सनी लियोनीचा बोल्ड अवतार, व्हिडीओ पाहून चाहत्यांना लागलं वेड

सनी लियोनीचा बोल्ड अवतार, व्हिडीओ पाहून चाहत्यांना लागलं वेड

बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनी आपल्या बोल्ड फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. सनी सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. हॉट अवतारातले आपले फोटो-व्हिडीओ आपल्या चाहत्यांसाठी पोस्ट करत असते. नुकतंच तिनं इन्स्टाग्रामवर स्विमसूटमधला हॉट फोटो शेअर केला होता. मंगळवारीदेखील सनीनं ‘रागिनी एमएमएस रीटर्न 2’च्या प्रमोशनसाठी एक व्हिडीओ शेअर केला आहे. ‘हॅलो, मला काय सांगायचं आहे, याचा तुम्ही अंदाज लावू शकता का? अंदाज लागेपर्यंत हा व्हिडीओ पुन्हा-पुन्हा पाहा. ‘रागिनी एमएमएस रीटर्न 2’च्या कलाकारांसोबत झालेली भेट छान होती’, असं कॅप्शन सनीनं लिहिलं आहे.

(वाचा : VERY HOT ! अभिनेत्रीचा बाथटबमधला टॉपलेस फोटो व्हायरल)

स्विमसूटमधला सनीचा हॉट अवतार

काही दिवसांपूर्वी सनीनं दुबईतील फोटो शेअर केला होता. पूलबाहेर काळ्या रंगाच्या स्विमसूटमध्ये हॉट पोझ दिलेल्या फोटोसाठी ‘Love Dubai!’ असं कॅप्शन दिलं आहे. सनीची ही मादक अदा कोणालाही वेड लावेल. तिच्या या  फोटोला 12 लाखाहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.

(वाचा : ‘थलायवी’चा फर्स्ट लुक रिलीज, कंगना रणौत सोशल मीडियावर ट्रोल)

View this post on Instagram

Love Dubai!

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

सनी लियोनीचं करिअर

सनीनं पॉर्न स्टार म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. पॉर्न इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध चेहरा अशी सनीची ओळख आहे. करणजीत कौर वोहरा हे तिचं खरं नाव आहे. यानंतर तिनं स्वतःचं नाव बदलून सनी लियोनी असं ठेवलं. आज याच सनी लियोनीनं बॉलिवूडमध्ये आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.  

(वाचा : ‘Good Newwz’च्या टायटलमध्ये का वापरलं चुकीचं स्पेलिंग, करण जोहर म्हणाला…)

सनी आहे 3 मुलांची आई

सनी लियोनी आणि तिचा पती डेनियलला तीन मुलांना दत्तक घेतलं आहे. 2012मध्ये रिलीज झालेल्या ‘जिस्म 2’ सिनेमातून सनीनं बॉलिवूडमध्ये पर्दापण केलं. यानंतर ‘रागिनी एमएमएस 2’, ‘एक पहेली लीला’, ‘कुछ-कुछ लोचा’, ‘मस्तीजादे’  आणि ‘वन नाइट स्टँड’सारख्या सिनेमांमध्ये सनी झळकली आहे. 

View this post on Instagram

Ya know!! Weber @dirrty99 liked this one more hehe

A post shared by Sunny Leone (@sunnyleone) on

सनी लियोनीचा नवा विक्रम

फेसबुकवर तब्बल 23 मिलियन फॉलोअर्स असलेली सनी लियोनी (Sunny Leone) बॉलिवूडची सर्वाधिक एंगेजिंग अभिनेत्री ठरली आहे. आपल्या सोशल मीडिया अपडेट्स आणि ट्रेंडी लुक्समुळे सनीने आपल्या चाहत्यांवर मोहिनी घातली आहे.. स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या रेटिंगनुसार, फेसबुक (Facebook) वर ‘मोस्ट एंगेजिंग अॅक्ट्रेस’ ठरलेल्या सनी लियोनीने 100 गुणांसह अव्वल स्थान पटकावलं आहे.

सनी लिओननंतर अभिनेत्री अनुष्का शर्मा दुस-या क्रमांकावर आहे. फेसबुकवर 9.8 मिलियन फोलोअर्स असलेल्या अनुष्का शर्माचे विराट कोहलीसोबतच्या व्हेकेशनचे फोटो आणि अपडेट्सना चाहत्यांची पसंती मिळाली आणि त्यामुळेच 73.22 गुणांसह अनुष्का, दुसरी मोस्ट एंगेजिंग बॉलिवूड अभिनेत्री ठरली आहे. अमेरिकेच्या स्कोर ट्रेंड्स इंडिया या मीडिया-टेक कंपनीने लोकप्रियतेच्या निकषांवर आधारित ही लिस्ट दिली आहे.

फेसुबकवर 40 मिलियन फोलोअर्स असलेल्या प्रियंका चोप्राला 60.72 गुणांमुळे तिसरं स्थान मिळालं आहे. काही दिवसांसाठी दिल्लीत आलेल्या प्रियंकाचे फेसबुकवर कमी अपडेट्स पाहायला मिळाले. तर फेसबुकवर 14 मिलियन फॉलोअर्स असलेल्या कतरिना कैफचे व्होग मॅगझिनसाठी केलेलं हॉट फोटोशूट आकर्षण ठरलं. त्यामुळेच 58.42 गुणांसह ती लोकप्रियतेत चौथ्या क्रमांकावर आहे. 23 मिलियन फोलोअर्स असलेल्या सोनाक्षी सिन्हाच्या दबंग टूरच्या अपडेट्समूळे ती मोस्ट एंगेजिंग सेलिब्रिटींमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे.

 

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.