सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण: CBIला मिळाली नवी दिशा, बॉलिवूडवर निशाणा

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण: CBIला मिळाली नवी दिशा, बॉलिवूडवर निशाणा

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा CBI तपास जोरदार सुरु आहे. रोज नवे कंगोरे अधिकाऱ्यांच्या हाती लागत आहेत. या घटनेशी निगडीत अनेकांची चौकशीही केली जात आहे. रोज नवनवे पुरावे समोर येत आहे. तसेच सुशांतशी निगडीत अशा अनेक गोष्टी समोर येत आहेत. ज्यामुळे अनेक पेच CBI समोरही निर्माण होत आहे. या प्रकरणाची मुख्य संशयित आरोपी रिया चक्रवर्ती हिच्या एका टेस्ट मॅसेजमुळे अंमली पदार्थांच्या सेवनाचा काहीसा खुलासा होत असल्यामुळे त्या संदर्भातही चौकशी केली जाणार आहे. अंमली पदार्थाचे सेवन यासंदर्भात सुशांतच्या मृत्यूनंतर काही माहिती हाती आली होती त्यानुसार या प्रकरणाशी निगडीत 20 जणांची चौकशी केली जाणार आहे. यामध्ये बॉलिवूड आणि एका राजकारण्याचा समावेश असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता बॉलिवूडवर CBI चा निशाणा असणार आहे.

सुशांत सिंह राजपूत प्रकरण: आतापर्यंत या गोष्टींचा खुलासा

रियाने काय केला होता मेसेज

रिया चक्रवर्तीच्या फोनमधून अनेक आक्षेपार्ह मेसेज मिळाले आहेत. यामध्ये निर्माता महेश भट, सुशांत सिंह राजपूत यांच्याशी चॅट केल्याचे मेसेज वायरल झाले आहेत. पण आता आणखी एका गोष्टीने CBI चे लक्ष वेधून घेतले आहे ते म्हणजे अंमली पदार्थांने. रियाने 2019 च्या शेवटी केलेल्या मेसेजमुळे या प्रकरणामध्ये अंमली पदार्थांचा काही हात आहे का ? हा तपासही केला जात आहे. रिया चक्रवर्तीने जया साहा नावाच्या व्यक्तिशी केलेला मेसेज काहीसा खटकण्यासारखा आहे. तिने या मेसेजमध्ये कोणत्यातरी ड्रिंक्समध्ये चार थेंब टाकण्याचा मेसेज केला आहे. चहामध्ये 4 थेंब टाकून त्याचे सेवन केल्यानंतर त्याची किक लागण्यासाठी 30-40 मिनिटे थांबण्याच्या गोष्टी केलेल्या आहेत. हा संबंध तपासण्यासाठी पुन्हा एकदा रिया चक्रवर्तीला बोलावले जाणार आहे, असे देखील कळत आहे. 

अभिनेता रणदीप हुड्डावर पार पडली मोठी शस्त्रक्रिया

राम कदम यांनी विचारला प्रश्न

Instagram

सुशांत सिंह प्रकरणात महाराष्ट्र सरकारने दिरंगाई दाखवली असा आरोपही अनेकांनी केला आहे. भाजप नेते राम कदम यांनी देखील या प्रकरणात महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधला आहे. अंमली पदार्थांचा उल्लेख या प्रकरणात झाल्यानंतर त्यांनी राज्यसरकार ड्रग्ज माफियांना वाचवण्यासाठी हे मुद्दाम करत आहे का ? असा सवालही केला आहे. 

हार्ड डिस्कचाही करणार तपास

सुशांत सिंह प्रकरणात सिद्धार्थ पिठानीने अत्यंत महत्वाची अशी माहिती CBI दिलेली आहे. सुशांतने ज्यावेळी आत्महत्या केली त्यावेळी सिद्धार्थ पिठानी त्याच्यासोबत घरी होता. त्यामुळे त्याच्यावरही संशयाची सुई होती. पण त्याने रिया आणि सुशांतच्या नात्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत. त्याने  हार्ड डिस्कचाही उल्लेख केला आहे. 8 जून रोजी सुशांत आणि रियामध्ये भांडण झाल्यानंतर ती घर सोडून जाण्याआधी रियाने एका आयटीच्या माणसाला बोलावून त्याच्यांकडे असलेल्या 8 हार्ड डिस्कमधील डेटा डिलीट करण्यासाठी सांगितले.सुशांतच्या समोरच ही हार्डडिस्क डिलीट करण्यात आली होती. त्यामुळे या हार्ड डिस्कमध्ये काय होते या संदर्भात सिद्धार्थ पिठानीला काहीही माहिती नाही. त्यामुळे ही हार्ड डिस्क डिलीट करणाऱ्या आयटीच्या माणसालाही CBI तपासासाठी बोलावले जाऊ शकते. त्यामुळे आता या हार्ड डिस्कममध्ये काय होते ते देखील शोधणे CBI साठी महत्वाचे असणार आहे. 


दिवसेंदिवस वेगवेगळ्या गोष्टींचे खुलासे या प्रकरणात रोज होत आहे. आता नेमकी कोणती गोष्ट समोर येईल यासाठी थोडी वाट पाहावी लागेल.

नागिन'फेम अभिनेत्री गरोदर असल्याच्या चर्चा, व्हिडिओ व्हायरल