कोण होणार करोडपतीचा नवा होस्ट...मराठी प्रेक्षकांना सरप्राईज!

कोण होणार करोडपतीचा नवा होस्ट...मराठी प्रेक्षकांना सरप्राईज!

हिंदीमध्ये ‘कौन बनेगा करोडपती’ या शो ने इतिहासच रचला आहे. त्यानंतर अनेक भाषांमध्ये हा शो आला. मराठीदेखील याला अपवाद नाही. या आधी ‘कोण होणार करोडपती’ हा शो सचिन खेडेकर आणि स्वप्नील जोशी यांनी होस्ट केला होता. आता पुन्हा एकदा हा शो मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येत असून सोनी मराठी वाहिनीने मराठी प्रेक्षकांना एक सरप्राईज दिलं आहे. आतापर्यंत सोनी मराठीने मालिकेतून हाताळलेल्या विषयांना प्रेक्षकांनी  भरभरून प्रतिसाद दिला आहे. आता ‘कोण होणार करोडपती’ हा नावाजलेला शो पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येणार असून या शो चा निवेदक कोण असणार याची चर्चा रंगली होती. या चर्चेला पूर्णविराम देत आता मराठी प्रेक्षकांना चांगलंच सरप्राईज मिळालं आहे. ‘सैराट’चा सर्वेसर्वा नागराज मंजुळे या सीझनमध्ये निवेदन करणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. याआधी या कार्यक्रमाचा होस्ट कोण असणार याचा अंदाज बांधण्यासाठी अनेक जाहिरातीही करण्यात आल्या होत्या. कोण असेल या कार्यक्रमाचा होस्ट अर्थात निवेदक असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित नक्कीच झाला होता. अनेकांनी अनेक अंदाज आणि आराखडे बांधले होते. पण आता याचं अफलातून आणि धमाकेदार उत्तर मिळालेलं आहे.


नागराज पहिल्यांदाच करणार निवेदन


WhatsApp Image 2019-03-02 at 4.02.44 PM %281%29


नागराज मंजुळेचं दिग्दर्शन तर सर्वांनाच माहीत आहे. पण आतापर्यंत नागराजच्या निवेदनाची कोणालाही कल्पना नाही. नागराज मंजुळे पहिल्यांदाच कोण होणार करोडपतीच्या निमित्ताने निवेदन करणार आहे. मुळातच हा शो प्रेक्षकांचा आवडीचा असल्यामुळे नागराजवर नक्कीच मोठी जबाबदारी असणार. त्यामुळे आता वेगवेगळ्या कलाकारांना डावलून नागराजचा नंबर लागल्यानंतर नागराज नक्की या शो मध्ये काय वेगळेपणा घेऊन येणार याची सर्वच प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे. शिवाय या शो मध्ये नागराज पहिल्यांदाच येत असल्यामुळे सर्वांचं लक्ष त्याकडे लागून राहिलं आहे.


नागराज सध्या ‘झुंड’मध्ये व्यग्र


महानायक अमिताभ बच्चन प्रमुख भूमिकेत असलेला नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘झुंड’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होत  आहे.नुकतीच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली. मागच्या वर्षीच नागराज बिग बी सोबत झुंड चित्रपट करणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. मात्र या चित्रपटाची तारीख जाहीर करण्यात आली नव्हती. निर्मात्यांनी  नुकतंच हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे जाहीर केलं आहे. याचवर्षी हा चित्रपट 20 सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. अनेक अडचणींवर मात करत झुंड आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. नागराजने आतापर्यंत मराठीतून फॅन्ड्री, सैराट, नाळ असे लोकप्रिय चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. झुंड हा नागराज दिग्दर्शित पहिलाच हिंदी चित्रपट असणार आहे. शिवाय या चित्रपटात महानायकासोबतच त्याची लकी जोडी ‘आर्शी-परश्या’ अर्थात रिंकू राजगूरू आणि आकाश ठोसर देखील असणार आहेत. त्यामुळे हा चित्रपट पाहणं प्रेक्षकांसाठी उत्सुकता वाढवणारं आहे.


amitabh and nagraj
झुंड चित्रपट फुलबॉल खेळावर आधारित


झुंड चित्रपट प्रसिद्ध फुटबॉल प्रशिक्षक ‘विजय बारसे’ यांच्या जीवनावर आधारित आहे. झोपडपट्टीत राहण्या-या गरीब मुलांनी खेळातून करिअर घडावं यासाठी विजय बारसे यांनी प्रयत्न केले होते. समाजाकडून वाईट वागणूक मिळाल्याने वाममार्गाला गेलेल्या काही मुलांना विजय बारसे यांनी फुटबॉलपटू बनवलं होतं. त्यातील काही मुलांनी परदेशातील होमलेस फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये देखील चमकदार कामगिरी केली होती.


फोटो सौजन्य - Instagram 


हेदेखील वाचा - 


सप्टेंबरमध्ये 'झुंड'मधून नागराज उलगडणार फुटबॉलपटूचं जीवनविश्व


पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भन्साळी लवकरच बनवणार चित्रपट


कोणाला बघून आली शिल्पा शेट्टीला ‘अक्की’ची आठवण