बॉलीवूड अभिनेत्री स्वरा भास्करने आपल्याल हटके स्टाईलने बॉलीवूडमध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सोशल मीडियावर स्वरा सतत अॅक्टिव्ह असते. सामाजिक विषयांवरील तिच्या सडेतोड आणि वादग्रस्त बोलण्याने ती नेहमीच चर्चेचा विषय ठरते. ‘वीरे दी वेडींग’ मधली तिची भूमिकादेखील यामुळे जरा जास्तच गाजली. शिवाय तिला नेहमीच चाकोरीबाहेरील भूमिका करणं आवडतं. काही दिवसांपासून सोशल मीडियावर स्वराची स्टंटबाजी शेअर होते आहे. स्वरा पहिल्यांदाच अशी अॅक्शन भूमिका साकारत आहे. सहाजिकच ही भूमिका साकारण्यासाठी स्वराला प्रचंड मेहनत घ्यावी लागत आहे. सध्या ती अॅक्शन दिग्दर्शक हबीब रिजवान यांच्यासोबत अॅक्शनचे धडे गिरवत आहे.
View this post on Instagram
स्वरा भास्कर साकारणार 'ही' हटके भूमिका
स्वरा तिच्या आगामी वेबसिरीजसाठी ही हटके भूमिका करत आहे. ‘फ्लेश’ असं या वेबसिरीजचं नाव असून स्वरा यात एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याची भूमिका असल्याने स्वराला यात भरपूर अॅक्शन मूव्ह्ज कराव्या लागणार आहेत. फ्लेश ही वेबसिरीज भारतातील मानवी तस्करी या विषयावर आधारित आहे. स्वरा या वेबसिरीजमध्ये मानवी तस्करी थांबविण्यासाठी लढणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. पोलिसांना देशबांधवांच्या संरक्षणासाठी सतत दक्ष राहवं लागतं. अहोरात्र मेहनत घेऊन ते देशाची सेवा बजावत असतात. अनेक कठीण प्रसंगांना तोंड द्यावं लागत असताना पोलिस बांधवांना कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागतं. देशसेवेसाठी झटताना त्यांना काय मर्यांदा पाळाव्या लागतात अशा विविध गोष्टींचा उलगडा या वेबसिरीजमधून केला जाणार आहे. पोलिसांच्या जीवनावर आधारित ही वेब सिरीज असल्याने या वेबसिरीजमध्ये सतत मारामारी आणि चकमकींचे सीन असणार आहेत.
View this post on Instagram
स्वरा भास्कर आणखी एका नव्या भूमिकेत
अभिनयासोबतच स्वरा आणखी एका क्षेत्रात आपली दमदार पावलं रोवत आहे. नुकतंच स्वराने तिच्या भावासोबत एक प्रॉडक्शन हाऊस सुरू केलं आहे. स्वरा ‘कहानीवाले’ या तिच्या नव्या प्रॉडक्शन हाऊसमधून आता निर्मिती क्षेत्रात उतरत आहे. स्वराने आतापर्यंत ‘अनारकली ऑफ आरा’, ‘वीरे दी वेडींग’, ‘निल बटे सन्नाटा’, ‘तन्नू वेडस् मन्नू’ या चित्रपटांमधून काम केलं आहे. सक्षम अभिनय आणि हटके विषय यामुळे तिच्या अनेक भूमिका गाजल्या. शिवाय अनेक वेबसिरीजमध्ये स्वराने निरनिराळ्या भूमिका साकारल्या आहेत. आता ‘फ्लेश’ या वेबसिरीजमधील तिची ही हटके भूमिका नेमकी कशी असणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
‘भारत’मध्ये होळी-दिवाळीच्या गाण्यावर दिसणार सलमान-कतरिनाची रोमँटिक केमिस्ट्री
गुंजन सक्सेनासाठी जान्हवी कपूर वाढवतेय वजन
21 व्या मामी फिल्म फेस्टिव्हलमध्ये दीपिका पदुकोण नवी चेअरपर्सन
फोटोसौैजन्य- इन्स्टाग्राम