सुव्रत जोशी आणि सखी गोखले अडकणार लग्नाच्या बेडीत

सुव्रत जोशी आणि सखी गोखले अडकणार लग्नाच्या बेडीत

आनंदाची बातमी…’दिल, दोस्ती आणि दुनियादारी’ मधली प्रेक्षकांची आवडती जोडी सुव्रत जोशी आणि सखी गोखले लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. बी टाऊनप्रमाणेच सध्या एम टाऊनमध्येही लग्नाचे वारे आहेत. 2018 सालामध्ये मराठीतील अनेक जोड्या लग्नबंधनात अडकल्या. तसंच या वर्षाच्या सुरूवातीलाही मराठीतील काहींचं लग्न झालं तर काहींनी साखरपुडा केला आणि चर्चा आहे ती सुव्रत आणि सखीच्या लग्नाची.
 

 

 


View this post on Instagram


 

 

Thanks for being my introduction to pork. Luv ya! 🙌🏼🐷


A post shared by Sakhi Gokhale (@sakheeg) on
सखी आणि सुव्रत बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत आहेत. दोस्ती आणि प्रेमानंतर आता ही जोडी आपल्या नात्याचं रूपांतर लग्नामध्ये करणार आहे. सूत्रानुसार, येत्या 11 एप्रिलला हे दोघं लग्न करणार असल्याचं म्हटलं जातंय. पण हे लग्न कुठे होणार याबाबत जास्त कोणतीही माहिती अजून उपलब्ध झाली नाही.

नुकतंच सखीने तिच्या इन्स्टा अकाउंटवर काही फोटो शेअर केले होते. ज्यामध्ये ती पार्टी करताना दिसत आहे. या फोटोजना पाहून हे तिच्या बॅचलरेट पार्टीचे असावेत, अशी चर्चा आहे. कारण यातील एका फोटोमध्ये तिने 'बी' असं अल्फाबेट असलेला सॅश घातला आहे.
 

 

 


View this post on Instagram


 

 

Jiggle and Wave, Jiggle and Wave. 🐧❤️#AmarPhotoStudio #Kalakarkhaana


A post shared by Sakhi Gokhale (@sakheeg) on
सुव्रत आणि सखीने सर्वात आधी मराठीतील प्रसिद्ध सीरियल' दिल, दोस्ती, दुनियादारी'मध्ये एकत्र काम केलं होतं. तसंच मराठी नाटक अमर फोटो स्टुडिओमध्येही ही जोडी एकत्र होती. यानंतर दिल दोस्ती दोबारा या दुसऱ्या सिझनमध्येही हे दोघं एकत्र होते.

मात्र सखी गोखले उच्च शिक्षणासाठी युकेला गेल्यावर काही काळापासून हे कपल लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये होतं. इन्स्टावरील त्यांच्या अनेक पोस्टमधून त्यांचं हे लाँग डिस्टन्स प्रेम अनेक चाहत्यांनी पाहिलं होतं. एवढंच नाहीतर सखीने सुव्रत अमेरिकेच्या दौऱ्यासाठी निघाला असताना त्याला एअरपोर्टवर भेटून सरप्राईजही दिलं होतं.


आता त्यांच्या लग्नाच्या बातमीने दोघांच्याही चाहत्यांना आनंद होईल हे मात्र नक्की.


हेही वाचा -


अनिकेत आणि स्नेहाची लग्नगाठ


जय मल्हारफेम ‘म्हाळसा’ अडकली लग्नाच्या बेडीत