Lockdown असूनही घराबाहेर पडला कॉमेडियन सुनील ग्रोव्हर आणि ...

Lockdown असूनही घराबाहेर पडला कॉमेडियन सुनील ग्रोव्हर आणि ...

सध्या देशभरात LockDown आहे. घराखाली कामाशिवाय उतरण्यास मज्जाव करण्यात आला आहे. अनेक सेलिब्रिटींनी या सगळ्याला समर्थन देत घरीच राहण्याचा सल्ला त्यांच्या फॅन्सना दिला आहे. पण कॉमेडियन सुनील ग्रोव्हरला हा निर्णय काही पटलेला दिसत नाही.तो चक्क घराबाहेर पडला खाली उतरला आणि मग काय पोलिसांनी त्याला चांगलाच बदडला. अरेरे थांबा सुनीलला शिव्या घालू नका थोडं थांबा कारण हे सुनीलने खरं केलं नाही तर तुम्हाला कळावे म्हणून काहीतरी केले आहे. जाणून घ्या. सुनीलला नेमकं काय करायचं आहे ते.

कोरोनामुळे भारतीयांना मिळत आहेत सोशल डिस्टन्सिंगचे धडे

 

सुनीलने दिला मेसेज

आपण टीव्हीवर आजही बघत आहोत की, अनेक जण आजही त्यांच्या घरातून बाहेर पडून उगाचच काही ठिकाणी गर्दी करत आहेत. लोकांनी शिस्त न पाळल्यामुळेच पोलिसांना चक्क लोकांवर लाठीचार्ज करावा लागत आहे. आता हे थोडसं मिश्किलपणे मांडण्याचा प्रयत्न सुनील ग्रोवरने केला आहे. सुनीलने त्याच्या एका गाण्यातील त्याचा फोटो आणि त्याचाच एक सीनचा फोटो वापरत एक मीम तयार केले आहे. त्यामध्ये त्याने ‘घर से निकलते ही’... आणि घरातून बाहेर पडल्यानंतर आणि पोलिसांनी पकडल्यानंतर त्याला चांगलेच चोपले आहे असे दाखवले आहे. 

तुम्हाला दिला महत्वाचा संदेश

आता सुनीलने हे सगळे का केले तर आपल्यासाठी कितीही सांगितले तरी अजूनही काही लोक या सगळ्या गोष्टी गांभीर्याने घेत नाहीत. त्यांना अजूनही असे वाटते की, मला असे काहीत होणार नाही. आम्ही सुदृढ आहोत.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी 21 दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे. ज्या सुट्टीसाठी आपण नेहमी तळमळतो ती सुट्टी आता सुदैवाने मिळाली आहे. त्याचं सोनं करण्याऐवजी आपल्यातील अनेक लोक बाहेर उगाचचं पडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे तुम्ही आता तरी बाहेर पडू नका असेच त्याला सांगायचे आहे. 

कोरोनामध्येही उर्वशी रौटेलाचा हॉट अंदाज, व्हिडिओ होतोय व्हायरल

View this post on Instagram

Ha ha Stay at home for God sake.

A post shared by Sunil Grover (@whosunilgrover) on

कॉमेडियनची कॉमेडी असतेच खास

सुनील ग्रोवरला आता सगळेच ओळखतात. सुनील ग्रोवरची कॉमेडी तुम्हाला हसवणार नाही असे मुळीच होणार नाही. त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन असे काही मीम्स शेअर केले आहेत. पोलिसांना हात उगारण्याची गरज का भासते आहे ते सांगण्यापासून  त्याने लोकांना हसवण्यासाठीही काही मीम्स शेअर केले आहेत. त्यापैकी त्याने नव्याने शेअर केलेल्या मीम्समध्ये तुम्हाला साधारण 21 दिवसांनी बाहेर पडल्यानंतर मुलींची नेमकी कशी अवस्था होईल हे दाखवले आहे. म्हणजे मुलींना दाढी आली आहे वगैरे. आता या पुढे 21दिवस म्हणजे हे सगळं संपेपर्यंत तरी आपल्याला या सोशल मीडियाची गरज आहे. 

View this post on Instagram

🙈

A post shared by Sunil Grover (@whosunilgrover) on

सुनील घरीच राहून करतोय काम

Instagram

आता सगळेच कलाकार सध्या घरी आहेत ते घरी राहून आपला वेळ घालवत आहेत. सुनीलचेही काही वेगळे नाही. तोही घरी राहून आपला वेळ घालवत आहे. त्यामुळे आता तुमचे सेलिब्रिटीही घरी राहून जर वेळ घालवत आहेत. तर तुम्ही सुद्धा तुमचा वेळ घरीच घालवला तर फारच बरे आहे. 


आता सुनीलला शिव्या घालू नका त्याने सांगितलेली गोष्ट गांभीर्याने घ्या. कामाशिवाय घराबाहेर पडू नका. 

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे  20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.