स्वीटी सातारकरचा सापडला पत्ता…

स्वीटी सातारकरचा सापडला पत्ता…

काही दिवसांपूर्वी अभिनेता संग्राम समेळनो स्वीटी सातारकर नामक तरुणी त्याला सतत मेसेजेस पाठवून हैराण करत असल्याची तक्रार सोशल मीडियात पोस्ट टाकून केली होती. त्यामुळे ही स्वीटी सातारकर कोण, असा प्रश्न सर्वांनाच पडला होता.पण अखेर या स्वीटी सातारकरचा पत्ता आता सापडला आहे.

कोण आहे स्वीटी सातारकर?

स्वीटीच्या बातमीने संग्राम समेळचे फॅन्स चिंतेत होते पण ही स्वीटी सातारकर दुसरी तिसरी कोणी नसून हा आहे आगामी चित्रपट. नुकताच या चित्रपटाचा धमाल टीजर सोशल मीडियाद्वारे सादर करण्यात आला. या चित्रपटाच्या पब्लिसिटीसाठी वापरण्यात आलेली ही ट्रीक फारच चांगली चालली. यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकताही निर्माण झाली. तर अत्यंत अतरंगी अशा स्वीटी सातारकर या तरुणीची गोष्ट या चित्रपटात मांडण्यात आली आहे. एका तरुणाच्या मागे लागलेल्या या स्वीटी सातारकरला तो तरुण मिळतो का, अशी गोष्ट या चित्रपटात आहे. चित्रपटाच्या टीजरवरून हा चित्रपट पुरेपूर मनोरंजक आणि फ्रेश दिसतो आहे. त्यामुळे या चित्रपटाकडे आता चित्रपटप्रेमींचं लक्ष लागलं आहे.

स्वीटीच्या भूमिकेत अमृता

स्वीटी या तरूणीच्या भूमिकेत अमृता देशमुख आहे. या स्वीटीचा लुक बंटी और बबलीमधल्या रानी मुखर्जीसारखा वाटत आहे. छोट्या पडद्यावरील ‘मी तुझीच रे’ मालिकेनंतर आता अमृता स्वीटीच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातून पहिल्यांदाच संग्राम आणि अमृताची फ्रेश जोडी आपल्या भेटीला येतेय. नुकताच संग्रामचा विक्की वेलिंगकर हा चित्रपट येऊन गेला. त्यानंतर संग्राम सध्या कुसुम मनोहर लेले या नाटकात ही महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे.

View this post on Instagram

Nakki yaa!😇

A post shared by Sangram Samel (@sangramsamel) on

स्वीटी सातारकरची टीम

मुनाफ नाईक, संतोष साबळे यांनी निर्मिती केलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन शब्बीर नाईक यांनी केलं आहे. सुमित गिरी यांनी चित्रपटाचं लेखन, संतोष मुळेकर यांनी संगीत दिग्दर्शन, फैसल महाडिक यांनी संकलन, मंगेश कांगणे आणि सुहास सावंत यांनी गीतलेखन केलं आहे. वर सांगितल्याप्रमाणेच चित्रपटात अमृता देशमुख आणि संग्राम समेळ सोबतच विजय निकम, गौरी जाधव, वंदना वाकनीस, पुष्कर पुष्कर लोणारकर, विनम्र भाबल, प्रशांत विचारे अशी दमदार स्टारकास्ट आहे. हा चित्रपट 22 फेब्रुवारीला रिलीज होत आहे. 

पाहूया या स्वीटीला प्रेक्षकांची कितपत पसंती मिळते.

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.