ADVERTISEMENT
home / मनोरंजन
अखेर स्वीटुने दिली प्रेमाची कबुली, आता येणार मालिकेत रंगत

अखेर स्वीटुने दिली प्रेमाची कबुली, आता येणार मालिकेत रंगत

मालिका रंगात आली की बघण्याची मजा ही वेगळीच असते. आता झी मराठीवरील अनेक मालिका रंजक वळणावर आल्या आहेत. ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही मालिका देखील आता एका गोड वळणावर आली आहे. या मालिकेत स्वीटुने ओमला प्रेमाची कबुली दिली आहे. एखादा हिरो आतापर्यंत हिरोईनच्या मागे जातो असे दाखवण्यात येते. पण चक्क स्वीटु एअरपोर्टवर जाऊन आपले प्रेम व्यक्त करते. हा एपिसोड आणि त्याचे प्रोमो पाहून खूप जणांना ओ…. किती गोडं अशी प्रतिक्रिया नक्कीच आली असेल जाणून घेऊया ओम-स्वीटुच्या या प्रेमकथेविषयी

पकडला जाणार देवी सिंग, ‘देवमाणूस’ मालिकेला रंजक वळण

अखेर दिली प्रेमाची कबुली

मराठी मालिका ज्यावेळी ट्रॅक सोडू लागतात तेव्हा त्याचा खूपच कंटाळा येऊ लागतो.अनेक मराठी मालिका सध्या अशाच काहीशा ट्रॅकवर आहे. पण येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका आता रंजक वळणावर आली आहे. ओमचे स्वीटुवरचे प्रेम त्याने या आधीही कबूल केले होते. पण स्वीटुलाच तिचे प्रेम कळत नव्हते. पण आता तिलाही या प्रेमाची जाणीव झालेली आहे. मोहितने साखरपुडा मोडल्यानंतर त्या समारंभात जो काही तमाशा झाला त्यानंतर लगेचच स्वीटु ओमशी साखरपुडा करेल असे वाटले होते. पण तसे काही झाले नाही. स्वीटुचे काहीही न बोलणे त्याला एवढे लागले की, त्याने देश सोडून जाण्याचा निर्णय घेतला. ओमला थांबवण्यासाठी आणि आपल्या प्रेमाची कबुली देण्यासाठी लगेचच ती विमानतावर धावत जाते. प्रेमाची कबुली देते.त्यामुळे आता यापुढे काय होणार याची प्रतिक्षा सगळेच पाहात आहेत. 

नलूचा राग

मोहित हा खराब असून सुद्धा नलू म्हणजे स्वीटुची आई ही मोहितशी लग्न लावण्याचा हट्ट करते हे खूप जणांना पटले नव्हते. नलू मावशीचे कॅरेक्टर करणारी दिप्ती केतकर हिचा अभिनय पाहून खूप जणांनी त्यावर विनोदही केले होते. केवळ गरीब आहे म्हणून ओमशी बरोबरी होऊ शकत नाही असे म्हणत नलू जो काही गोंधळ घालत होती. त्यामुळे सगळ्यांनाच त्याचा राग येत होता. मोहित हा स्वीटुशी खराब वागतो हे माहित असूनही ती अशी का करते? आपल्या मुलीचे चांगले हिला कळत नाही का अशी प्रतिक्रियाही उमटत होती.  पण आता अखेर स्वीटुनेच ओमला प्रेमाची पसंती दिल्यामुळे सगळ्यांच्याच मनात येस अशी प्रतिक्रिया उमटली असेल. 

ADVERTISEMENT

‘तू सौभाग्यवती हो’ मध्ये 1 जूनपासून दिसणार ऐश्वर्या आणि सूर्यभानचा विवाह सोहळा

शुभ्राही होणार कडक

स्वीटुने प्रेमाची कबुली दिली ही आनंदाची गोष्ट असताना आता अग्गंबाई सूनबाई मालिकेत देखील शुभ्रा बदलली आहे. शुभ्रा जी अगदीच या मालिकेत मुळमुळीत दाखवण्यात आली होती. पण आता तिचे रुप बदलताना दाखवले आहे. पुन्हा एकदा जुनी शुभ्रा पुन्हा एकदा मालिकेत परतणार आहे. आपले करिअर सोडून घर संसाराला लागलेली शुभ्रा आपला स्वाभिमान विसरत चालली होती पण आता ती पुन्हा एकदा कामाला लागणार आहे. तिने तशी तयारी सुरु केली आहे. शिवाय सोहमला धडा शिकवण्यासाठीही ती सज्ज झाली आहे. 

एकूणच तुम्ही मालिका वेडे असला तर तुम्हाला मालिकेतील हे रंजक वळण नक्की आवडेल 

तमाशा रंगभूमीची शान कांताबाई सातारकर यांचे निधन

ADVERTISEMENT

 

26 May 2021
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT