माझ्या नवऱ्याला मी समलैंगिक वाटले होते - सनी लिओनी

माझ्या नवऱ्याला मी समलैंगिक वाटले होते - सनी लिओनी

सनी लियोनी आणि तिचा नवरा डॅनियल वेबर हे जोडपं आज बॉलीवूडमधील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहे. हे दोघंही एकमेकांना गेली 12 वर्ष ओळखत आहेत. त्यांच्या लग्नाला आता तब्बल 9 वर्ष झाली आहेत. तसंच त्यांना निशा, अशर आणि नोआह ही तीन मुलंही आहेत. कपल म्हणून हे दोघंही खूप खूष आहेत. पण या दोघांच्या भेटीची कहाणी पूर्णतः फिल्मी आहे. जाणून घ्या कशी घडली या दोघांची भेट आणि सनी लिओनीने केलेल्या खुलाश्याबाबत.

नुकताच सनीने एक इंटरव्ह्यू दिला. या इंटरव्ह्यूमध्ये तिने तिच्या मॅरीड लाईफबाबत एक धक्कादायक खुलासा केला. एका इंग्रजी वेबसाईटला तिनेही मुलाखत दिली होती. ज्यात तिने सांगितलं की, आम्ही लास व्हेगासमध्ये होतो आणि मी माझ्या गर्लफ्रेंड सोबत होते. मी डॅनियलचा बँड मेट यांना भेटण्याकरिता मंडाले बे इथे जात होते. अभिनेता पॉली शोर, जो एक कॉमेडियन आहे, त्यावेळी त्यांच्यासोबत मला डेटवर जाण्याची इच्छा होती. पण त्याने मला धोका दिला.

या डेटबाबत डॅनियलने खुलासा केला की, पॉलीची भेट रस्त्यात कोणाशी तरी झाली आणि तो त्याच्या मित्रांना भेटण्यासाठी गेला. त्यामुळे पॉलीऐवजी अशा रितीने मी आणि सनी भेटलो. हे आमचं भाग्यच होतं. पण पुढे सनीने सांगितलं की, डॅनियलला वाटायचं की, मी स्ट्रेट नाहीये. त्याला वाटायचं की, मी लेस्बियन आहे. खरंतर त्यावेळी जी माझ्यासोबत गर्लफ्रेंड होती. ती लेस्बियन होती. ती नेहमी पुरूषांसारखे कपडे घालत असे. त्यामुळे डॅनियलला काहीतरी वेगळंच वाटलं.

डॅनियल झाला होता कंफ्यूज

View this post on Instagram

😘

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

सनीने आपल्या गर्लफ्रेंडचं वर्णन सांगताच डॅनियलने सांगितलं की, याच कारणामुळे मी कंफ्यूज झालो होतो. कारण दोघींनी एकमेंकाचा हात पकडला होता. त्यामुळे मला असं वाटलं असावं.

सनीचं फिल्मी आयुष्य

जशी डॅनियल आणि सनीची भेट फिल्मी होती तसंच सनीची पूर्ण आयुष्याची स्टोरीसुद्धा फिल्मी आहे. वयाच्या 19 व्या वर्षी सनीने एडल्ट चित्रपटांमध्ये काम करायला सुरूवात केली होती. तिने एक यशस्वी पोर्न स्टार म्हणून नाव कमावलं आणि रिएलिटी शो मधून भारतात एंट्री केली. तिच्या संपूर्ण आयुष्यावर एक वेबसीरिजसुद्धा आली होती. आता ती फक्त चित्रपटच नाहीतर जाहिरातीसोबतच ती टीव्हीवरील रिएलिटी शोमध्येही झळकते. एका युवांमध्ये चर्चेत असलेल्या शो मुळे ती खूपच पॉप्युलर आहे.