बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सुहाना खान झाली सज्ज

बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सुहाना खान झाली सज्ज

शाहरूख खानची मुलगी सुहाना खान हिने बॉलीवूडमध्ये डेब्यू करण्याची तयारी सुरू केली आहे. बॉलीवूडच्या किंग खानची मुलगी असल्यामुळे ती सतत सोशल मीडियावर चर्चेत असते. तिच्या ग्लॅमरस लुकपासून फॅशन ट्रेंडपर्यंत सर्वच गोष्टी तिच्या चाहत्यांना आवडतात. ज्यामुळे ती स्टार किड असतानाच एखाद्या सुपरस्टारप्रमाणे वावरत असते. नुकतंच सुहाना खानने तिचं ग्रॅज्युऐशन पूर्ण केलं आहे. ज्यामुळे ती लवकरच बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार अशी चर्चांना अक्षरशः उधाण आलं आहे. किंग खानची मुलगी असल्यामुळे तिला चित्रपट मिळणं मुळीच कठीण नाही. मात्र सुहानाला आधी अभिनयाचं रितसर प्रशिक्षण घ्यायचं  आहे. यासाठीच तिने न्युयार्क युनिव्हर्सिटीत प्रवेश घेतला आहे. ज्यामुळे तिच्या चाहत्यांना तिला चित्रपटात पाहण्यासाठी आणखी काही वर्षे वाट पाहावी लागणार आहे. शाहरूख खानची पत्नी गौरी खानने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये सुहाना खान तिच्या युनिर्व्हसिटीतील अॅडमिशनंतर पहिला दिवस सेलिब्रेट करताना दिसत आहे. 

View this post on Instagram

❤️🦋

A post shared by Suhana Khan (@suhanakhanoffcial) on

गौरी खानेने केला शेअर व्हिडिओ

गौरी खानने हा व्हिडिओ शूट केला आहे. या व्हिडिओमध्ये सुहाना खान तिच्या अॅडमिशनच्या पहिल्याच दिवशी कॉलेजच्या पायऱ्या चढत जात आहे असं दिसत आहे. सुहानाने डेनिम शॉट, व्हाईट टीशर्ट, स्नीकर्स घातलेले आहेत. काळ्या रंगाची बॅग तिच्या  खांद्यावर अडकवलेली आहे. आणि तिच्या अभिनय दुनियेतील प्रवेशाची प्रथम पायरी ती चढत आहे गौरीला या व्हिडिओतून सांगायचं आहे असं वाटत आहे. आपली मुलगी अभिनेत्री होण्यापूर्वी अभिनयाचं रितसर शिक्षण घेत आहे याचा गौरीला प्रचंड अभिमान झालेला दिसत आहे. या व्हिडिओवर काही चाहत्यांनी सुहानाला पाहून त्यांना कुछ कुछ होता है मधील राणी मुखर्जीची आठवण आली असं म्हटलं आहे. 

सुहाना करतेय अभिनय क्षेत्रात पदार्पण

सुहानाने तिचं ग्रॅजुऐशन लंडनमध्ये पूर्ण केलं आहे. जेव्हा सुहानाने तिचं शिक्षण पूर्ण केलं तो क्षण शाहरूख आणि गौरीला अतिशय आनंद झाला होता. शाहरूखने याबाबत स्वतः आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या होत्या. शाहरूखने तेव्हा सुहानाचा आणि स्वतःचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. ज्यासोबत त्याने शेअर केलं होतं की, चार वर्षे पूर्ण झाली आहे. ऑर्डिगर्ली आता ग्रॅज्यूएट झाली आहे. शेवटचा पिझ्झा आणि शेवटची ट्रेन, खऱ्या जीवनातील पहिलं पाऊल. शाळा संपली आता अभ्यास करावा लागणार नाही.” ज्यावरून मुलांचं शिक्षण पूर्ण झाल्यावर पालकांना होणारा आनंद दिसून येत होता. आता सुहाना तिच्या अभिनय क्षेत्रातील बेसिक शिक्षण पूर्ण करण्याच्या प्रथम पायरीवर आहे त्यामुळे सहाजिकच शाहरूख आणि गौरीच्या आनंदाला पारावार राहीला नसणार. शाहरूखने एका मुलाखतीत सांगितलं होतं की सुहानाला अभिनयाची आवड आहे मात्र तिला आधी त्याचं प्रशिक्षण घ्यावं लागेल. मगच ती या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी सक्षम होऊ शकते. आता सुहानाने त्या दिशेने तिचं पहिलं पाऊल उचललं आहे. ज्यामुळे शाहरूखच्या चाहत्यांना खऱ्या अर्थाने आनंद झाला आहे. शिवाय यामुळे लवकरच सुहानाला चित्रपटात पाहण्याचं स्वप्न पूर्ण होईल हे नक्की झालंय.

अधिक वाचा

विद्या बालनलादेखील करावा लागलाय ‘कास्टिंग काऊच’चा सामना, सांगितला अनुभव

अभिनयाचे धडे गिरवण्यासाठी मुंबईतील बेस्ट अॅक्टींग स्कूल्स Best Acting Schools In Mumbai

अभिनेत्री ज्यांनी दिग्दर्शनातही आजमावला हात

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम