सुश्मिता सेननंतर तिच्या भावाच्या नात्यात दुरावा,प्रसिद्धीसाठीचा हा दिखावा

सुश्मिता सेननंतर तिच्या भावाच्या नात्यात दुरावा,प्रसिद्धीसाठीचा हा दिखावा

सुश्मिता सेनचे रिलेशनशीप नेहमीच Complicated राहिले आहे. काहीच दिवसांपूर्वी तिचे बॉयफ्रेंड रोहमन शॉसोबत बिनसले होते. या दोघांचे ब्रेकअप झाले होते, अशा चर्चा रंगल्यानंतर ती दोघं पुन्हा एकत्र आली. पण आता बहिणीच्याच पाऊलावर पाऊल ठेवत सुश्मिता सेनच्या भावाने ही आता सोशल मीडियावर अशी काही गोष्ट केली आहे की, नुकतेच लग्न झालेल्या या जोडप्यामध्ये दुरावा आल्याचे म्हटले जात आहे. पण सुश्मिताचे एकदंर वागणे पाहता आता तिचा भाऊ राजीव प्रसिद्धीसाठी हा देखावा तर करत नाही ना?अशी चर्चा होऊ लागली आहे.

 

आता नेमकं काय झालं?

Instagram

सुश्मिता सेनचा भाऊ राजीव सेन याचे काहीच दिवसांपूर्वी चारु असोपासोबत विवाहबंधनात अडकला. पण या लग्नाला काही महिने जात नाही तोच या दोघांनी एकमेकांना सोशल मीडियावरुन Unfollow करुन टाकले आहे. इतक्या कमी वेळात या दोघांनी एकमेकांना unfollow का केलं? असा प्रश्न लोकांना पडला. लग्नाला अजून काही काळ लोटला नाही तर यांच्या नात्यात दुरावा येण्यासारखे असे घडले तरी काय?असा प्रश्न सगळ्यांना पडू लागला. पण अगदी काहीच तासात असे काही झाले की, पुन्हा सगळे पूर्ववत झाले.

गायक गुरु रंधावावर कॅनडामध्ये हल्ला, फोटो केला शेअर

सुबह का भुला शाम को घर आहे तो….

Instagram

असचं काही राजीव आणि चारु यांच्यासोबत झाले आहे. काही तासांपूर्वी एकमेकांना unfollow केल्यानंतर अगदी त्याच दिवशी त्यांनी संध्याकाळी एकमेकांनाव follow करत त्यांचा एक फोटो शेअर केला. एकूणच काय ‘वड्डे वड्डे लोक वड्डी वड्डी बाते’.. पण या Unfollow मुळे लोकांना मात्र चर्चेला चांगला विषय मिळाला.आता ही चर्चाच यांना होऊ द्यायची असेल तर आपण तरी काय सांगणार म्हणा. कारण हे सगळे झाल्यानंतर त्यांनी लगेचच त्यांच्या डिनरडेटचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले. चारु ही अभिनेत्री असून तिने अनेक डेलीसोपमध्ये काम केलेले आहे. 

GoodNews : अजिंक्य रहाणे आणि राधिकाच्या आयुष्यात लवकरच येणार नवीन पाहुणा

पब्लिसिटीसाठी काही पण

आता या दोघांनी आपले लक्ष वेधून घेण्यासाठी हे सगळे केले असावे असे बोलले जात आहे. हल्ली सोशल मीडियावरील प्रत्येक हालचालीमुळे नात्यातील दृढता आणि आलेला दुरावा असे दोन्ही ठरवण्याची सवयच झालेली आहे. पण यामुळे काहीही कारण नसताना या दोघांना पब्लिसिटी मिळाली आहे.

सुश्मिताचेही काही वेगळे नाही

Instagram

आता सुश्मिता सेनबद्दल बोलायचे झाले तर मिस युनिव्हर्स सध्या वयाने 16 वर्ष लहान असणाऱ्या रोहमनला डेट करत आहे. त्यांचे सोशल मीडियावर अनेक फोटो व्हायरल होत असतात. त्या दोघांमधील प्रेम कायम त्यांच्या फिटनेस व्हिडिओमधून दिसत असते. पण त्यांचेही काही दिवसांपूर्वी बिनसले. सुश्मिताने रोहमनला  unfollow केले. मग रोहमनने आपली काहीही चुकी नसल्याची पोस्ट इन्स्टावर टाकली. त्यानंतर ही दोघं पुन्हा एकत्र आली आणि या दोघांनी फोटो पण शेअर करायला सुरुवात केली.  त्यामुळे आता या दोघांचे सगळे अगदी नीट चालले आहे असेच म्हणायला हवे.

Follow unfollow सत्र सुरु

सध्या इन्स्टाग्रामवर follow, unfollow सत्र सुरु आहे. रोहित शर्माने विराट कोहली आणि अनुष्का शर्माला unfollow करुन टाकले. याशिवाय अनेक सेलिब्रिटी असे काही तरी उपद्याप करतच असतात. त्यामुळे इतरांना विचार करण्यासाठी थोडा जास्तीचा वेळ नक्कीच मिळतो.

अभिनेता गोविंदाचा दुसऱ्या लग्नाबद्दल खुलासा, पहिलं लग्नही लपवलं होतं