जय मल्हारफेम ‘म्हाळसा’ अडकली लग्नाच्या बेडीत

जय मल्हारफेम ‘म्हाळसा’ अडकली लग्नाच्या बेडीत

मागच्या वर्षीपासून सेलिब्रेटींच्या लग्नसोहळ्याची धूम सुरू आहे. नुकताच आता आणखी एका मराठी सेलिब्रेटीचा विवाहसोहळा थाटामाटात संपन्न झाला. जय मल्हार या मालिकेतून म्हाळसादेवीच्या भूमिकेतून लोकप्रिय झालेली मराठी अभिनेत्री सुरभी हांडे विवाहबंधनात अडकली आहे. सुरभीने दुर्गेश कुलकर्णी याच्याशी विवाह केला आहे. दुर्गेश आणि सुरभी एकमेकांचे चांगले मित्र- मैत्रीण आहेत. आता लग्नाच्या पवित्र बंधनात अडकल्यामुळे ते एकमेकांचे आयुष्यभरासाठी जोडीदार झाले आहेत. सुरभी आणि दुर्गेश यांच्या डेस्टिनेशन वेडिंगचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मुळशी येथील प्रसिद्ध ढेपेवाडा येथे यांचा विवाहसोहळा संपन्न झाला. विवाहप्रसंगी सुरभीने लाल रंगाची नऊवारी आणि बनारसी शेला परिधान केला होता. लाल रंगाच्या या वधुवस्त्रामध्ये सुरभीचे नववधुचे रुप अगदी खुलून आलेलं दिसत आहे. दुर्गेशने लाल रंगाचा कुर्ता आणि निळा रंगाचे धोतर परिधान केलं होतं. दोघंही लग्नाच्या बंधनात अडकल्यामुळे आनंदी दिसत होते.


surbhi hande


सुरभीच्या साखरपुड्याचे  'क्षण'


मागच्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये सुरभीचा साखडपुडा झाला होता. त्यावेळेस त्या दोघांनी ते पुढील वर्षी विवाहबंधनात अडकणार असं जाहीर केलं होतं. सुरभी आणि दुर्गेश यांचा साखरपुडा जळगावमध्ये संपन्न झाला होता. अगदी जवळचे मित्रमंडळी आणि नातेवाईकांच्या साक्षीने सुरभी आणि दुर्गेश यांचा साखरपुडा झाला होता. त्यावेळी साखपपु्ड्याचा फोटोंमध्येही या दोघांचा रोमॅंटिक अंदाज पाहयला मिळाला. अत्यंत साध्या पद्धतीने हा साखरपुडा करण्यात आला होता. त्यामुळे लग्न मात्र अगदी थाटामाटात आणि पारंपरिक पद्धतीने करण्यात आले. सध्या 'डेस्टिनेशन वेडिंग'चा जमाना आहे. महाराष्ट्रात पारंपरिक पद्धतीने डेस्टिनेशन वेडिंग करण्यासाठी पुण्यातील ढेपेवाडा सध्या प्रसिद्ध होत आहे. सुरभी आणि दुर्गेश कुलकर्णी यांचा विवाहसोहळा अगदी थाटामाटात पुण्यातील ढेपेवाडा येथे संपन्न झाला.  


surabhi hande new


surbhi hande 1


सुरभी आणि दुर्गेश यांची मैत्री


सुरभी आणि दुर्गेश लग्नाच्या आधीपासून एकमेकांना चांगले ओळखत होते. त्यांच्यात चांगली मैत्री होती. दोघांचीही कार्यक्षेत्रं वेगळी आहेत. मात्र सतत संपर्कात असल्याने ते नेहमी निरनिराळ्या विषयांवर गप्पा मारत असत. हळूहळू या मैत्रीचे रुपांतर प्रेमामध्ये झाले. घरच्यांच्या परवानगीने आता ही दोघंही लग्नाच्या बेडीमध्ये अडकली आहेत. सहाजिकच या विवाहसोहळ्यामुळे सुरभी, दुर्गेश आणि त्यांचा परिवार खूश झाले आहेत. जय मल्हार मालिकेतील म्हाळसाच्या भूमिकेमुळे सुरभी घराघरात लोकप्रिय झाली. शिवाय सुरभीने ‘लक्ष्मी सदैव मंगलम’ या मराठी मालिकेमध्येही काम केलं आहे. सध्या या मालिकेला एक रंजक वळण मिळण्याची शक्यता आहे.
अधिक वाचाः


सौंदर्या रजनीकांत आणि विशगन वनंगमुदी चेन्नईमध्ये विवाहबद्ध


बिग बी आणि तापसीच्या ‘बदला’चं ट्रेलर प्रदर्शित


‘या’ चित्रपटामध्ये दुनियादारी फेम संजय जाधव साकारणार नकारात्मक भूमिका


फोटोसौजन्य- इन्साग्राम