टेलिव्हिजनवरील मालिका आणि प्रेक्षकांचं नेहमीच अतूट नातं असतं. ज्यामुळे मालिका आणि त्यामधील पात्र कमी वेळात लवकर लोकप्रिय होतात. सध्या मराठी वाहिन्यांवर अशा अनेक मालिका आहेत ज्या प्रेक्षकांना मनापासून आवडतात. सायंकाळी घरोघरी कुटूंबासोबत एकत्र बसून या मालिका पाहिल्या जातात. विशेष करून महिलांमध्ये या मालिका जास्त प्रमाणात लोकप्रिय आहेत. मात्र मालिकांच्या या मालिकेत एक अशीही मालिका आहे जी लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच आवडते. ही मालिका एक ऐतिहासिक मालिका असल्यामुळे त्याचे कथानक काल्पनिक नसून खरे आहे. महाराष्ट्राच्या इतिहासाचा मागोवा या मालिकेतूून घेण्यात आलेला असल्यामुळे इतिहासप्रेमी प्रेक्षकांसाठी ही मालिका म्हणजे एक पर्वणीच आहे. मात्र आता ही लोकप्रिय मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेण्याच्या मार्गावर आहे.
कोणती मालिका घेतेय प्रेक्षकांचा निरोप
झी मराठी वाहिनीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेनं अल्पावधीतचं प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. सुरुवातीपासूनच या मालिकेला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं. कुठलीही ऐतिहासिक भूमिका प्रेक्षकांना पटेल अशी निभावणं हे कलाकारासाठी आव्हानात्मक असतं आणि तीच भूमिका सहजरित्या निभावणं हे त्या कलाकाराचं यश आहे. मालिकेतील प्रत्येक पात्र संभाजी महाराजांचा इतिहास प्रेक्षकांच्या डोळ्यांपुढं उभा करण्यात यशस्वी झालंय. अल्पावधीतच लोकप्रिय झालेली ही मालिका मात्र आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. सूत्रांकडून मिलेल्या माहितीनुसार या मालिकेचा शेवटचा भाग नुकताच चित्रित करण्यात आला. जवळपास २ वर्ष या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं.
या मालिकेच्या लोकप्रियतेचं गुपित
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतून संभाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्वाच्या घडामोडींवर, तसेच बारीकसारीक प्रसंगांवर प्रकाश टाकण्यात आला. डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारलेली संभाजी यांची भूमिका, तसेच शंतनू मोघे यांनी साकारलेली शिवाजी महाराजांची भूमिका आणि प्राजक्ता गायकवाडने साकारलेली येसूबाईंची भूमिका यांनादेखील प्रेक्षकांचे तितकेच प्रेम मिळाले. फेब्रुवारीमध्ये या मालिकेचा अखेरचा भाग प्रसारित होणार अशी माहिती मिळाली आहे. ज्यामुळे या मालिकेच्या चाहत्यांसाठी नक्कीच हा एक अचानक मिळणारा धक्का असणार आहे. या मालिकेची जागा कुठली मालिका घेणार अजूनही गुलदस्त्यात आहे. मात्र या मालिकेच्या आठवणी प्रेक्षकांच्या मनात नक्कीच तशाच राहतील.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
हे ही वाचा –
#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.
अधिक वाचा –
मिसेस मुख्यमंत्रीमधील सुमीचा ऑफस्क्रीन लुक
Bigg Boss 13: रश्मी देसाईने केलं अरहान खानबरोबर ब्रेकअप, हिमांशीकडून घरच्यांना निरोप
तैमूरची बहीण इनाया बोलते ‘ही’ जगावेगळी भाषा