सनी लिओनने मारली फेसबुकवर बाजी

सनी लिओनने मारली फेसबुकवर बाजी

फेसबुकवर तब्बल 23 मिलीयन फॉलोअर्स असलेली सनी लिओन (Sunny Leone) बॉलीवूडची सर्वाधिक इंगेजिंग अभिनेत्री बनलीय. आपल्या सोशल मीडिया अपडेट्स आणि ट्रेंडी लुक्समुळे सनीने आपल्या चाहत्यांवर मोहिनी घातलेली दिसून येतेय. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या रेटिंगनुसार, फेसबुक (Facebook) वर ‘मोस्ट एंगेजिंग एक्ट्रेस’ बनलेल्या सनी लिओनने 100 गुणांसह बाकी सर्व बॉलीवूड अभिनेत्रींना मागे टाकून नंबर वन स्थान पटकावलं आहे.

सनी लिओननंतर अभिनेत्री अनुष्का शर्मा दुस-या क्रमांकावर आहे. फेसबुकवर 9.8 मिलीयन फोलोअर्स असलेल्या अनुष्का शर्माचे विराट कोहलीसोबतच्या व्हेकेशनचे फोटो आणि अपडेट्सना चाहत्यांची पसंती मिळाली आणि त्यामुळेच 73.22 गुणांसह अनुष्का, दूसरी मोस्ट इंगेजिंग बॉलीवूड अभिनेत्री झाली आहे. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया या मिडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे.

Instagram

सनी लिओनचे दुबई टूरचे फोटो आणि व्हिडीओज असो वा तिच्या कुटुंबियांसोबतचे फोटो असो वा तिच्या स्टाईलिश फोटोशूट्स आणि डान्स रिहर्सल्सचे व्हिडीओज यामुळे सनीच्या चाहत्यांची तिच्या फेसबुक अकाउंटवर इंगेजमेंन्ट वाढलेली दिसून आली आहे. तर अनुष्काच्या भूतान ट्रिपच्या फोटोंना तिच्या आणि विराटच्या चाहत्यांची पसंती मिळालेली दिसून आलीय.

फेसुबकवर 40 मिलीयन फोलोअर्स असलेल्या प्रियांका चोप्राला 60.72 गुणांमुळे तिसरं स्थान मिळालं आहे. काही दिवसांसाठी दिल्लीत आलेल्या प्रियांकाचे फेसबुकवर कमी अपडेट्स पाहायला मिळाले. तर फेसबुकवर 14 मिलीयन फॉलोअर्स असलेल्या कतरिना कैफचे व्होग मॅगझिनसाठी केलेलं हॉट फोटोशूट आकर्षण ठरलं. त्यामुळेच 58.42 गुणांसह ती लोकप्रियतेत चौथ्या क्रमांकावर आहे. 23 मिलीयन फोलोअर्स असलेल्या सोनाक्षी सिन्हाच्या दबंग टूरच्या अपडेट्समूळे ती मोस्ट इंगेजिंग सेलिब्रिटींमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे.

स्कोर ट्रेंड्स इंडियाचे सह-संस्थापक अश्वनी कौल या संदर्भात म्हणतात की, “फेसबुकसोबतच आम्ही मीडियामधल्या 14 भारतीय भाषांमधील 600 हून अधिक बातम्यांच्या स्त्रोतातून डेटा गोळा करतो. यामध्ये ट्विटर, मुद्रित प्रकाशने, सोशल मीडियावरील व्हायरल न्यूज, ब्रॉडकास्ट आणि डिजीटल प्लॅटफॉर्म यांचा समावेश आहे. विविध अत्याधुनिक अल्गोरिदममुळे आम्हाला या प्रचंड प्रमाणातील डेटावर प्रक्रिया करण्यास मदत होते आणि आम्ही बॉलीवूड सेलिब्रिटींच्या स्कोर आणि रँकिंगपर्यंत पोहोचू शकतो.”

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.