सुशांत सिंह राजपूतने 14 जूनला आत्महत्या केली मात्र अजूनही कोणालाच या गोष्टीवर विश्वास ठेवणं शक्य होत नाहीये. अगदी सुशांतच्या एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेपासून ते त्याच्या मित्रांना आणि चाहत्यांनाही हे पचवणं अवघड जात आहे. सुशांत आत्महत्या करून शकत नाही आणि त्याचा खून झाला असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. या केसमध्ये आतापर्यंत 38 जणांची चौकशी मुंबई पोलिसांकडून करण्यात आली आहे. पण आता या केसला नवे वळण मिळाले आहे. सुशांतच्या वडिलांनी पटणामध्ये सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर एफआयआर दाखल केली असून तिला अटक करण्यात यावी अशी मागणी केली आहे. मात्र रिया याविरोधात जामिनासाठी अर्ज करण्यात असल्याचीही माहिती मिळाली आहे.
दरम्यान रियावर सुशांतच्या खात्यातून 15 कोटी रूपये काढल्याचा आरोपही त्याच्या वडिलांनी केला आहे. अनोळखी व्यक्तीच्या खात्यात रियाने पैसे ट्रान्सफर केले. तसेच सुशांतला विष देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून औषधांचा रियाने ओव्हरडोस दिल्याचा आरोप करण्यात आलाय. सुशांतला वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ठेवण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. घरात भूत असल्याची अफवा पसरवण्यात आली. उपचाराचे कागदपत्र रिया घेऊन गेल्याचा आरोपही लावण्यात आला आहे. तसंच सुशांतचं क्रेडिट कार्ड, लॅपटॉप या गोष्टीही रिया घेऊन गेली असं नोंदवण्यात आलं आहे. पोलिसांच्या तपासावरही त्यानी प्रश्नचिन्ह सुशांतच्या वडिलांनी निर्माण केले आहे. मुंबई पोलिसांवर विश्वास नसल्यामुळे पटणामध्ये एफआयआर दाखल करण्यात आले आहे. रियाला अटक होण्याची शक्यता होती. मात्र कायदेशीर मार्ग काढण्याचा रियाचा प्रयत्न करत आहे.
सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी रियाविरुद्ध अखेर दीड महिन्याने पोलिसांमध्ये तक्रार नोंदविली आहे. रिया चक्रवर्ती, तिचे कुटुंबीय आणि पूर्व मॅनेजर यांच्याविरोधात ही तक्रार नोंदविण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. यावरून रियाला अटक व्हावी अशी वकिलाची मागणी आहे. सुशांतच्या कुटुंबियांनी रिया आणि तिच्या कुटुंबियांवर आरोप लावले आहेत. ‘रियाने सुशांतला त्याच्या घरच्यांपासून तोडलं इतकंच नाही तर त्याला त्याच्या वडिलांशी बोलताही येत नव्हतं. बऱ्याचवेळा त्यांनी बॉडीगार्डमार्फत बोलण्याचा प्रयत्न केला होता. पण तेदेखील बंद करण्यात आलं. सुशांत जर आपल्या कुटुंबापासून वेगळा झाला नसता तर त्याने इतकं मोठं पाऊल नक्कीच उचललं नसतं. हे अतिशय योजनाबद्ध स्वरूपात करण्यात आलं आहे’ असं के. के. सिंह यांच्या वकिलांनी सांगितलं आहे.
शोले चित्रपटाच्या सेटवर गब्बर सिंह म्हणजेच अमजद खान प्यायचे इतका चहा
पटणा पोलिसांनी या एफआयआरनंतर रिया चक्रवर्तीला अटक करून तिची चौकशी करावी असे त्यांच्या वकिलांनी म्हटले आहे. त्याशिवाय तिला किमान 10 वर्षांची तरी शिक्षा व्हायला काहीच हरकत नाही असंही त्यांनी पुढे म्हटले. मात्र दुसऱ्या बाजूचा विचार करता काही दिवसांपूर्वीच रियाने स्वतः सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी व्हावी असे म्हटले होते. त्यामुळे नक्की सुशांतबाबत काय घडले हे गूढ आहे. सुशांतच्या मृत्युनंतर आता अधिकाधिक गुंतागुंत होत चालली आहे. त्यामुळे याचा नक्की काय शेवट होणार याची कल्पनाही करता येत नाही. सुशांतच्या वडिलांनी हे पाऊल उचलल्यामुळे आता या केसला नवे वळण मिळाले आहे. तर दुसऱ्या बाजूला आपल्याला रेपची धमकी मिळाल्याचा मेसेजही रियाने शेअर केला होता. ही पिळवणूक बंद करा अशी विनंतीही केली होती.
सुशांत गेल्यानंतर सर्वात जास्त धक्का हा अंकिताला बसला आहे. त्याच्या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरही ‘पवित्र रिश्ता ते दिल बेचारा ...वन लास्ट टाईम’ अशी पोस्ट अंकिताने केली होती. तर आता सुशांतच्या वडिलांनी एफआयआर दाखल केल्यानंतर तिने ‘सत्य जिंकतं’ अशा आशयाची पोस्ट शेअर केली आहे. अंकिता ही सुशांतच्या आयुष्याचा एकेकाळी अविभाज्य भाग होती. दोघे चार वर्षांपूर्वी वेगळे झाले. इतकंच नाही तर अंकिता लवकरच लग्नबंधनातही अडकणार होती. अंकिताचा मणिकर्णिका आल्यानंतर सुशांतने ब्रेकअप झाल्यानंतरही तिचे सोशल मीडियावर अभिनंदन केले होते. तर अंकितानेही त्याला रिप्लाय देत त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या. पण सुशांतने अचानक असे टोकाचे पाऊल उचलल्यानंतर सर्वांनाच प्रचंड मानसिक धक्का बसला असून अजूनही त्याचे जवळचे मित्रमैत्रिणी यातून वर येऊ शकले नाहीत.
नेहा कक्कर यंदा सारेगमच्या सेटवर साजरा करणार 'रक्षाबंधन'
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.