सुशांत सिंह राजपूत प्रकरण: आतापर्यंत या गोष्टींचा खुलासा

सुशांत सिंह राजपूत प्रकरण: आतापर्यंत या गोष्टींचा खुलासा

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास CBI ने जोरदार सुरु केला आहे. या तपासामध्ये अनेक नव्या गोष्टींचा खुलासा केला जात आहे. तर अनेक वेगळ्या पद्धतीने याची चौकशी सुरु आहे. या प्रकरणात रिया चक्रवर्ती, तिचा भाऊ, सिद्धार्थ पिठानी, हाऊस हेल्पर, कुलुप तोडणारा असा अनेकांचा जवाब आतापर्यंत नोंदवण्यात आला आहे. सुशांतसोबतचे अनेक चॅट यामध्ये वायरलही होत आहे. तर दुसरीकडे त्याचा शवविच्छेदन अहवालही पुन्हा तपासला जात आहे. आतापर्यंत या प्रकरणामध्ये CBI ने नेमका काय खुलासा केला ते आज आपण थोडं विस्तृतपणे जाणून घेऊया.

या मालिकेच्या सेटवर अनेकांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह,उडाला गोंधळ

रियाची कधीही होऊ शकते चौकशी

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात अगदी पहिल्या दिवसापासून संशयित म्हणून असलेल्या रियाची सुटका होणे आता शक्य वाटत नाही. यामध्ये रिया ही मुख्य संशयित आरोपी असून तिची कसून चौकशी केली जाणार आहे. सध्या CBI ने सगळ्या पद्धतीची तयारी केली असून आता पर्यंत सुशांतशी निगडीत लोकांची चौकशी करण्यात आली आहे.आता रियाला देखील या प्रकरणात इंटरोगेशनसाठी बोलावण्यात येणार आहे. जर रियाने या सगळ्याला बगल देण्याचा प्रयत्न केला तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात असा इशारा देखील सीबीआयकडून देण्यात आला आहे. तिने जर चौकशीदरम्यान सहकार्य केले नाही तर तिला अटकही केली जाईल,असे सांगण्यात आले आहे.

अजय देवगण पहिल्यांदाच करणार यशराज बॅनरमध्ये काम, अहान पांडेचे पदार्पण

पोस्टमार्टम करणाऱ्या डॉक्टरांकडून खुलासा

सुशांतने आत्महत्या केल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर अनेकांना धक्का बसला. त्याने आत्महत्या केल्याचे कळल्यामुळे त्याचा पोस्टमार्टम होणार होता. त्यामुळे सुशांतचे मृत शरीर हे कूपर रुग्णालयात नेण्यात आले. त्याचा पोस्टमार्टम केलेल्या डॉक्टरांचीही CBI अधिकाऱ्यांनी चौकशी केली. कूपर रुग्णालयात आतापर्यंत त्यांनी अनेकदा फेऱ्या मारत डॉक्टरांची चौकशी केली आहे. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये गोंधळ दिसल्यामुळेच ही चौकशी केली जात आहे. कारण रुग्णालयाने दिलेल्या पहिल्या रिपोर्टमध्ये सुशांतच्या मरणाची वेळ ही लिहण्यात आली नव्हती. तर त्यावर कारण म्हणून रुग्णालयाकडून एक सप्लिमेंटरी रिपोर्ट तयार करण्यात आला ज्यामध्ये वेळेचा उल्लेख आहे. पण ही सप्लिमेंटरी रिपोर्ट तयार करण्याची वेळ का आली? असा प्रश्नही CBI पुढे आहे.

सिद्धार्थ पिठानीने नोंदवला जवाब

या सगळ्या प्रकरणात सिद्धार्थ पिठानीच्या नावही बरेचदा समोर येत आहे. सिद्धार्थ पिठानी हा सुशांतसोबत त्याच्या फ्लॅटमध्ये राहात होता. सुशांतने आत्महत्या केली त्या दिवशीही तो नोकर केशव आणि दीपेश सावंत घरात होते. त्यामुळे सिद्धार्त पिठानीचीही चौकशी करण्यात आली. त्यावेळी सिद्धार्थने त्या दिवशी झालेला सगळा घटनाक्रम सांगितला. त्याने दिलेल्या माहितीनुसार तो नेहमीप्रमाणे त्याचे काम करण्यासाठी कॉम्प्युटरसमोर बसला त्यावेळी केशव नावाच्या नोकराने सुशांत दरवाजा उघडत नसल्याचे सांगितले. त्याचवेळी सुशांतची बहीण प्रियंका हिने देखील कॉल केला तो कॉल उचलत नसल्यामुळे सिद्धार्थने आम्हीही दरवाजा ठोकून तो उघडत नाही असे सांगितले. दरवाजावर खूप वेळा आवाज देऊन आणि ठोकूनही तो उठत नाही म्हटल्यावर दरवाजा उघडण्यासाठी त्याने वॉचमनला आवाज दिला पण त्याने कोणतीही मदत केली नाही. म्हणून सिद्धार्थ पिठानीने गुगल करुन एका चावीवाल्याला बोलावले. त्याला कुलुपाचा फोटो पाठवला. तो आल्यानंतर त्याने दरवाज्याचे कुलुप तोडावे लागेल असे सांगितले. त्यानुसार दरवाज्याचे कुलुप तोडल्यानंतर चावीवाल्याला पैसे देऊन त्यांनी पाठवून दिले. सुशांतच्या खोलीत अंधार होता. लाईट लावल्यानंतर तो बेडच्या बाजूला फासावर लटकलेला दिसला. दीपेश आणि सिद्धार्थ यांनी त्याला बहिणीच्या सांगण्यावरुन खाली उतरवले आणि बेडवर ठेवले. पण सुशांत हा तो पर्यंत गेलेला होता, अशी माहिती सिद्धार्थने दिली.


हे काही जण संशयित म्हणून समोर आले असले तरी अजूनही काही जणांची चौकशी करणार आहेत. ते काम CBI अजूनही करत आहे. त्यामुळे आता यामध्ये या व्यतिरिक्त किती नावांचा समावेश होईल आणि अंतिम सत्य काय समोर येईल हे देखील  लवकरच कळेल अशी अपेक्षा आहे.

एस. एस. राजमौलीच्या 'RRR' मध्ये आता आलियाऐवजी प्रियांकांची वर्णी