‘स्वीटी सातारकर’चा नादच नको, सिनेमातील धमाकेदार गाणं रिलीज

‘स्वीटी सातारकर’चा नादच नको, सिनेमातील धमाकेदार गाणं रिलीज

'नाद नको दादा, पाठीशी बाय माझी... स्वीटी!' असे मजेदार शब्द असलेलं "स्वीटी सातारकर" या चित्रपटातलं गाणं रिलीज करण्यात आलं आहे.  उडत्या चालीचं ताल धरायला लावणारं हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात हिट होत आहे. मुनाफ नाईक, संतोष साबळे यांनी निर्मिती केलेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन शब्बीर नाईक यांनी केलं असून ध्रुव दास, सतीश जांभे आणि स्वरूप स्टुडिओझ हे या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. सुमित गिरी यांनी चित्रपटाचं लेखन, संतोष मुळेकर यांनी संगीत दिग्दर्शन, फैसल महाडिक यांनी संकलन, मंगेश कांगणे आणि सुहास सावंत यांनी गीतलेखन केलं आहे. चित्रपटात अमृता देशमुख, संग्राम समेळ, विजय निकम, गौरी जाधव, वंदना वाकनीस, पुष्कर लोणारकर, विनम्र भाबल, प्रशांत विचारे अशी दमदार स्टारकास्ट आहे. तर नकाश अझीझ आणि भारती माधवी यानी हे गाणं गायलं आहे. अत्यंत अतरंगी अशा स्वीटी सातारकर या तरुणीची गोष्ट या चित्रपटात मांडण्यात आली आहे. एका तरुणाच्या मागे लागलेल्या या स्वीटी सातारकरला तो तरुण मिळतो का अशी गोष्ट या चित्रपटात आहे. चित्रपटाचा टीजर आणि धमाकेदार गाण्यामुळे हा चित्रपट पुरेपूर मनोरंजक आणि फ्रेश दिसतो आहे. त्यामुळे या चित्रपटाकडे आता चित्रपटप्रेमींचं लक्ष लागलं आहे. येत्या 28 फेब्रुवारीला "स्वीटी सातारकर" हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

(वाचा : सो क्युट ! लिटिल लायन लुकमधील तैमूरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल)

कोण आहे स्वीटी सातारकर?

काही दिवसांपूर्वी अभिनेता संग्राम समेळने स्वीटी सातारकर नामक तरुणी त्याला सतत मेसेजेस पाठवून हैराण करत असल्याची तक्रार सोशल मीडियावर पोस्ट अपडेट केली होती. त्यामुळे ही स्वीटी सातारकर कोण, असा प्रश्न सर्वांनाच पडला होता.पण अखेर या स्वीटी सातारकरचा पत्ता आता सापडला आहे. स्वीटीच्या बातमीने संग्राम समेळचे फॅन्स चिंतेत होते पण ही स्वीटी सातारकर दुसरी तिसरी कोणी नसून हा आहे आगामी चित्रपट. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियाद्वारे सादर करण्यात आला. या चित्रपटाच्या पब्लिसिटीसाठी वापरण्यात आलेली ही ट्रीक फारच चांगली चालली. यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकताही निर्माण झाली. तर अत्यंत अतरंगी अशा स्वीटी सातारकर या तरुणीची गोष्ट या चित्रपटात मांडण्यात आली आहे. एका तरुणाच्या मागे लागलेल्या या स्वीटी सातारकरला तो तरुण मिळतो का, अशी गोष्ट या चित्रपटात आहे. चित्रपटाच्या टीजरवरून हा चित्रपट पुरेपूर मनोरंजक आणि फ्रेश दिसतो आहे. त्यामुळे या चित्रपटाकडे आता चित्रपटप्रेमींचं लक्ष लागलं आहे.

(वाचा : कार्तिकनं सारासोबतचा 'हा' व्हिडीओ केला शेअर, कॅप्शन पाहून चढला पारा)

स्वीटीच्या भूमिकेत अमृता
 
स्वीटी या तरूणीच्या भूमिकेत अमृता देशमुख आहे. या स्वीटीचा लुक बंटी और बबलीमधल्या रानी मुखर्जीसारखा वाटत आहे. छोट्या पडद्यावरील ‘मी तुझीच रे’ मालिकेनंतर आता अमृता स्वीटीच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातून पहिल्यांदाच संग्राम आणि अमृताची फ्रेश जोडी आपल्या भेटीला येतेय. नुकताच संग्रामचा विक्की वेलिंगकर हा चित्रपट येऊन गेला. त्यानंतर संग्राम सध्या कुसुम मनोहर लेले या नाटकात ही महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे.

(वाचा :  ‘देवाक काळजी रे’ गाणं ठरलं 100 मिलियन व्ह्यूजचं मानकरी)

हे देखील वाचा : 

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.