प्रेमात पडल्यावर आणि लग्न ठरल्यावर मुलांना ‘जोरू का गुलाम’ या नावाने चिडवण्यात येतं. आता अभिनेता सुव्रत जोशीही ‘जोरू का गुलाम’ झालाय. मात्र त्याचं लग्न ठरलं नसून तो ‘डोक्याला शॉट’ या चित्रपटात जोरू का गुलाम झाला आहे. सुव्रत जोशी आणि प्राजक्ता माळी यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘डोक्याला शॉट’ या चित्रपटाचं एक धमाल गाणं नुकतच सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या चित्रपटात सुव्रत, प्राजक्ता यांच्यासोबत गणेश पंडित, रोहित हळदीकर, ओंकार गोवर्धन देखील धमाल मस्ती करताना दिसत आहेत. या चित्रपटात सुव्रत एका मराठी तरूणाची भूमिका करत असून तो प्राजक्ता माळी साकारात असलेल्या 'सुब्बू लक्मी' या साऊथ इंडीयन तरूणीच्या प्रेमात पडतो अशी कथा आहे. जोरू का गुलाम या गाण्यात या दोघांचं लग्न ठरल्यावर त्याचे मित्र त्याला जोरू का गुलाम या नावाने चिडवू लागतात असा प्रसंग रंगविण्यात आलं आहे. या गाण्याचे "बोल तू नही तेरी मर्जी का मालिक तू गुलाम तेरी जोरू का" असे बोल असून विनोदी पद्धतीने ते चित्रीत करण्यात आलं आहे. या गाण्याची कोरिओग्राफी फुलवाखामकरने केली आहे. या गाण्यात महाराष्ट्रीय आणि साऊथ इंडीयन अशा दोन्ही संगीताचा वापर केल्यामुळे ते फारच मनोरंजक झालं आहे. सध्या सोशल मीडियावर हे गाणं व्हायरल होत असून त्या गाण्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या गाण्याचे बोल गुरू ठाकूर यांनी लिहीले असून श्रीकांत आणि अनिता या नवोदित जोडीने हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. विशेष म्हणजे हे लोकप्रिय गायक केैलाश खेर यांनी गायलं आहे.
डोक्याला शॉटची कॉमेडी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
‘अ व्हिवा इनएन’ या प्रॉडक्शन हाऊसचा 'डोक्याला शॉट' चित्रपट उत्तुंग हितेंद्र ठाकूर निर्मित आणि सुमन साहू चित्रित आहे. हा चित्रपट येत्या १ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे जोरू का गुलाम या गाण्यामध्ये निर्माते हितेंद्र ठाकूर यांचीही मजेशीर झलक प्रेक्षकांना पाहता येणार आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचं हटके ट्रेलर प्रदर्शित करण्यात आहे.
सुव्रत आणि प्राजक्ता पहिल्यांदाच करणार एकत्र काम
दिल दोस्ती दुनियादारी’ या मालिकेतून सुजय अर्थात आपला सुव्रत जोशी प्रेक्षकांच्या घरात पोहचला. त्याचा कॉमेडी सेन्स अगदी कमाल आहे. अगदी मोजक्या शब्दात आणि चेहऱ्यावरील परफेक्ट हावभावातून तो विनोद निर्माण करतो. प्राजक्ता माळीच्या विनोदी अभिनयाचे तर नकटीच्या लग्नाला या मालिकेतून फारच कौतक झाले. आता ही विनोदी जोडी डोक्याला शॉट या चित्रपटातून पहिल्यांच एकत्र येत आहे. त्यामुळे प्रेक्षकांना कॉमेडीची भन्नाट मेजवानी मिळण्याची शक्यता आहे.
अधिक वाचाः
जय मल्हारफेम ‘म्हाळसा’ अडकली लग्नाच्या बेडीत
फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम