तापसी पन्नूने मिळवली अजून एक लक्षवेधी भूमिका

तापसी पन्नूने मिळवली अजून एक लक्षवेधी भूमिका

बॉलीवूड स्टार तापसी पन्नू (Taapsee Pannu) सध्या तिच्या करियरमधील सर्वौत्तम स्थानावर आहे.या वर्षी तिचे बॅक टू बॅक तीन चित्रपट रिलीज झाले आहेत. ज्यामध्ये तिने आपल्या सुंदर अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडली. आता पुन्हा एकदा तापसीला धमाकेदार चित्रपट मिळाला आहे. तिने अखेर स्वतःच्या नावावर अजून एक चांगली भूमिका केली आहे. क्रिकेटर मिताली राज (Mithali Raj) वरील बायोपिक शाबाश मिट्ठू (Shabaash Mithu) हा आता तापसीला मिळाला आहे. मेकर्सनी नुकतीच या चित्रपटाची घोषणा केली आहे.

मिताली आणि तापसीने केलं सेलिब्रेशन

मिताली राजवरील हा चित्रपट शाबाश मिट्ठू (Shabaash Mithu) या नावाने बनवला जाणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन शाहरुख खान (Shah Rukh Khan) च्या रईस (Raees) चित्रपटाचे दिग्दर्शक राहुल ढोलकिया (Rahul Dholakia) करणार आहे. या चित्रपटाची घोषणा क्रिकेटर मिताली राजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने करण्यात आली. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या घोषणेवेळी क्रिकेटर मिताली राजने दिग्दर्शक आणि अभिनेत्री तापसीसोबत केक कापून तिचा वाढदिवस सेलिब्रेट केला.

तापसीने खास मिताली राजसाठी इन्स्टावर बर्थडे पोस्टही शेअर केली आहे आणि त्यावर लिहीलं आहे की, 'हॅपी बर्थडे कॅप्टन मिताली राज, मला माहीत नाही या वाढदिवसाला तुला काय गिफ्ट देऊ ते माहीत नाही. पण एक मात्र नक्की सांगते की, मोठ्या पडद्यावर मला तुझ्या रूपात तुला नक्कीच गर्व वाटेल.

तापसी पन्नू खूप काळापासून हा चित्रपट मिळवण्याच्या प्रयत्नात होती. तिने या चित्रपटात काम करण्याची इच्छाही जाहीर केली होती. त्यामुळे अखेर तापसीची ही इच्छा पूर्ण झाली आहे. आता हे बघायचं आहे की, हा चित्रपट फ्लोअरवर कधी जातो आणि फायनल लुक कसा दिसतो.

क्रिडा भूमिकांमध्ये रमतेय तापसी

तिने नुकताच 'सांड की आंख' हा हिट चित्रपट दिला आहे. या आधी तापसीचा अक्षय कुमार आणि विद्या बालन स्टारर चित्रपट मिशन मंगल आला होता. जो सुपरहिट ठरला होता. त्या आधी वर्षाच्या सुरूवातीला अमिताभ बच्चन यांच्यासोबत तिचा बदला हा चित्रपट आला होता. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचंही खूप कौतुक झालं होतं. त्यानंतर येत्या 2020 वर्षात तिचा 'रश्मी रॉकेट' आणि 'शाबाश मिट्ठू' हे दोन्ही स्पोर्ट्स विषयांवरील आधारित सिनेमा येत आहेत.

'रश्मी रॉकेट' हा नंदा परियासामी हिच्या रियल लाईफ कथेवर आधारित चित्रपट आहे. ज्याचं मोशन पोस्टरही रिलीज करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये तापसी पन्नू कच्छच्या रणमध्ये धावताना दिसत आहे आणि तिथून धावता धावता ती रनिंग ट्रॅकवर पोचते. या चित्रपटाचं दिग्दर्शन आकर्ष खुराना करत आहे. तापसीने हे मोशन पोस्टर इंस्टाग्रामवर शेअर केलं आहे. या आधी तिने तिच्या या लुकची झलकही शेअर केली होती. या लुकमध्ये तिच्या हातावर आणि गळ्यावर गोंदवलेलं आहे. यामध्ये गुजरातमधील गावातल्या मुलीच्या लुकमध्ये दिसत आहे.

मग तुम्हालाही तापसीचा अभिनय आवडतो का आणि तिच्या पुढच्या चित्रपटाबद्दल उत्सुक आहात का?

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.