पुन्हा एकदा मिस युनिव्हर्स सुश्मिताचं ‘ब्रेकअप’

पुन्हा एकदा मिस युनिव्हर्स सुश्मिताचं ‘ब्रेकअप’

माजी मिस युनिव्हर्स आणि बॉलीवूड अभिनेत्री सुश्मिता सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय असते. काही दिवसांपासून सुश्मिताच्या तिच्यापेक्षा लहान वयाच्या बॉयफ्रेंडसोबत अफेअरच्या चर्चा सुरू होत्या. सुश्मिता आणि तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉलने लपूनछपून साखरपुडा केल्याच्या बातम्या देखील कानावर पडत होत्या. मात्र आता सुश्मिताने रोहमनसोबत ब्रेकअप केल्याची बातमी समोर येत आहे.  कारण रोहमनने त्याच्या इंन्स्टा स्टोरीवर एक भावनिक मेसेस शेअर केला आहे. ज्यावरून त्या दोघांच्या नात्यात दुरावा आला असल्याचं जाणवत आहे.

Instagram

काय आहे रोहमनची इन्स्टा स्टोरी

रोहमन शॉलने इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून मनातील राग व्यक्त केला आहे. त्याने यात म्हटलं आहे की, “हे यू, होय मी तूझ्याशीच बोलत आहे. तुला नेमका काय त्रास होत आहे. गेल्या चोविस तासांपासून मी तुला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. मी तुझ्याशी बोलायला तयार आहे. तु काय झालं आहे ते मला सांग. तुला असं वाटतं की हे नातं टिकवण्यासाठी तू नेहमी प्रयत्न करतेस आणि तुझा पार्टनर असं करत नाही. असं असेल तर मग ठीक आहे… तुला हे माहीत असायला हवं की, “ तुम्ही जे काही तुमच्या जोडीदारासाठी करता हा तुमचा स्वतःचा निर्णय असतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदाराकडून अगदी तसंच वागण्याची अपेक्षा करू शकत नाही. कुणीच आपल्या जोडीदारावर स्वतःच्या अपेक्षा थोपवू नयेत. त्यामुळे जोडीदारासाठी तेच करा जे तुम्हाला मनापासून त्याच्यासाठी करावंसं वाटेल. तुम्ही जसे वागता तशीच अपेक्षा समोरच्याकडून ठेवणं योग्य नाही. जर तुम्ही चुकीच्या लोकांसोबत रिलेशनशिपमध्ये असाल तर हा तुमचा दोष आहे. त्यापेक्षा स्वतःवरच प्रेम करा.” रोहमनने याबाबत बरंच काही लिहीलं आहे. “जर तुम्ही एकटं राहिल्यामुळे बोअर होत असाल तर तुम्ही इतरांकडून अशी कशी अपेक्षा करू शकता की ते तुम्हाला आकर्षक समजतील. तुम्ही जर स्वतःच स्वतःचे मनोरंजन करू शकत नसाल तर तो तुमचा प्रश्न आहे. या समस्येला सोडवण्यासाठी दिवसभरात कमीत कमी पंधरा ते वीस मीनिटं स्वतःसोबत घालवा. बिना फोन, पुस्तक, टीव्ही आणि इतर कोणत्याही व्यक्तीशिवाय स्वतःसाठी थोडा वेळ द्या. ज्यामुळे तुम्हाला तुमचं मन वाचता येईल आणि मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील.”

Instagram

सुश्मिता आणि रोहमनची लव्हस्टोरी

गेल्या वर्षापासून सुश्मिता सेन आणि तिचा मॉडल बॉयफ्रेंड रोहमन शॉल एकमेकांना डेट करत होते. दोघांमध्येही अतूट बाँड असल्याचं वाटत होतं. कारण सुश्मिता पोस्ट करत असलेल्या फोटोमधून त्या दोघांचं प्रेम अगदी भरभरून दिसत होतं. सुश्मिताने एका मुलाखतीत सांगितलं होतं की पूर्वी रोहमन तिला इन्स्टाग्रामवर एखाद्या फॅनप्रमाणे मेसेज करत असे. ते मेसेज पाहून सुश्मिताला रोहमनबाबत जवळीक वाटू लागली. त्यानंतर रोहमनने एका फुटबॉल मॅचसाठी तिला आमंत्रण दिलं होतं. ते दोघं या मॅचसाठी एकत्र भेटले आणि तिथुनच त्या दोघांची लव्हस्टोरी सुरू झाली होती. रोहमन सुश्मिता पेक्षा सोळा वर्षांनी लहान असल्यामुळे त्यांच्या अफेअरची चर्चा सर्वत्र रंगली होती. सोशल मीडियावरील फोटो आणि पोस्ट पाहून त्या दोघांचं नातं दृढ असेल आणि ते लवकरच लग्नदेखील करतील असं वाटत होतं. मात्र आता त्या दोघांमध्ये आलेल्या या दुराव्यामुळे या दोघांचे चाहते मात्र नक्कीच नाराज झाले आहेत.

अधिक वाचा

जेव्हा एकता कपूरने तुषारच्या ‘या’ गोष्टीवर रागावून केला होता पोलिसांना फोन

आपल्याच घरात अनिल कपूर करत आहे चोरी, हर्षवर्धनने केला व्हिडिओ शेअर

राजकुमार राव पहिल्यांदाच साकारणार सायको किलरची नकारात्मक भूमिका

फोटोसौजन्य- इन्स्टाग्राम