सुष्मिता सेन आहे बॉयफ्रेंडची #lifeline, पाहा फोटो

सुष्मिता सेन आहे बॉयफ्रेंडची #lifeline, पाहा फोटो

ष्मिता सेन सध्या चर्चेत आहे ते तिच्या यंग आणि हँडसम बॉयफ्रेंडमुळे… ती तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन त्याच्यासोबतचे फोटो नेहमीच शेअर करत असते. आता तिच्या बॉयफ्रेंडने काही फोटो शेअर करत तिला #lifelines  असे म्हटले आहे. सुष्मिता गेल्या काही महिन्यांपासून मॉडेल रोहमन शॉला डेट करत आहेत. हे आम्ही तर सोशल मीडियावर त्या दोघांनी शेअर केलेले फोटोच सांगत आहेत. आता या लव्हस्टोरीमध्ये आणखी जवळीक येताना दिसत आहे. आता सुष्मिता- रोहमनच्या या नात्याला कोणता नवा रंग मिळणार ? ते लग्नबंधनात अडकणार का? हे तर येत्या काळात नक्कीच कळेल.


rohman indta


प्रतीक बब्बर अडकला विवाहबंधनात


तेरी मेरी कहानी


सुष्मिता सेन गेल्या काही महिन्यांपासून मॉडेल रोहमन शॉला डेट करत आहे. त्यांच्या अफेअर्सच्या चर्चा सुरू असतानाच त्यांनी ऑफिशिअली त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन काही फोटो शेअर करायला सुरुवात केली. गेल्यावर्षी साधारण नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान त्या दोघांनी फोटो टाकायला सुरुवात केली. सुष्मिताने फोटो टाकल्यानंतर त्यावर खूप चर्चा झाली आणि त्या फोटोतील तरुण मॉडेल रोहमन शॉ असल्याचे कळाले आणि मग काय ही बातमी हळूहळू पसरु लागली.आता तर त्या दोघांनी त्यांच्यातील नाते ऑफिशिअल असल्याचे सांगत अनेक फोटो शेअर केले आहेत. आताही एक नवा फोटो दोघांनी शेअर केला आहे. या फोटोत हे दोघे एका लग्नसमारंभाला गेल्याचे दिसत आहे. पण या फोटोत खास गोष्ट अशी की, रोहमनने त्या फोटोसाठी  #lifelines वापरले आहे. त्यामुळे त्याच्यासाठी ही व्यक्ती किती महत्वाची आहे ते कळत आहे.


sushmita rohman


शिल्पा शेट्टीच्या फॅनसाठी धक्कादायक बातमी


रोहमन वयाने लहान


सुष्मिता सेनचे हे काही पहिले अफेअर नाही. या आधी देखील तिचे नाव अनेकांशी जोडले आहे. रणदीप हुड्डा, विक्रम भट ही त्यातली काही नावे आहेत. पण त्यानंतर बराच काळ तिचे कोणाशी नाव जोडले गेले नव्हते. आता डेट करत असलेला रोहमन हा वयाने बराच लहान आहे. त्यामुळे सुष्मिता सेनवर बरीच टीका झाली होती. पण ते काही असो सध्या सुष्मिता आणि रोहमनच्या प्रेमाचा रंग गडद होताना दिसतोय.


rohman shawl


मणिकर्णिका ५० देशांमध्ये होणार प्रदर्शित 


रोहमन- सुष्मिताचा फिटनेस फंडा


सुष्मिता आता ४3 वर्षांची आहे. पण अजूनही ती फिट आहे. तिच्या व्यायामाचे अनेक व्हिडिओ ती पोस्ट करत असते. रोहमनच्या बाबतीतही तसेच आहे कारण रोहमनचे सिक्स पॅक्स पाहता त्यासाठी लागणारी मेहनत घेताना तो नेहमी दिसतो. या दोघांनी  एकत्र वर्क आऊट करतानाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ आतापर्यंत शेअर केले आहेत. त्यामुळे त्यांच्यातील केमिस्ट्री जास्तच वर्कआऊट झालेली लक्षात येते. सुष्मिता सेनच्या हाती सध्या कोणतेही प्रोजेक्ट नाही. चित्रपटापासून ती बऱ्याच काळापासून ती लांब आहे. पण फॅशन शोमधून ती तिच्या अदा नेहमीच दाखवताना दिसत असते शिवाय तिच्या इन्स्टावरुन ती तिच्या फॅन्सना कायम अपडेट करत असते. तिने दोन मुलींना दत्तक घेतले असून ती सिंगल मदर बनत त्यांची काळजी घेत आहे.


fitness


लग्न करणार?


२०१८ मध्ये अनेक सेलिब्रिटींची लग्ने झाली आहेत. यात विराट- अनुष्का, रणवीर-दीपिका, प्रियाकां-नीक जोनास यांचा समावेश आहे. आणि आता जानेवारीमध्ये प्रतीक बब्बरही विवाहबंधनात अडकला आहे. शिवाय येत्या काळात अनेक जोड्या बोहल्यावर चढणार असल्याच्या चर्चा आहे. त्यात आता या जोडीची भर पडेल का? ही उत्सुकता तिच्या फॅनमध्येही आहे.