ADVERTISEMENT
home / मनोरंजन
खऱ्या आईबद्दल विचारणाऱ्यांना सुश्मिता सेनच्या मुलीने दिलं असं उत्तर

खऱ्या आईबद्दल विचारणाऱ्यांना सुश्मिता सेनच्या मुलीने दिलं असं उत्तर

सुश्मिता सेनची मुलगी रेनी सेन आपल्या पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. सध्या ती अनेक ठिकाणी मुलाखती देताना दिसत आहे. अनेक ठिकाणी तिला वेगवेगळे प्रश्न विचारले जातात. त्यापैकी तिला विचारला जाणारा एक प्रश्न म्हणजे तुझी खरी आई कोण? तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून सतत तिच्या आईबद्दल प्रश्न विचारले त्यावर ती आता रिअॅक्ट झाली आहे. तिने जे उत्तर दिले आहे त्यामुळे तिची चर्चा सगळीकडे होऊ लागली आहे. दरम्यान, रेनी ही याबद्दल नेमकं काय म्हणाली ते जाणून घेऊया.

दोन मुलांच्या जन्मानंतर ईशा देओलचा कमबॅक

रेनीने दिले हे उत्तर

वर सांगितल्याप्रमाणे रेनी ही सध्या पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. तिने एका सीरिजच्या माध्यमातून आधीच अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे आणि आता ती पुन्हा एकदा मोठ्या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. त्यासाठीच तिच्या वेगवेगळ्या ठिकाणी मुलाखती सुरु झाल्या आहेत. तिने एका मुलाखतीदरम्यान तिला सतत तिच्या खऱ्या आईबद्दल प्रश्न विचारतात असे सांगितले. पण रेनीने यावर आपले उत्तर दिले आहे. ती म्हणाली की, मला सतत माझी खरी आई कोण ते विचारले जाते. पण असा प्रश्न करणाऱ्यांना मला प्रश्न विचारायचा आहे की, खऱ्या आईची व्याख्या काय? जे मला सतत याविषयी विचारतात. त्यांनी मला या प्रश्नाचे उत्तर द्यावे.  रेनीने तिला ट्रोल करणाऱ्यांनाच हा सवाल केला आहे.  तिने त्यावर उत्तर देत सांगितले आहे की, माझा जन्म आईच्या ह्रदयात झाला आहे आणि हेच एकमेव सत्य आहे. 

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये होणार आहे या कलाकारांची एन्ट्री

ADVERTISEMENT

मी दत्तक मुलगी

सुश्मिता सेन ज्यावेळी 24 वर्षांची होती. त्यावेळी तिने पहिली मुलगी रेनी सेन हिला दत्तक घेतलं आणि त्यानंतर बऱ्याच वर्षांनी म्हणजेच 2010 साली तिने आलिशा नावाच्या मुलीला दत्तक घेतलं. या दोन्ही मुलींना त्या दत्तक असल्याची माहिती आहे. म्हणूनच रेनीने हा सवाल ठेवला आहे की, मी सुश्मिता सेनची दत्तक मुलगी आहे या बद्दल सगळ्यांना अगदी उघड उघड माहिती आहे. असे असताना अशापद्धतीने प्रश्न करणे काही पटण्यासारखे नाही. रेनी या आधीही बऱ्याच कारणासाठी ट्रोल झाली आहे. तिला सतत नको ते प्रश्न विचारण्यात येतात. पण रेनी ही आता या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी चांगलीच तयार झाली आहे. तिला या सगळ्या परिस्थितीला तोंड कसे द्यायचे दे देखील चांगल्या पद्धतीने कळले आहे. 

मीरा आणि आदिराज यांच्या प्रेमकहाणीबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता, ‘अजूनही बरसात आहे’

अभिनयाची गोडी

सुश्मिता सेन ही मिस वर्ल्ड आहे तिने अभिनय क्षेत्रातही उत्तम कामगिरी केली आहे. तिच्या पावलावर पाऊल टाकत तिची मोठी मुलगीही अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. त्यामुळे सुश्मिताचा रेनीला पूर्ण पाठिंबा आहे. रेनी आणि सुश्मिताचे संपूर्ण कुटुंब हे सतत ऑनलाईन येत असते. त्यांच्या चाहत्यांशीही सतत संवाद साधत असते. त्यामुळे त्यांचे हे कुटुंब सतत ऑनलाईन पाहायला मिळते. सुश्मिता सेन ही आपल्या मुलींसोबत जास्तीत जास्त वेळ घालवते. ती कायम काहीना काही अॅक्टिव्हिटी करताना दिसत असते. त्यामुळेच अनेकांना रेनी आणि आलिशाचे खूपच कौतुक वाटते.

आता राहिला प्रश्न रेनीच्या पदार्पणाचा तर त्यासाठी थोडीशी वाट पाहावी लागणार आहे.

08 Jul 2021

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT