सुश्मिताच्या डान्स व्हिडिओने चाहते झाले घायाळ

सुश्मिताच्या डान्स व्हिडिओने चाहते झाले घायाळ

एके काळची मिस युनिव्हर्स आणि बॉलीवूड अभिनेत्री सुश्मिता सेनचं नाव जरी घेतलं तरी आजही अनेक तरूणांच्या ह्रदयाची धडधड वाढते.तिच्या बिनधास्त आणि दिलखेचक अदा यांनी ती नेहमीच तिच्या चाहत्यांना घायाळ करत असते.अनेक वर्षांपासून सुश्मिता चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर मात्र प्रचंड अॅक्टिव्ह आहे. कारण ती नेहमीच तिचे फिटनेस व्हिडिओ आणि आपल्या आयुष्यातील वैयक्तिक गोष्टी या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करत असते. सध्या ती पुन्हा एकदा  चर्चेत आली आहे ते तिच्या मुलींसोब केलेल्या या दिलखेचक डान्स मुळे...सुश्मिताने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्याा व्हिडिओत सुश्मिता तिच्या मुलींसोबत बिनधास्त डान्स करताना दिसत आहे आणि तिचा बॉयफ्रेन्ड रोहमन शॉल बाजूला बसून त्यांचा डान्स पाहत आहे. या व्हिडिओसोबत तिने शेअर केलं आहे की, “आम्ही असा डान्स करत आहोत जसं की आम्हाला कोणीच पाहत नाही आहे" सुश्मिताच्या चाहत्यांना तिचा हा व्हिडीओ प्रचंड आवडला आहे. ज्यामुळे तो सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

सुश्मिता आणि रोहमनचं नातं

सुश्मिता तिच्या प्रेमप्रकरणासाठी नेहमीच चर्चेत राहिली आहे. सुश्मिता आणि रोहमन एकमेकांवर प्रेम करतात हे तर आता जगजाहीर आहे. रोहमन आणि सुश्मिता नेहमीच आपले एकमेकांबरोबरचे फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत असतात. खरं तर रोहमन सुश्मितापेक्षा 14 वर्षांनी लहान आहे. पण तरीही ते एकमेकांना खूप जपतात आणि लवकरच हे दोघं लग्न करणार असल्याच्या बातम्यांनीही सध्या जोर धरला आहे. रोहमनदेखील मॉडल असून बऱ्याच जाहिरातींंमध्ये रोहमन काम करताना दिसला आहे. शिवाय रोहमन आणि सुश्मिता अनेक ठिकाणी एकत्र येताजाताना दिसतात. त्याचेही व्हिडिओ व्हायरल होत असतात. दोघांनीही सार्वजनिक पातळीवरही आपलं प्रेम स्वीकारलं आहे. इतकंच नाही तर रोहमन नेहमीच सुश्मितासाठी अनेक सरप्राईजदेखील प्लॅन करत असतो. तर सुश्मिताही त्याच्यावरील आपलं प्रेम व्यक्त करताना दिसते.

सुश्मिता सेन लवकरच करणार बॉलीवूडमध्ये कमबॅक

सुश्मिताने अगदी लहान वयात दोन मुलींना दत्तक घेतलं. मॉडेलिंग आणि बॉलीवूड या क्षेत्रात स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं होतं. मात्र बऱ्याच दिवसांपासून ती बॉलीवूडपासून दूर आहे. आता पुन्हा एकदा ही विश्वसुंदरी पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मन जिंकायला 10 वर्षांनी मोठ्या पडद्यावर परत येत आहे. याबद्दलची घोषणा सुश्मिताने स्वतः सोशल मीडियावर केली आहे. सुश्मिता नक्की कोणत्या चित्रपटातून पुनर्पदार्पण करत आहे हे मात्र तिने स्पष्ट केलं नाहीये. पण आपण लवकरच मोठ्या पडद्यावर परत येत आहोत हे मात्र तिने सोशल मीडियावर  सांगितलं आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाहीये.

फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम

हे ही वाचा -

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

अधिक वाचा -

पार्थ समथान आणि हिना खान बनले 2019 चे टॉप टेलीव्हिजन स्टार्स

'अनन्या' आता झळकणार रुपेरी पडद्यावर, रवी जाधव करणार निर्मिती

शिकारीफेम नेहा खानच्या दिलखेचक अदा