तापसी पन्नूचा वेकेशन मूड, बहिणींसोबत मालदिव्जमध्ये करत आहे मजा

 तापसी पन्नूचा वेकेशन मूड, बहिणींसोबत मालदिव्जमध्ये करत आहे मजा

लॉकडाऊननंतर आता हळू हळू सर्व काही पूर्ववत होण्यास सुरूवात झाली आहे. या संपूर्ण लॉकडाऊनमध्ये जर कोणी एकाधी गोष्ट खूप मिस केली असेल तर ती म्हणजे ट्रॅव्हल आणि वेकेशनवर जाणं. कारण आपल्यापैकी अनेक जणांना मस्त भटंकती करण्याची सवय असेल. ज्यामुळे आता हळू हळू सर्वांनी आपले वेकेशन प्लॅन पूर्ण करण्यास सुरूवात केली आहे. अभिनेत्री तापसी पन्नू सध्या तिच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग पूर्ण करून ब्रेकसाठी चक्क एका वेकेशनवर गेली आहे. काही दिवसांपूर्वी जयपूरमध्ये तिच्या चित्रपटाचं शूटिंग सुरू होतं.  कोणतंही शूटिंग पूर्ण झालं की लगेच एखादा छोटा ब्रेक घेणं हे ट्रेंडमध्ये आहेच. मात्र एवढ्या मोठ्या लॉकडाऊननंतर तापसी पहिल्यांदाच असं वेकेशन एन्जॉय करत आहे. सध्या ती तिच्या दोन बहिणी शगुन पन्नू आणि इवानिया पन्नू यांच्यासोबत मालदिव्जला गेली आहे. या तिघींचे मालदिव्जमध्ये मौजमजा करतानाचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ते पाहून तुम्हाला मालदिव्जला जावं असं नक्कीच वाटेल. कारण मालदिव्जला जाणं तुमच्याही बकेटलिस्टमध्ये नक्कीच असेल नाही का?

मालदिव्जमध्ये जाताच तापसीचे झाले असे स्वागत

तापसी पन्नूने तिच्या सोशल मीडियावर अनेक फोटोज आणि व्हिडिओज शेअर केले आहेत. ज्यामधुन ती मालदिव्जला असल्याचं समजत आहे. लॉकडाऊनमुळे खूप दिवस घरात कोंडून राहिल्यावर कुणालाही अशा मोकळ्या हवेत ब्रेकवर जावं असं नक्कीच वाटू शकतं. एकतर मालदिव्ज हे सर्वच सेलिब्रेटीजचं एक फेव्हरेट डेस्टिनेशन आहे. कारण तिकडे चारीबाजूने अथांग समुद्रकिनारे आहेत.  तापसी आणि तिच्या दोघी बहिणी जेव्हा मालदिव्जला पोहचल्या तेव्हा रिसॉर्टमध्ये त्यांची ग्रॅंड स्वागत करण्यात आलं. एखाद्या राजकन्यांप्रमाणे त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला होता. याचा सुंदर व्हिडिओ तापसीच्या इंस्टास्टोरीमधून तिने शेअर केला आहे. सध्या या तिघी बहिणी या रिसॉर्टमधल्या स्विमिंग पूल आणि मालदिव्जच्या समुद्रकिनाऱ्यावर वेकेशनचा आनंद लुटत आहेत. 

जयपूरमध्ये तापसी करत होती या चित्रपटाचं शूटिंग

एखादा चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं की थकवा घालवण्यासाठी सेलिब्रेटीज नेहमी छोट्याशा वेकेशनवर जातात. तापसी पन्नूदेखील जयपूरमध्ये एका साऊथ चित्रपटाचं शूटिंग करत होती. या चित्रपटाचं नाव एनाबेल असून डोंगऱ्याच्या मध्यभागी असलेल्या लोकेशनवर या चित्रपटाच्या शेवटच्या काही भागांचे शूटिंग करण्यात आलं होतं. एनाबेल हा एक कॉमेडी चित्रपट असेल. तापसीने या शूटिंगचेही फोटो तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले होते. तापसी पन्नूने हिंदी आणि इतर अनेक भाषांच्या चित्रपटांमध्ये  काम केलेलं आहे. काही महिन्यांपूर्वी ती थप्पड या चित्रपटातून झळकली होती. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले. थप्पड अभिनव सिन्हाने दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी त्यावर काही जणांनी टीकादेखील केली होती. मात्र तापसीने अशा लोकांना सडेतोड उत्तरे तिच्या अभिनयातून दिली आहेत. तापसी तिच्या चित्रपटांप्रमाणेच सामाजिक परिस्थितीवरील तिच्या वक्तव्यांवरूनही सतत चर्चेत असते. तापसी पन्नू सुरूवातीला रिया चक्रवर्तीच्या समर्थनार्थ बोलताना दिसत होती. कंगना रणौतसोबतही तिने चांगलाच वाद घातला होता. कारण त्यावेळ तापसी म्हणाली होती की, आज जर सुशांत असता तर त्यालाच ड्र्ग्ज केसमध्ये एका वर्षाची शिक्षा झाली असती. मात्र पुढे तिने या वादापासून दूर राहणं पसंत केलं. आतातर ती तिच्या दोन्ही बहिणीसोबत मस्त मालदिव्जच्या मोकळ्या वातावरणाचा आनंद लुटत आहे.