अर्नब गोस्वामीने घेतले सनी लिओनचं नाव, सनीनेदेखील घेतली फिरकी

अर्नब गोस्वामीने घेतले सनी लिओनचं नाव, सनीनेदेखील घेतली फिरकी

लोकसभा निवडणुकीच्या निकालांचं सकाळपासूनच कव्हरेज चालू होतं. भारतीय जनता पार्टी पहिल्या क्षणापासून अग्रेसर होती. सर्वच न्यूज चॅनेलवर जोरदार चर्चा चालू होती. सर्वात पहिले पंजाबचे निकाल समोर यायला लागले होते. पण यावेळी सर्वात महत्त्वाची क्लिप व्हायरल झाली आहे ती देशातील सर्वात चर्चिला जाणारा न्यूज अँकर अर्नब गोस्वामीची. अर्नब नेहमीच आपल्या अतिउत्साहासाठी ओळखला जातो. अर्थात तीच त्याची खासियत आहे असं म्हणावं लागेल. पण याच अतिउत्साहाच्या भरात अर्नबने यावेळी अतिशय मोठी चूक केली आहे. हीच चूक प्रचंड व्हायरल झाली आहे. याचा व्हिडिओ संपूर्ण देशभरात व्हायरल झाला आहे. दरम्यान अर्नबच्या या चुकीवर सर्वांनीच त्याला ट्रोल केलं पण सर्वात लक्ष वेधून घेतलं आहे ते म्हणजे सनी लिओनच्या ट्विटने.सनीने घेतली अर्नबची फिरकी


गोस्वामी गुरदारपूरमधून भाजपाच्या बाजूने उमेदवार म्हणून सनी देओल लढत देत होता. सनी देओल यावेळी काही मतांनी दुसऱ्या उमेदवारापेक्षा पुढे होता. उत्साहाच्या भरात अर्नब गोस्वामीने अंदाज सांगता सांगता सनी देओलच्याऐवजी सनी लिओनचं नाव घेतलं. त्यामुळे संपूर्ण दिवसभरात टॉप 10 मध्ये अर्नब गोस्वामी आणि सनी लिओन ट्रेंडिंगवर होते. यानंतर खुद्द सनी लिओननेदेखील ट्विट करत अर्नब गोस्वामीची फिरकी घेतली. सनीनेदेखील ही संधी सोडली नाही ‘किती मतांनी लीड करत आहे?’ असं ट्विट यावेळी सनीने केलं आहे. केवळ सनीच नाही तर सामान्य जनतेनेही अर्नबला प्रचंड ट्रोल केलं आहे. मात्र यावर सनी देओलने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.काय म्हणाले युजर्स?


एका युजर्सने लिहिलं आहे, ‘सनी लिओन पण गुरदासपूरमधून जिंकत आहे, सगळी मोहमाया आहे, प्रभू’. तर एका दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे, ‘अर्नब गोस्वामीच्या तोंडातून सनी देओलऐवजी सारखं सारखं सनी लिओनचं नाव येत आहे.’ तर एकाने लिहिलं आहे, ‘मोदीजींपेक्षाही आज अर्नब गोस्वामी जास्त आनंदी आहे. उत्साहात सनी देओलऐवजी सनी लिओन निघालं तोंडातून’ तर एका युजरने म्हटलं, ‘दुनिया कुठे पण जाऊदे. पण अर्नबला नक्की ऐक. रिपब्लिक टीव्ही बघा सर्व काही ठीक आहे. याला इतकं वेड लागलं आहे की, भाजपाच्या सनी देओलला सनी लिओन म्हणत आहे. या वेड्याचा उपचार आज कोण रे बाबा. डॉक्टरला पण वेड लागेल. भाजपा नाही तर अर्नबचे वडीलच जिंकत आहेत आज’ अशा तऱ्हेच्या विविध प्रतिक्रिया देत युजर्सने अर्नबला ट्रोल केलं. इतकंच नाही तर दिवसभर हा व्हिडिओ व्हायरल होत होता. शिवाय सगळ्याच ठिकाणी अर्नबला ट्रोल करण्यात येत होतं.


अर्नबची प्रतिक्रिया नाही


या सगळ्या गोष्टींवर अर्नबने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. इतक्या वर्षात असा प्रकार कधीही घडलेला नाही. नेहमीच अर्नब अतिउत्साही असतो. पण या उत्साहाच्या भरात इतकी मोठी झालेली चूक अर्नबला आता आयुष्यभरासाठी लक्षात राहील असं चिन्हं आहे. कारण ही चूक इतकी मोठी होती की, ती अगदी देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचली आहे. तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जो कायमस्वरूपी सगळ्यांच्या लक्षात राहील.


फोटो सौजन्य - Twitter, Instagram 


हेदेखील वाचा - 


अरबाज खानसमोर का ढसाढसा रडली सनी लिओनी


करिनाने तैमूरसाठी तयार केलाय खास 'डाएट प्लॅन'


जुही चावलाच्या मुलाला व्हायचंय अभिनेता... जुहीने दिली माहिती