तैमूरच्या लोकप्रियतेमुळे होतोय शेजाऱ्यांना त्रास

तैमूरच्या लोकप्रियतेमुळे होतोय शेजाऱ्यांना त्रास

पतौडी घराण्याचा वारस आणि सैफिनाचा लाडका तैमूर अली खान नेहमीच चर्चैत असतो. अगदी त्याच्या जन्मापासूनच त्याची लोकप्रियता जगजाहीर आहे. मीडिया पापाराझ्झी रोजच्या रोज त्याची प्रत्येक अॅक्टीव्हीटी कॅमेरात कैद करत असतात. पण आता मीडियामधील तैमूरची हीच लोकप्रियता त्याच्या शेजाऱ्यांसाठी मात्र डोकेदुखी ठरत आहे. गोष्टी अगदी पोलिस स्टेशनपर्यंत गेल्या आहेत.


तैमूरमुळे शेजाऱ्यांना डोकेदुखी


Taimur Bollywood Debut


तैमूरची प्रत्येक झलक कॅप्चर करण्यासाठी सैफ आणि करिनाच्या घराबाहेर सतत मीडिया फोटोग्राफर्स अगदी पहारा देत असतात. पण आता या मीडिया फोटोग्राफर्सच्या गर्दीमुळे सैफ आणि करिनाच्या शेजाऱ्यांना मात्र त्रास होऊ लागला आहे. एवढा की आता गोष्टी पोलिसांपर्यंत गेल्या आहेत. तैमूरच्या शेजाऱ्यांनी आता पोलिस स्टेशनमध्ये जाऊन याबाबत तक्रार केली आहे की, त्यांच्या घराबाहेर सतत मीडिया फोटोग्राफर्सची गर्दी असते. यामुळे त्यांना अनेकदा त्रास होतो. सूत्रानुसार, पोलिसांकडूनही तक्रार नोंदवून घेण्यात आली आणि पोलिसांनी फोटोग्राफर्सना सैफीनाच्या घराबाहेरून हटवण्यात आलं.


तैमूर लवकरच करणार बॉलीवूडमध्ये एंट्री


सैफ आणि करिनानेही घेतला होता आक्षेप


Taimur1


ही पहिलीच वेळ नाही जेव्हा तैमूरसंबंधी मीडियाच्या या अतिपणावर कोणी बोट दाखवलं आहे. या आधी खुद्द सैफ अली खान आणि करिना कपूर यांनी याबाबत आपली नाराजी व्यक्त केली होती. एका मुलाखतीदरम्यान करिनाने सांगितलं होतं की, तैमूरला आता मीडिया फोटोग्राफर्सची एवढी सवय झाली आहे की, त्याच्या डोक्यात सतत हेच सुरू असतं. मीडिया त्याला एकटं सोडतच नाही. मला तर भीती वाटते की, एखाद्या दिवशी जर मीडियाने त्याचा फोटो काढला नाहीतर तो रागाने त्यांच्यावर हात उचलेल.

तर सैफलाही मीडियाकडून तैमूरला सतत ट्रॅक करण्याबाबत राग येत असल्याचं त्याने सांगितलं होतं. तैमूरची आजी म्हणजेच अभिनेत्री शर्मिला टागोर यांनीही याबाबत चिंता व्यक्त केली होती.


Video: आईबाबांशिवाय तैमूरने केली एन्जॉय होळी


तैमूरही आता ओळखतो ‘मीडिया’ला


Taimur Bollywood Debut 3


तैमूर अली खान सुरूवातीला हटके नावामुळे आणि जन्मतःच काढण्यात आलेल्या गोड फोटोजमुळे चर्चेत होता. आता तैमूर त्याच्या क्युट बाललीलांच्या व्हिडीओजमुळे सतत सोशल मीडियावर व्हायरल असतो. आता तर चक्क तो फोटोग्राफर्सना ओळखून त्यांना ‘मीडिया’ असं संबोधू लागला आहे.

तैमूरला आता हे चांगलंच कळू लागलं आहे की, त्याच्या घराबाहेर सतत मीडियाचा गराडा असतो. त्यामुळे तैमूर आता त्यांना पोजही देऊ लागला आहे. एवढंच नाहीतर तो आता मीडियाची नक्कल करतो आणि मोबाईल घेऊन खिचिक खिचिक असा आवाजही काढतो.