्किन टोन ब्राऊन असणं ही एक स्वाभाविक गोष्ट आहे हे कुणालाच समजत नाही. होय आपण निरनिराळ्या शेडचे आहोत आणि तुम्ही कितीही मॅलेनिनपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला तरी ते करू शकत नाही. आपल्याच लोकांचा तिरस्कार करणं म्हणजे तुम्ही एक दुःखकारक असुरक्षित जीवन जगत आहात. सोशल मीडियाचही यासाठी वाईट वाटतं, भारतीय मॅचमेकिंग किंवा तुमचे स्वतःचे कुटुंब तुम्हाला पटवून देतं, की जर तुम्ही 5"7 आणि गोरवर्णाच्या नाहीत म्हणजे तुम्ही सुंदर नाही. मला असं वाटतं की तुम्हाला हे जाणून बरं वाटेल की मी 5"3 आणि ब्राऊन स्किन टोनची आहे आणि यामुळे मी खूप खुशदेखील आहे. तुम्हीदेखील तुमच्याबाबत असंच असायला हवं."

सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे सुहाना -

शाहरूख खानची मुलगी 'सुहाना खान' सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह आहे. लाईम लाईटमुळे तिच्याबाबत नेहमीच सोशल मीडियावर चर्चा सुरू असते. सुहाना सोशल मीडियावर तिचे फोटोज, व्हिडिओज शेअर करत असते. बऱ्याचदा तिच्या पोस्ट व्हायरल होतात आणि ती कधीकधी ट्रोलदेखील होते. सुहनाने ही सणसणीत पोस्ट ट्रोलर्ससाठी शेअर करून सर्वांची तोंड बंद केली आहेत. कारण भारतीयांचा मुळ स्किन टोनच ब्राऊन आहे. मग रंगभेदावरून आपल्याच लोकांकडून चिडवलं जाणं हे खूपच त्रासदायक आहे. सुहानाने शेअर केलेली पोस्ट काहींची बोलती बंद करणारी तर काहींना जगण्याचं  प्रोत्साहन देणारी आहे. ज्या लोकांना स्किन टोनवरून हिणवलं जातं त्यांच्यासाठी सुहानाने दिलेलं हे उत्तर एक नवी उमेद देणारं ठरू शकतं.