तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर गन उचलून बनणार ‘वुमनिया’

तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर गन उचलून बनणार ‘वुमनिया’

तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकरच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर असून बॉलीवूडमध्ये लवकरच दोघेही डबलधमका करणार आहेत. अर्थात आता दोघीही एका चित्रपटामध्ये एकत्र काम करणार असून या दोन्ही अभिनेत्रींना खूप कमी वेळामध्ये प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. इतकंच नाही तर दोघींच्याही हातात या चित्रपटामध्ये प्रेक्षकांना गन दिसणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडणं साहजिकच आहे की, गन कशासाठी? तर अर्थात या दोन्ही अभिनेत्री करणार असलेला आगामी चित्रपट आहे ‘वुमनिया’ आणि या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे दिग्दर्शक अनुराग कश्यप. अर्थात आता हळूहळू तुम्हाला उलगडा व्हायला सुरुवात होईल.  लवकरच ‘वुमनिया’च्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. अनुराग कश्यपचे चित्रपट म्हणजे चाहत्यांना एक प्रकारची पर्वणीच असते. तापसीने याआधी अक्षयकुमारबरोबर अॅक्शन सीन्स केले आहेत तर भूमीदेखील प्रेक्षकांना ‘सोनचिडिया’ या चित्रपटात सुशांत सिंह राजपूतबरोबर या वेगळ्या अवतारामध्ये दिसणार आहे. पण सध्या भूमी आणि तापसी आपल्या नव्या चित्रपटाच्या तयारीला लागल्या आहेत.


bhumi
अनुराग बऱ्याच कालावधीपासून तयारीत


या चित्रपटासाठी अनुराग कश्यप बऱ्याच कालावधीपासून तयारी करत होता. मात्र काही वित्तीय कारणांमुळे अनुरागचं प्रॉडक्शन हाऊस बंद झालं. पण पुन्हा एकदा या सगळ्यातून बाहेर येत अनुरागने स्वतःच या चित्रपटावर काम करण्यास सुरुवात केली आहे. लवकरच हा चित्रपट फ्लोअरवर जाणार असून आपल्याला कोणतीही वित्तीय अडचण नसून आपण स्वतः हा चित्रपट बनवणार आहोत आणि यासाठी एक मोठे प्रॉडक्शन हाऊस निर्मिती करत असल्याचंही एका मुलाखतीमध्ये अनुराग कश्यपने सांगितले आहे.


महिला शूटर्सवर आधारित चित्रपट


हा चित्रपट दोन महिला शूटर्सच्या जीवनावर आधारित असल्याचंही अनुरागने स्पष्ट केले आहे. चित्रपटाची कथा ही उत्तरप्रदेशाच्या आसपासच्या परिसरातील क्षेत्रात घडणारी आहे. ही ‘चंदरो’ आणि ‘प्रकाशी तोमर’ या दोन नावाच्या महिलांची कथा आहे. या दोन्ही भूमिका तापसी आणि भूमी करणार आहेत. या चित्रपटाचं नाव फायनल झालं नसलं तरीही सध्या ‘वुमनिया’ हेच नाव ठेवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. कदाचित या चित्रपटाचं टायटल बदललं जाऊ शकतं. तापसीला यापूर्वी ‘मनमर्जिया’ या चित्रपटात अनुराग बरोबर काम करण्याचा अनुभव आहे. भूमी आणि तापसी मात्र पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. याआधी मल्टीस्टारर चित्रपट आले आहेत. पण दोन अभिनेत्रींनी महत्त्वाच्या भूमिका निभावणारे असे फारच कमी चित्रपट बनले आहेत आणि हा चित्रपट त्यापैकीच एक आहे.


taapsee


अनुराग, तापसी आणि भूमी डेडली कॉम्बिनेशन


अनुरागच्या चित्रपटामध्ये बऱ्याचदा उत्तर प्रदेश आणि त्या आसपासची पार्श्वभूमीच दाखवण्यात येते. शिवाय अनुरागचे चित्रपट हे अगदी मनात ठसण्यासारखे असतात. भूमी आणि तापसीनेदेखील आतापर्यंत विविध चित्रपट केले असून वेगवेगळ्या विषयांवर भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे त्यांची बॉलीवूडमध्येही एक वेगळी इमेज तयारी झाली आहे. यामुळे अनुराग, तापसी आणि भूमी हे एक डेडली कॉम्बिनेशन प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळेल. अनुरागने आतापर्यंत दिग्दर्शित केलेल्या सर्व चित्रपटांना प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. इतकंचन नाही तर त्याने दिग्दर्शित केलेल्या वेबसिरीजदेखील प्रेक्षकांना खूप आवडल्या आहेत. त्यापैकी काही वेबसिरीजचे संवाद तर अजूनही गाजत आहेत. 


फोटो सौजन्य - Instagram 


हेदेखील वाचा - 


स्वरा भास्करची आता नवी 'स्टंटबाजी'


MeToo मध्ये अडकलेल्या राजकुमार हिरानीच्या मदतीला सोनम कपूर


‘भारत’मध्ये होळी-दिवाळीच्या गाण्यावर दिसणार सलमान-कतरिनाची रोमँटिक केमिस्ट्री