तापसी पन्नूने एकापाठ एक चांगले चित्रपट देत बॉलीवूडमध्ये स्वतःची छाप पाडली आहे. पिंक, मुल्क, नाम शबाना आणि थप्पड सारखे हटके विषय असलेले चित्रपट तिच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरलेत. या चित्रपटात तापसीने सक्षम अभिनयाने त्यातील महिला भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. ज्यामुळे आज तापसीची प्रेक्षकांच्या मनात एक उत्तम छबी निर्माण झाली. तापसीसाठी हा यशाचा प्रवास सहज सोपा नक्कीच नव्हता. साध्या डान्स ऑडिशनसाठी रिजेक्ट झाल्यानंतर तिला ऑडिशनचीच भीती वाटत होती. शिवाय अजूनही चित्रपटसृष्टीत महिलांना हवी तशी वागणूक नक्कीच मिळत नाही. तापसीने हा यशस्वी प्रवास बॉलीवूडच्या यशस्वी अभिनेत्रींकडे पाहत केला आहे. तापसीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने अशी तीन अभिनेत्रींबाबत खुलासा केला आहे. ज्यांनी महिला कलाकारांना चित्रपटसृष्टीत काम करणं अधिक सोपं केलं असं तिचं म्हणणं आहे. यासाठीच जाणून घेऊ या बॉलीवूडच्या अशा तीन अभिनेत्री ज्या तापसी पन्नूसाठी आहेत खास…
कोण आहेत या तीन अभिनेत्री
तापसीला या मुलाखतीत अशा तीन महिलांची नावे विचारण्यात आली ज्यांच्यामुळे महिलांना करिअर करणं सहज सोपं झालं. सहाजिकच तापसीने यासाठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींची नावे निवडली. तिच्या मते चित्रपट सृष्टीत अशा तीन अभिनेत्री आहेत ज्यांनी स्वतःचे करिअर चांगल्या पद्धतीने घडवलं आहे आणि यातून इतरांना शिकण्यासाठी आदर्श निर्माण केला आहे. तापसीच्या मते विद्या बालन, तब्बू आणि प्रियांका चोप्रा या तीन अभिनेत्री चित्रपट सृष्टीत काम करणाऱ्या महिलांसाठी आदर्श आहेत. याचं कारण विद्या बालनने डर्टी, कहानी सारखे महिला प्रधान चित्रपट प्रेक्षकांना दिले, तब्बू बाबत तर तिला नेहमीच उत्सुकता लागून राहते की तिचा आगामी चित्रपट कोणता आणि कसा असेल. प्रियांका चोप्राने फक्त बॉलीवूडच नाही तर हॉलीवूडमध्येही स्वतःचं स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे. सहाजिकच या तीन अशा अभिनेत्री आहेत ज्यांच्यामुळे महिला कलाकारांकडे लोक चांगल्या दृष्टीने आणि आदराने पाहू लागले. महिला कलाकारांना चित्रपटसृष्टीत काम करण्यासाठी चांगल्या संधी मिळू लागल्या. बॉलीवूडमध्ये चांगल्या विषयाचे महिला प्रधान चित्रपट निर्माण होऊ लागले.
तापसीचे आगामी चित्रपट
तापसी पन्नूने सध्या एकापेक्षा एक चांगल्या चित्रपटांचा धडाका लावला आहे. लवकरच ती हसीन दिलरूबा मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तिच्यासोबत या चित्रपटात विक्रांत मेसी आणि हर्षवर्धन राणेदेखील असणार आहे. दोन जुलैला हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. यासोबतच तापसी रश्मि रॉकेट, दोबारा, शाबास मिठ्ठू, लूप लपेटा अशा चित्रपटात झळणार आहे. रश्मि रॉकेट एक स्पोर्ट्स ड्रामा असणार आहे. हा चित्रपट आदर्श खुराना दिग्दर्शित करत आहे. शिवाय रोनी स्कूवाला, नेहा आनंद आणि प्रांजल फिल्मस या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तापसी मागचं वर्षभर या चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेत आहे. हटके विषय, वेगळ्या धाटणीचे आणि महिला प्रधान चित्रपट केल्यामुळे पुढचं वर्षभर तरी तापसी चांगलीच चर्चेत असणार आहे.
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
अधिक वाचा –
मोनालिसाचं घराचं स्वप्नं पूर्ण, आनंदाने झाली व्यक्त
लिटिल चॅम्प्सचं स्वप्न साकारण्यासाठी सारेगमपचा मंच सज्ज