तापसी पन्नूचं लवकरच 'शुभमंगल सावधान', केला खुलासा

तापसी पन्नूचं लवकरच 'शुभमंगल सावधान', केला खुलासा

बॉलीवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) ने खूपच कमी कालावधीमध्ये आपली एक ओळख निर्माण केली आहे. ‘पिंक’, ‘मुल्क’ आणि ‘बदला’ सारख्या चित्रपटातून तापसीला हिट अभिनेत्रींच्या यादीमध्ये स्थान मिळवून दिलं आहे. तसंच मीडियामध्येही तिची एक वेगळी इमेज आहे. कोणत्याही मुलाखतीमध्ये आपण करत असलेल्या चित्रपटांपेक्षा इतर गोष्टींवर बोलणं तापसी सहसा टाळते. पण नुकताच तापसीने आपला हा नियम तोडला आहे. तिने आपल्या खासगी आयुष्याबद्दल खुलासा केला आहे. पहिल्यांदाच तापसीने आपण सिंगल नसून रिलेशनशिपमध्ये असल्याचं तिने म्हटलंं आहे. 

तापसीचा बॉयफ्रेंड इंडस्ट्री बाहेरचा

View this post on Instagram

When in Goa......

A post shared by Taapsee Pannu (@taapsee) on

तापसी पन्नू च्या सोशल मीडिया फीडवर तुम्ही जर सर्च केलात तर तिच्या कुटुंब अथवा तिच्या खासगी आयुष्यातील कोणतेही फोटो तुम्हाला दिसणार नाहीत. त्यामुळे तिच्या खासगी आयुष्यात नक्की काय चालू आहे याचा अंदाज लावणं कोणालाही शक्य नाही. तापसी या इंडस्ट्रीत आल्यापासून ना तिचं नाव कोणाबरोबर जोडण्यात आलं ना तिने कधी दुसऱ्यांच्या अफेअर्सबद्दल चर्चा केली. पण नुकताचा तापसीने आपल्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल असणारा पडदा उचलला आहे. आपल्या आयुष्यात असणारी व्यक्ती ही ना क्रिकेटर आहे ना या इंडस्ट्रीमधील असं खुद्द तापसीने सांगितलं आहे. तापसी ही इंडस्ट्रीत येण्याआधी सॉफ्टवेअर इंजिनिअरचं शिक्षण पूर्ण करून नोकरी करत होती. आतापर्यंत तापसीचा बॉयफ्रेंड हा बॅडमिंटनपटू असल्याचे कयासही अनेक वेळा बांधण्यात आले होते. तापसीने तिच्या बॉयफ्रेंडचं नाव सांगितलं नसून आपण सिंगल नसल्याचं मात्र स्पष्ट केलं आहे. 

तापसी पन्नूला करायची आहे 'या' क्रिकेटरची भूमिका

मुलांच्या आवडीमुळे करायचं आहे लग्न

प्रत्येक मुलीच्या मनात काही स्वप्नं असतात. तापसीदेखील याला अपवाद नाही. एका मुलाखतीमध्ये तापसीने सांगितलं की, तिला मुलं हवी असतील तेव्हाच ती लग्न करणार आहे. तसंच लग्न मोठ्या थाटामाटत करायची तिची इच्छा नाही. बरेच दिवस लग्नाच्या फंक्शन्समध्ये व्यस्त राहण्यापेक्षा एक दिवसात आपल्या कुटुंब आणि जवळच्या मित्रपरिवारासह तापसीला लग्न करायला आवडेल असं तिनं सांगितलं आहे. तापसीच्या म्हणण्याप्रमाणे बरेच दिवस चालणारे हे लग्नाचे कार्यक्रम खूपच थकायला लावतात. लग्न नक्की कधी करणार हे जरी तापसीने सांगितलं नसलं तरीही तिच्या लव्हलाईफबद्दल माहिती मिळाल्याने तिचे चाहते नक्कीच आनंदी झाले असतील. त्यामुळे आता पुढची घोषणा तापसी कधी करणार याचीही उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागली असेल. 

शूटर आजीच्या अवतारात भूमी आणि तापसी मारणार ‘सांड की आँख’

मोठ्या चित्रपटांमध्ये व्यग्र

तापसी पन्नूने आपल्या अभिनयामुळे खूपच मोठे चित्रपटही मिळवले. तिचा आतापर्यंतचा प्रवास हा नक्कीच अप्रतिम आहे. तसंच नुकताच प्रदर्शित झालेला ‘मिशन मंगल’देखील बॉक्स ऑफिसवर खूपच गाजला. सध्या तापसीचा ‘सांड की आँख’ हा भूमी पेडणेकरबरोबर चित्रपट येत असून यामध्ये ती शूटर दादीची भूमिका साकारत आहे. तर याशिवाय ‘रश्मी रॉकेट’ या चित्रपटातील तिची भूमिकाही वेगळी असेल. तसंच अभिनव सिन्हाच्या ‘थप्पड’ या चित्रपटात तापसी अमृता प्रीतम यांची व्यक्तीरेखा साकारत असून त्यासाठी बरीच मेहनत घेत आहे. येत्या काळातही तापसी आपल्या अभिनयाच्या जादूने प्रेक्षकांना आपलंसं करून ठेवणार हे वेगळं सांगायची गरज नाही. पण सध्या तरी तिचे चाहते ती लग्नाची बातमी कधी देतेय याकडे नक्कीच डोळे लावून बसले असतील. 

तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर गन उचलून बनणार ‘वुमनिया’