‘रुद्रकाल’ मालिकेमध्ये स्वानंद किरकिरे साकारणार निर्दयी आमदार - राजकारण्याची भूमिका

‘रुद्रकाल’ मालिकेमध्ये  स्वानंद किरकिरे साकारणार निर्दयी आमदार - राजकारण्याची भूमिका

प्रत्येक लेखक ,कथाकारामध्ये नायकआणि विरोधक मनात असतो, कारण या दोन गोष्टींशिवाय एक कथा अपूर्ण आणि कुचकामी असल्याचे म्हटले जाते. रुद्राकाल या आगामी मालीकेच्या निर्मात्यांनी छोट्या पडद्यावर अभिनयाचा श्रीगणेशा करण्यासाठी प्रख्यात गीतकार, लेखक, प्लेबॅक सिंगर आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता स्वानंद किरकिरे यांना करारबद्ध केले आहे. स्वानंद किरकिरे (Swanand Kirkire) यांच्या गाण्यांनी रसिकांच्या मनात खोलवर प्रभाव पाडला आहे हे नाकारता येणार नाही. एक अष्टपैलू गीतकार, संवाद लेखक, मधुर आवाजाची देणगी लाभलेला पार्श्वगायक आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी) चे पदवीधर असलेल्या स्वानंद किरकिरे यांनी अनेक अनोख्या भूमिका साकारत प्रेक्षकांची दाद मिळवली आहे. मनोरंजनाच्या दुनियेसाठी स्वानंद किरकिरे ही मिळालेली मोठी देणगी आहे. आपल्या अंगी असलेल्या उपजत कलागुणांच्या जोरावर त्यांनी रसिकांच्या मनात एक स्थान मिळवले आहे . असे हे बहुआयामी, प्रतिभावान व्यक्तिमत्त्व आता स्टार प्लस ’बहुप्रतिक्षित अशी मालिका ‘ रुद्राकाल ’मध्ये आमदार फुलचंद मिश्रा ही भूमिका साकारताना पहायला मिळणार आहेत.

लग्नाच्या सहा वर्षांनंतर घरात येणार नवा पाहुणा, अभिनेत्रीने शेअर केला फोटो

नवी वाटचाल, स्वानंदची नवी भूमिका

आपल्या नव्या वाटचाली संदर्भात स्वानंद किरकिरे यांनी सांगितले की , “छोट्या पडद्यावर अभिनयासाठी पदार्पण करताना स्टार प्लस आणि निर्माते नितीन वैद्य यांच्याबरोबर काम करताना मला आनंद झाला आहे . आगामी मालिकेचा विषय आणि त्यातील मुख्य सूत्रधाराची भूमिका करत असल्याने मला या मालिकेविषयी खूपच उत्सुकता आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे  या मालिकेमुळे मला वेगवेगळ्या लोकांसह काम करायला मिळणार असून  आजच्या काळातील डॉन साकारायला मिळणार आहे .  मी नेहमीच  पडद्यावरील  आणि पडद्यामागील भूमिकेला महत्व देत आलो आहे. त्यामुळे मी रुद्रकाल मधील  खलनायकी अंगाने जाणारी भूमिका करण्यास होकार दिला. 

किरकिरे पुढे म्हणाले, मानवी जीवन हे काही सरळसोट एकमार्गी नाही . त्यात गुंतागुंत आहे.  तशी भूमिका साकारण्यासाठी सेटवर जाणे ही मजाच असेल. नवीन वैशिष्ट्यांशी जुळवून घेत, नव्या व्यक्तीचे पुनरावलोकन केल्यामुळे एक परिपूर्ण अभिनेता बनण्यास खूपच मदत होते.   मी खूप गुंतागुंतीची पात्रे साकारत असतो, तशी भूमिका साकारणे हे अगदी १०० टक्के आवहनात्मक असते, त्यामुळे अशा कामातून मला आनंद मिळतो. ठीक आहे, आम्ही एवढेच म्हणू शकतो की,आगामी काळात आम्ही त्याला टीव्हीवर पाहण्यासाठी जास्त काळ वाट बघू शकत नाही !

दीया और बाती हम फेम कनिका महेश्वरीने '17' किलो वजन केलं कमी

7 मार्चपासून प्रेक्षकांच्या भेटीला

दश्मी प्रॉडक्शन्सची निर्मिती असलेल्या या मालीकेत दर्शकांना एका प्रामाणिक आयपीएस अधिकारी, डीसीपी रंजन चित्तोडा याची कहाणी पहायला मिळेल. ज्याच्यावर त्याचा आदर्श असलेल्या त्याच्या गुरूच्या हत्येची चौकशी करण्याची जबाबदारी सोपवण्यात येते . नवीन गुन्हे अन्वेषक थ्रीलर नात्यमय घडामोडी असलेल्या या मालिकेत भानु उदय गोस्वामी (डीसीपी रंजन चित्तोडा) आणि दीपनिता शर्मा (डीसीपीची पत्नी आणि अंशुमनची आई) यांच्यासह रुद्राक्ष जयस्वाल प्रमुख भूमिकेत आहेत. रविवार 7 मार्चपासून संध्याकाळी 7 वाजता स्टार प्लस वर सुरु होणारी थरारक मालिका रुद्रकाल आता प्रेक्षकांना किती आवडेल याचीच उत्सुकता आहे.

बिग बॉस फेम देवोलिना भट्टाचार्जी लवकरच करतेय लग्न

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक