टेनिस खेळाडू सानिया मिर्झाच्या बायोपिकमध्ये सानिया साकारणार तापसी पन्नू

टेनिस खेळाडू सानिया मिर्झाच्या बायोपिकमध्ये सानिया साकारणार तापसी पन्नू

तापसी पन्नूने तिच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मागच्या दोन वर्षांपासून तिचे चित्रपट आणि त्यातील हटके भूमिका पाहून सगळ्यांच्याच भूवया उंचावल्या होत्या. तापसी पन्नूला तिचा चित्रपट थप्पडसाठी सर्वोत्कृष्ठ अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाली. या पुरस्काराने तिचा आत्मविश्वास अधिकच वाढला आहे. कारण ती आता आणखी एका दमदार स्पोर्ट्स बायोपिकसाठी पाय रोवून सज्ज झाली आहे. क्रिकेट खेळाडू मिताली राजवर आधारित शाबाश मिठूमध्ये ती मिताली राजची भूमिका साकारत आहेच, शिवाय ती आता टेनिस खेळाडू सानिया मिर्झाच्या बायोपिकमध्ये सानियाची भूमिकादेखील साकारणार आहे. 

तापसी साकारणार एका पाठोपाठ एक खेळाडूची भूमिका

तापसी पन्नूचा अभिनय आणि तिचे हिट चित्रपट पाहता आज तिच्याजवळ अनेक मोठ्या मोठ्या बॅनरच्या चित्रपटांची लाईन लागली आहे. नुकतंच तिने तिच्या रश्मि रॉकेटस हसीन दिलरूबा, आणखी एक साऊथच्या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं आहे. सध्या ती शाबाश मिठूमध्ये मिताली राज साकारण्यासाठी स्वतःला तयार करत आहे. रश्मि रॉकेटमध्येही तिने एका अॅथलीटची भूमिका साकारली आहे. आता मिताली राज साकारण्यासाठी तापसी पन्नू आणि आणि तिची टीम खूप मेहनत घेत आहेत. एखादा खेळाडू साकारताना त्या खेळाडूप्रमाणे दिसण्यासाठी गेटअप प्रमाणेच शारीरिक फिटनेसवरही खूप मेहनत घ्यावी लागते. तापसी या भूमिकांसाठी जीव ओतून मेहनत करताना दिसते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आता स्पोर्ट्स भूमिका साकारता साकारता तापसीला खेळाची आवडच लागल्याचं वाटत आहे. कारण हाती आलेल्या माहितीनुसार तापसी आता या आणखी सानिया मिर्झाच्या बायोपिकमध्येही सानिया साकारण्यासाठी तयार झाली आहे. कारण तापसी आधी राजकुमार हिरानीच्या चित्रपटाची तयारी करत होती. ज्यात तिच्यासोबत शाहरूख खानची मुख्य भूमिका असणार होती. मात्र तिने आता या चित्रपटाची ऑफर पोस्टपोर्न केली आहे. कारण ती सध्या सानियाच्या बायोपिकच्या प्लॅनिंगमध्ये गुंतली आहे. 

तापसीची टीम आणि निर्मात्यांमध्ये सुरू आहे चर्चा

हाती आलेल्या माहीतीनुसार तापसीने स्वतः सानिया मिर्झाच्या बायोपिकसाठी अप्रोच केलं आहे. ज्यावर अजून कोणतीच अधिकृत घोषणा झालेली नाही. रॉनी स्क्रूवालाने सानिया मिर्झाच्या बायोपिकचे अधिकार खरेदी केलेली आहेत. सानिया मिर्झाच्या बायोपिकमध्ये तिच्या यशस्वी कारकीर्दीसोबतच तिच्या आयुष्यातील अनेक वादविवादही दाखवण्यात येणार आहेत. निर्मात्यांना या चित्रपटासाठी एखादा फ्रेश चेहरा हवा अशी चर्चा आहे. परिणितीने नुकतीच सानिया नेहवालच्या बायोपिकमधये सानिया नेहवाल साकारली आहे. त्यामुळे निर्मात्यांना सानिया मिर्झा साकारण्यासाठी तशाच प्रकारची अभिनेत्री हवी आहे. तापसी पन्नू या भूमिकेसाठी परफेक्ट आहे असं त्यांना वाटत आहे. तापसीनेही स्क्रिप्ट वाचली असून तिला ती आवडलीदेखील आहे. मात्र तापसीच्या टीम निर्मात्यांसोबत अजूनही काही गोष्टींवर चर्चा करणार आहे. मगच तापसी या चित्रपटासाठी तिचा होकार कळवेल. सर्व  काही जुळून आलं तर लवकरच तापसी मोठ्या पडद्यावर सानिया मिर्झाच्या रूपात झळकू शकते. ज्यामुळे पुढच्या वर्षीदेखील तापसीच्या नावे बेस्ट अभिनेत्रीचे पुरस्कार नक्कीच असू शकतात.