#Engagement - मिस युनिव्हर्स सुश्मिताला मिळाला मिस्टर परफेक्ट

#Engagement - मिस युनिव्हर्स सुश्मिताला मिळाला मिस्टर परफेक्ट

माजी मिस युनिव्हर्स आणि बॉलीवूड अभिनेत्री सुश्मिता सेन सध्या चर्चेत आहे ते तिच्या कामासाठी नाही तर तिच्यापेक्षा 16 वर्षांनी लहान असणाऱ्या रोहमन बरोबरील नात्यामुळे. आता सुश्मिता आणि रोहमनने लपूनछपून साखरपुडा केल्याच्या बातम्या समोर येत आहेत. सुश्मिता नेहमीच रोहमन बरोबर फोटो आपल्या अधिकृत अकाऊंटवरून शेअर करत असते. दोन - तीन दिवसांपूर्वीच सुश्मिताने रोहमनचा हात धरून रोमँटिक तऱ्हेने ‘चल पळून जाऊया’ असा मेसेज शेअर केला होता तर आता एक फोटो पोस्ट केला असून या फोटोमध्ये तिच्या हातात एंगेजमेंट रिंग दिसून येत आहे. त्यामुळे आता तिने लपून साखरपुडा केला असल्याच्या बातम्यांना ऊत आला आहे.

सुश्मिता आणि रोहमन नात्यात


sush 2


गेल्या वर्षापासून सुश्मिता सेन आणि तिचा मॉडल बॉयफ्रेंड रोहमन शॉल एकमेकांबरोबर नेहमीच दिसत असून यांचं नातं गंभीर असल्याचं म्हटलं जातं. दोघांमध्येही अतूट बाँड असून सुश्मिता पोस्ट करत असलेल्या फोटोमध्ये ते दिसून येतं. सुश्मिताने नुकत्याच पोस्ट केलेल्या फोटोमुळे सध्या सगळीकडेच तिच्या नावाची चर्चा आहे. कारण या फोटोमध्ये तिच्या बोटात एंगेजमेंट रिंग दिसून येत आहे. शिवाय तिने या फोटोला दिलेलं कॅप्शनदेखील असंच आहे की, तिचा साखरपुडा झाल्यासारखं वाटत आहे.


रोहमनसाठी खास संदेश


sush 1


सुश्मिताने हा खास फोटो पोस्ट करत रोहमनसाठी खास संदेश दिला आहे, ‘कोणावरही कोणतीही अपेक्षा न करता प्रेम करणं खूप कठीण आहे कारण सहसा आपल्याला अटी आणि शर्तींवर जगायची सवय असते. आपल्या मनाला पूर्णतः फॉलो करणं कठीण असतं कारण त्यावर आपला मेंदू नेहमी जास्त काम करत असतो. मेंदू जेव्हा अपेक्षांवर ध्यान देत असतो तेव्हा मन मात्र विश्वासावर ठाम असतं. अशा स्थितीत प्रेम हे एखाद्या बोनसप्रमाणे आहे.’ सुश्मिता रोहमनविषयी इतकंच सांगून थांबली नाही तर, ‘मैत्री, प्रेम, सन्मान, विश्वास, साथ आणि मनाचं ऐकण्यासाठी, कोणत्याही अटी आणि शर्तीशिवाय मी तुझी आहे रोहमन शॉल. आय लव्ह यू गाईज’ असंही या कॅप्शनमध्ये सुश्मिताने लिहिलं आहे. सुश्मिता आणि रोहमन हे प्रेमात आकंठ बुडाले आहेत हे त्यांच्या फोटोवरून आणि व्हिडिओवरून तर नेहमीच दिसून येतं.


चाहत्यांनी केले प्रश्नांची सरबत्ती


हा फोटो सुश्मिताने पोस्ट केल्यानंतर तिच्या चाहत्यांनी अक्षरशः सोशल मीडियावर प्रश्नांची सरबत्ती चालू केली आहे. कारण हा फोटो पाहून तिच्या चाहत्यांना एक प्रकारे धक्काच बसला आहे. आता त्यामुळे युजर्स सुश्मिताला सतत प्रश्न विचारत आहेत की, तिने गुपचूप साखरपुडा केला का? एका चाहत्याने तर कमेंट करत म्हटलं आहे की, ‘तुम्ही दोघांनी साखरपुडा केला का? ’ तर अजून एका चाहत्याने विचारलं, ‘सुश्मिता मला तुला बघून असं वाटत आहे की, तू तुझ्या बोटांमध्ये एंगेजमेंट रिंग घातली आहेस’


खरं उत्तर सुश्मिता आणि रोहमनकडेच

आता या प्रश्नांची उत्तरं ही फक्त सुश्मिता आणि रोहमनकडेच आहेत. पण हा फोटो पाहून त्यांच्या चाहत्यांना आनंद झाला आहे हे मात्र नक्की. सुश्मिता नेहमीच आपले फिटनेसचे व्हिडिओ रोहमनबरोबर पोस्ट करत असते. हे व्हिडिओजदेखील चाहत्यांना खूप आवडतात. शिवाय रोहमन नेहमीच तिला जपत असताना दिसतो. असे अनेक व्हिडिओ आतापर्यंत व्हायरल झाले आहेत. पण सर्वात जास्त व्हायरल झाला आहे तो हा फोटो ज्यामध्ये सुश्मिता आणि रोहमन एकत्र असून तिच्या हातातील रिंग स्पष्ट दिसत आहे.


फोटो सौजन्य - Instagram


हेदेखील वाचा


सुष्मिता सेन आहे बॉयफ्रेंडची #lifeline, पाहा फोटो


जेव्हा मि. परफेक्शनिस्टच्या एका शब्दावर धकधक गर्लने दिला होकार


अर्जुन कपूर मलायकाबरोबर करणार नाही लग्न कारण…