अरबाज खानसमोर का ढसाढसा रडली सनी लिओनी

अरबाज खानसमोर का ढसाढसा रडली सनी लिओनी

पॉर्नस्टार सनी लिओनी सध्या तिच्या विधायक कामांमुळे अधिक चर्चेत असते. तिने एका मुलीला दत्तक घेतले आणि सरोगसीमधून तिला दोन जुळी मुलं झाली. पण आता सनी एका वेगळ्या गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. कारण सनी लिओनी चक्क अरबाज खानसमोर ढसाढसा रडली आहे. ती नेमकी का रडली?  या मागेही मोठे कारण आहे. जाणून घेऊन सनी लिओनीचे रडण्यामागचे कारण…


अर्जुन रामपाल पुन्हा होणार बाबा


नाही वाचवता आले त्याला


सनी लिओनी अरबाज खानच्या Pinch या टॉक शो मध्ये गेस्ट म्हणून आली होती.तिच्यासाठी काम करणाऱ्या प्रभाकरसंदर्भात विचारणा केल्यावर तिला तिचे अश्रू अनावर झाले ती म्हणाली की, प्रभाकरची किडनी फेल झाली होती. त्याला वाचवण्यासाठी आम्ही अनेक प्रयत्न केले. पण तो वाचू शकला नाही याचे मला दु:ख आहे. त्यामुळे माझी गरज कोणाला आहे का? याचा शोध घेऊन मी त्या व्यक्तिला मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करते.


मला चांगला माणूस घडवायचे आहे

आता सनी लिओनी ही एक पॉर्नस्टार होती हे सगळ्यांनाच माहीत आहे. तिने जेव्हा पॉर्न इंडस्ट्रीसोडून  बॉलीवूडमध्ये आली तेव्हा तिच्याबद्दल बरेच काही बोलले गेले. पण कालांतराने तिला लोकांनी स्विकारले. तिला सोशल मीडियावरुन मुलांच्या करिअर संदर्भात प्रश्न विचारला की, तुझी मुलं तुझा फॅमिली बिझनेस पुढे चालवणार का? याचा चुकीचा आणि निगेटिव्ह अर्थ न घेता ती म्हणाली की, माझे स्वत:चे ब्युटीलाईन आणि परफ्युम्स आहेत ते माझ्या मुलांनी सांभाळले तर मला त्याचा आनंद आहे. मला माझ्या मुलांना एक चांगला माणूस बनवायचे आहे त्यासाठीच मी चांगली कामं करत आहे.


निसाच्या डेब्युवर काय म्हणाली काजल, वाचा सविस्तर बातमी


नकारात्मक बोलणाऱ्यांचे आभार


सनीने नकारात्मक प्रतिक्रियांचे स्वागत केले आहे ती म्हणाली की, माझ्या सोशल मीडियापेजवर लोकांच्या अनेक कमेंट असतात. जे मला फॉलो करतात चांगले समजतात ते चांगल्या कमेंट देऊन मला नेहमीच चांगल्या कामांसाठी प्रेरित करतात. पण जे वाईट कमेंट देतात त्यांचाही मला राग नाही. कारण ते त्यांची कमेंट लिहून झाल्यानंतर त्यावर काय प्रतिक्रिया येते हे पाहण्यासाठी तासन तास माझ्या पेजवर घालवतात याचा मला आनंद आहे. त्यामुळे माझा  तिरस्कार करुनही अप्रत्यक्षरित्या ते माझ्याशी जोडलेले असतात. त्यामुळे नकारात्मक बोलणाऱ्यांचे मनापासून आभार


SUNNY LEONE 1


2 हजार 20 लोकांना केले आतापर्यंत ब्लॉक


अनेकजण माझ्या सोशल मीडियावर अत्यंत घाणेरड्या कमेंट देतात ते आपोआप डिलीट होतात. मी आतापर्यंत किमान 2 हजार 20 लोकांना ब्लॉक केले आहे. जर कोणी माझ्या पेजवर अशापद्धतीने कमेंट करत असतील तर मी त्यांना मी सरळ ब्लॉक करुन टाकते.


हॉरर चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान विकी कौशल झाला जखमी


 अरबाज खानचा शो हिट


अरबाज खान सध्या युट्युबवर एक शो होस्ट करत आहे. त्याने नाव आहे  Pinch.या कार्यक्रमामध्ये तो सेलिब्रिटीजना बोलावतो. पण हा एक सर्वसाधारण इंटरव्ह्यू नाही तर यामध्ये लोकांनी सोशल मीडियावर दिलेल्या नकारात्मक कमेंटवर सेलिब्रिटींची प्रतिक्रिया मागतो.आतापर्यंत आलेल्या सेलिब्रिटींनी त्यांच्याबद्दल नकारात्मक बोलणाऱ्यांना त्याची उत्तरे दिलेली आहेत.