तैमूरच्या #Birthdaybash फोटो व्हायरल…असा केला वाढदिवस साजरा

तैमूरच्या #Birthdaybash फोटो व्हायरल…असा केला वाढदिवस साजरा

सोशल मीडियावर स्टार किडपैकी जर कोणाची सतत चर्चा होत असेल तर ती तैमूर अली खानची. आज तैमूर अली खानचा तिसरा वाढदिवस आहे. आता बेबो, सैफचा आणि सगळ्या मीडियाच्या आवडीच्या तैमूरचा वाढदिवस आहे म्हटल्यावर हा वाढदिवस अगदी दणक्यात होणार हे काही वेगळे सांगायला नको. वाढदिवसाच्या आदल्या दिवसापासूनच सैफ अली खानने वाढदिवसाची जय्यत तयारी सुरु केली आहे. आदल्या दिवसापासूनच तैमूरच्या घरी पाहुण्यांची रेलचेल सुरु झाली होती. त्यामुळे आज संपूर्ण दिवस सुद्धा तैमूरच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा असणार आहे. 

Year Ender : या कलाकारांनी घेतला यंदा जगाचा निरोप

करीना कपूरने केलीय जय्यत तयारी

करिना कपूर सध्या तिच्या नव्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये खूप व्यग्र आहे. पण तिला तैमूरचा वाढदिवस खूप खास करायचा आहे. ती आणि सैफ अली खान मुंबईमध्ये असल्यामुळे यंदा तैमूरचा वाढदिवस हा मुंबईत साजरा केला जाणार आहे. यासाठीच तिने तयारी सुरु केली आहे. पापाराझीच्या कॅमेरामध्ये ती कैद झाली असून यामध्ये ती या वाढदिवसाच्या तयारीसाठी करिश्मा कपूरसोबत दिसत आहे. काही व्हिडिओमध्ये तैमूरसुद्धा आईसोबत दिसत आहे. एकूणच काय तैमूरच्या वाढदिवसाची तयारी जोरदार करण्यात आली आहे. त्याचे सेलिब्रेशनही सुरु झाले आहे.

तैमूरच्या वाढदिवसाचा प्लॅन करिनाने सांगितला

Instagram

तैमूरच्या वाढदिवसाच्या प्लॅनबाबत करिनाने मीडियाला माहिती दिली असून तैमूरला यंदा वाढदिवसाला दोन केक कापायचे आहेत. त्याने एक हल्क आणि एक सँटाक्लॉजचा केक हवा आहे.  या शिवाय त्याला त्याच्या वाढदिवसाला त्याच्या काही खास मित्रांना बोलवायचे आहे. त्याच्या म्हणण्यानुसार हा वाढदिवस केला जाणार आहे असे देखील करिनाने सांगितले आहे. त्यामुळे तैमूरच्या वाढदिवसाला यंदा दोन केक कापले जाणार आहे. 

काश्मीरचा चुकीचा नकाशा पोस्ट करणे फरहानला पडले भारी

आदल्या दिवशीही दिली मोठी पार्टी

आता तैमूरच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन काय एका दिवसाचे थोडीच असणार? सैफ आणि करिनाने त्याचा वाढदिवस आदल्या दिवशी मीडियासोबत साजरा केला आहे. त्याने मीडिया हाऊससोबत केक कापला असून तैमूरच्या वाढदिवसाचा आनंद शेअर केला आहे. त्यामुळे आदल्या दिवसापासूनच त्याच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला सुरुवात केली. 19 डिसेंबरलाच तैमूरच्या वाढदिवसाची ग्रँड पार्टी ठेवण्यात आली या पार्टीला अनेक सेलिब्रिटी हजर होते. त्यांचेही व्हिडिओ व्हायरल होत आहे.

तैमूर सगळ्यात आवडता

आतापर्यंत अनेक स्टार किड आपण पाहिले असतील. पण तैमूर इतके कोणत्याच स्टार किडने लक्ष वेधून घेतलेले नाही. तैमूरच्या जन्मापासूनच त्याचा एक फॅनक्लबसुद्धा आहे. त्यामुळे तैमूर जाईल तिथे सगळे पापाराझी आधीच जमतात. बेबोपेक्षाही अधिक सर्च हा तैमूरला आहे. त्यामुळे तैमूरचे चाहते जगभरात आहेत. तैमूरच्या सगळ्या गोष्टींकडे मीडियाचे बारीक लक्ष असते. त्यामुळेच त्याचे जास्तीत जास्त व्हिडिओ सोशल मीडियावर अगदी काही मिनिटात व्हायरल होतात. 


या व्हायरल सेन्सेशन तैमूर अली खानला वाढदिवसाच्या शुभेच्छा

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.