5 वर्ष रिलेशनशिप नंतर स्वरा भास्करचं झालं ब्रेकअप!

5 वर्ष रिलेशनशिप नंतर स्वरा भास्करचं झालं ब्रेकअप!

बॉलीवूडमध्ये नातं जितक्या पटकन जुळतं तितक्याच पटकन ते तुटतंही. बऱ्याचदा हे नातं तुटण्याची कारणंही खूप वेगळी असतात. असंच बॉलीवूडमधील अजून एका अभिनेत्रीचं नातं तुटल्याचं नुकतंच समोर आलं आहे. बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) आपल्या बिनधास्त वक्तव्य आणि अभिनयासाठी ओळखली जाते. त्यामुळे ती नेहमीच चर्चेत असते. पण स्वरा आता पुन्हा चर्चेत आली आहे ती, तिच्या खासगी आयुष्यामुळे. गेले पाच वर्ष असलेल्या नात्याचं आता स्वराने ब्रेकअप केल्याचं समोर आलं आहे. 

स्वराचं झालं ब्रेकअप

Instagram

‘वीरे दी वेडिंग’फेम बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker)  सध्या आपल्या खासगी आयुष्यामुळे खूपच चर्चेत आहे. स्वरा मागच्या 5 वर्षांपासून पुरस्कार विजेता लेखक हिमांशू शर्मा (Himanshu Sharma) सह नात्यात होती. या दोघांचीही भेट आनंद एल. राय दिग्दर्शित चित्रपट ‘तनू वेड्स मनू’ (Tanu Weds Manu) च्या चित्रीकरणादरम्यान झाली होती. या चित्रपटात स्वराची भूमिका दुय्यम असली तरीही प्रेक्षकांच्या लक्षात राहणारी होती. ही कथा हिमांशू शर्माने लिहिली होती. हिमांशूबद्दल स्वरा नेहमी आम्ही एकमेकांना समजून घेतो असं म्हणायची. पण आता याच कारणामुळे दोघं वेगळे होत असल्याचं समोर आलं आहे. 

ब्रेकअपचं कारण नक्की काय?

Instagram

स्वरा भास्कर नेहमीच गंभीर गोष्टींवर आपलं मत व्यक्त करताना दिसली आहे. पण जेव्हापासून हिमांशू शर्मा आणि स्वराच्या नात्याच्या ब्रेकअपची चर्चा सुरु झाली आहे. स्वराने कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. सध्या अशी चर्चा असली तरीही हिमांशू अथवा स्वरा दोघांनीही याबाबत कोणतंही स्टेटमेंट दिलेलं नाही. आपल्या भविष्याबाबत या दोघांचेही विचार वेगळे असल्यामुळे या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला असल्याचं कारण सध्या समोर आलं आहे. पण नक्की कारण काय आहे हे आता दोघेही जेव्हा बोलतील तेव्हाच सर्वांना कळू शकतं. जोपर्यंत हे बोलणार नाहीत तोपर्यंत रोज नवीन नवीन कारण समोर येत राहणार. 

विवादांसाठी प्रसिद्ध आहे स्वरा

स्वरा भास्कर आणि विवाद हे एक समीकरणच आहे. वीरे दी वेडिंग या चित्रपटातील मास्टरबेशनच्या सीनमुळे स्वराला खूपच ट्रोल करण्यात आलं होतं. इतकंच नाही पद्मावत या चित्रपटातील काही सीन्सवर स्वराने केलेल्या काही कमेंट्समुळेदेखील तिला प्रखर विरोध करण्यात आला होता. तर नुकतचं निवडणुकीच्या वेळीदेखील कन्हैय्याला दिलेल्या पाठिंब्यानंतर स्वरावर टीकेची झोड उठली होती. स्वरा नेहमीच कोणत्या ना कोणत्या तरी वादविवादामध्ये अडकलेली दिसून येते. 

सध्या ‘शीर कोरमा’मध्ये व्यग्र

स्वरा सध्या एका क्राईम थ्रिलर सिरिजमध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. तसंच ती अभिनेत्री दिव्या दत्ताबरोबर ‘शीर कोरमा’ मध्ये लेस्बियन असल्याची भूमिका साकारत आहे. यामध्ये या दोघी एकमेकींबरोबर रोमान्स करताना दिसणार आहेत. त्यामुळे आता स्वरा कोणत्या नवीन वादाला तर नाही ना तोंड फोडणार? याकडेही तिच्या चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. दरम्यान स्वराने याव्यतिरिक्त कोणत्याही नव्या चित्रपटाची घोषणा केलेली नाही. तिच्या अभिनयापेक्षा सध्या ती अनेक वादविवादांमध्येच अडकली असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे स्वरा आता आपल्या ब्रेकअपवर काय बोलणार याकडेही तिच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.